भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर केला. बुधवार (६ जुलै) या ३ सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. तसेच हा मालिकेसाठी काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची नावे प्रमुख आहेत. त्याचबरोबर शुभमन गिलचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे.
तसेच संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सुपूर्त केले आहे. या अगोदर धवनने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तो एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत कर्णधारपद भूषवले. तसेच रवींद्र जडेजाला संघाचा उपकर्णधार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमधून थेट वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. मात्र, वरिष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती या मालिकेत जाणवेल.
तसेच आयर्लंडमध्ये टी-२० मालिकेत सहभागी झालेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शुभमन गिलचेही जवळपास दीड वर्षानंतर वनडे संघात पुनरागमन झाले आहे. यापूर्वी गिलने डिसेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तो सध्या इंग्लंडमध्ये असून इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्याचा तो भाग होता.
याच्या व्यतिरिक्त या मालिकेसाठी संजू सॅमसनचीही निवड करण्यात आली आहे. त्याने गेल्या वर्षी श्रीलंकेत एकदिवसीय पदार्पण केले होते. तसेच आयर्लंड दौऱ्यावर सॅमसनने चांगली खेळी केली. तसे अर्शदीप सिंगचीही इंग्लंडनंतर या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तर भुवनेश्वर कुमारच्या विश्रांतीमुळे आवेश खानचा प्रथमच एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..