IND vs AUS: काही दिवसातच भारत आणि ऑस्ट्रोलिया (IND vs AUS) यांच्यातील क्रिकेट दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त करण्यात आले आहे आणि शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एकदिवसीय संघात विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातच किंग कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो..

IND vs AUS: विराट कोहली मोडणार कुमार संघकाराचा विक्रम
ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात चाहत्यांना अपेक्षा असेल की, किंग कोहली २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून कांगारूंच्या भूमीवर त्याच्या प्रभावी फॉर्मची पुनरावृत्ती करेल. विराटकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी आहे. ५४ धावा करून कोहली कुमार संगकाराचा प्रतिष्ठित विक्रम मोडू शकतो.
खरं तर, विराट कोहली सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या ३०२ सामन्यांपैकी २९० डावांमध्ये एकूण १४,१८१ धावा केल्या आहेत. या यादीत फक्त सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा त्याच्या पुढे आहेत. संगकारा १४,२३४ धावांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आता, जर विराटने एकदिवसीय मालिकेत ५४ धावा केल्या तर तो ,श्रीलंकेच्या माजी फलंदाजांना मागे टाकेल. ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर १८,४२६ धावांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आधीच किंग कोहलीच्या नावावर आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

विराट कोहली जवळजवळ सात महिन्यांनंतर टीम इंडियाकडून खेळताना दिसेल. कोहली शेवटचा २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. या स्पर्धेत विराटची बॅट जोरात होती. किंग कोहलीने पाच सामन्यांमध्ये ५४ च्या सरासरीने २१८ धावा केल्या. विराटने आधीच टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यात विराट आपल्या बॅटने धमाल करू इच्छित असेल. कोहलीला कांगारू भूमी देखील आवडते. ऑस्ट्रेलियात खेळलेल्या २९ सामन्यांमध्ये किंग कोहलीने ५१ च्या सरासरीने १३२७ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ५ शतके आणि ६ अर्धशतके केली आहेत.
हेही वाचा:

1 Comment
Pingback: Fact Check Virat Kohli gave autograph on Pakistani jersey? : विराट कोहलीने पाकिस्तानी जर्सीवर दिला ऑटोग्राफ? समोर आले वायरल फोटो मागच