IND vs WI: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) वर खेळल्या गेलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी लागला. भारताला विजयासाठी शेवटच्या दिवशी आणखी ५८ धावांची आवश्यकता होती, जी त्यांनी एका तासाच्या आत पूर्ण केली. यासह टीम इंडियाने दुसरी कसोटी सात विकेट्सने जिंकली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपला पहिला डाव ५१८/५ वर घोषित केला. यशस्वी जयस्वाल (१७५) आणि गिल (१२९) यांनी शतके झळकावली. भारताकडून कुलदीप यादवने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या.
IND vs WI: वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी दिली टीम इंडियाच्या गोलंदाजाना टक्कर.
वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर संपला, त्यानंतर भारताने फॉलोऑन लागू केला. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली, ज्यामध्ये जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी शतके झळकावली. पाहुण्या संघाने भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने सामन्याच्या शेवटच्या दिवशी लक्ष्य गाठले आणि सात विकेट्सने विजय मिळवला. गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच कसोटी मालिका विजय आहे.
चौथ्या दिवसाच्या खेळाअखेर भारताने एक विकेट गमावून ६३ धावा केल्या होत्या. भारताची एकमेव विकेट यशस्वी जयस्वालच्या रूपात पडली, जो आठ धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल (२५) आणि साई सुदर्शन (३०) यांनी डाव सावरला, दिवसाचा खेळ संपेपर्यंत आणखी एक विकेट पडू दिली नाही. भारताला विजयासाठी आता ५ व्या दिवशी आणखी ५८ धावांची आवश्यकता आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) दुसऱ्या कसोटीतील ठळक मुद्दे
कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने आपले शतक (१७५) पूर्ण केले. साई सुदर्शनने ८७ धावा केल्या, त्यानंतर केएल राहुलने ३८ धावा केल्या.

दुसऱ्या दिवशी शुभमन गिलने आपले शतक पूर्ण केले, परंतु जयस्वाल १७५ धावांवर धावबाद झाला. नितीशकुमार रेड्डी ४३ आणि ध्रुव जुरेल ४४ धावा केल्या. भारताने आपला पहिला डाव ५१८/५ वर घोषित केला.
वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांत संपला, पाहुण्या संघाकडून अॅलिक अथानासे (४१) आघाडीवर होते. भारताकडून कुलदीप यादवने पाच, तर रवींद्र जडेजा यांनी तीन बळी घेतले. सिराज आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. वेस्ट इंडिज फॉलोऑन टाळू शकले नाहीत आणि गिलने पाहुण्या संघाला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले.
तिसऱ्या दिवशी कसोटी निकाल निश्चित वाटत होता, परंतु जॉन कॅम्पबेल (११५) आणि शाई होप (१०३) यांनी वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात शतके झळकावल्याने ती पाचव्या दिवशीही लांबली. त्यानंतर रोस्टन चेस (४०) आणि जस्टिन ग्रीव्हज (५०) यांनी अर्धशतक झळकावले. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ३९० धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले.
हेही वाचा:
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीमध्ये?,पोर्णग्राफीनंतर या प्रकरणात अडकला राज कुंद्रा..!
Kantara chapter 1 पाहून केएल राहुल भारावला, रिषभ शेट्टीसाठी केले खास वक्तव्य..!
