IND W vs PAK W: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ (Odi World cup 2025) चा सहावा सामना रविवार, ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला.
या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव केला. हा एकदिवसीय मालिकेतील सहावा सामना होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ फक्त ४३ षटकांत १५९ धावांवर गारद झाला. या विजयासह, भारतीय महिला संघाने पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे आणि आगामी सामन्यांसाठी त्यांचे आव्हान वाढवले आहे.![]()
IND W vs PAK W:हरलीन देओल- रिचा घोषच्या खेळीचे भारतीय संघ मजबूत..!
भारताकडून, हरलीन देओलने ६५ चेंडूत ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर रिचा घोषच्या जलद नाबाद ३५ धावांनी संघाला मजबूत स्थितीत आणले. जेमिमा रॉड्रिग्जने ३७ चेंडूत ३२ धावा केल्या. अशा प्रकारे, भारतीय महिला संघाने निर्धारित षटकांत २४७ धावा केल्या. पाकिस्तानकडून डायना बेगने सर्वात प्रभावी गोलंदाजी केली, १० षटकांत ४ बळी घेतले. फातिमा सनानेही २ बळी घेतले.
भारतीय गोलंदाजीला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ ४३ षटकांत १५९ धावांतच गारद झाला. सिद्ध्रा अमीनने १०६ चेंडूंत ८१ धावा केल्या, तर नतालिया परवेझने ३३ धावा केल्या. भारतीय संघाकडून क्रांती गॉडने १० षटकांत फक्त २० धावा देत ३ बळी घेतले, तर दीप्ती शर्माने ३ बळी घेतले. स्नेह राणानेही २ बळी घेत पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळवल्या.

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु भारतीय फलंदाजांनी संघाला लवकर मजबूत स्थितीत आणले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि पाकिस्तानी संघाला रोखले. या विजयासह भारतीय महिला संघाने पुरुष संघाप्रमाणे पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखवली आहे..
हेही वाचा:
6 Comments
Pingback: IND vs AUS: ऑस्ट्रोलिया विरुद्ध मैदानावर उतरताच विराट कोहली रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरेल एकम
Pingback: IND vs AUS: मैदानावर पाय ठेवताच रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला 5वा भारतीय खेळाडू ..! - yu
Pingback: IND vs AUS 1st ODI: विराट कोहलीबद्दल अर्शदीप सिंगचे पत्रकाराला ठोस प्रतीउत्तर, उत्तर ऐकताच उतरला पत्रकारा
Pingback: IND vs AUS: विराट कोहलीच्या नावावर झाला नकोसा विक्रम, ऑस्ट्रोलियामध्ये केली नकोशी कामगिरी.! - yuvakatta.com
Pingback: IND vs AUS: सिडनीमध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला टीम इंडियाचा सातवा खेळाडू..! - yu
Pingback: Pakistan Vs South Africa: शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव पाकिस्त