आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
धर्माने मुस्लीम संस्कृती असलेल्या या देशाने आपल्या चलनावर मात्र ‘गणपती बाप्पांचा’ फोटो छापलाय..
मुस्लिम देशातील चलनातील नोटेवर श्री गणेशाचा फोटो पाहिला असेल, परंतु हा फोटो असण्यामागे खास कारणदेखील असल्याचे सांगितले आहे. ही नोट इंडोनेशिया देशातील आहे. या देशात ८७.५% एवढी लोकसंख्या केवळ मुस्लिम धर्मीय आहे. तर ३%हिस्सा हा हिंदू धर्मीय लोकांनी व्यापलेला आहे.
हा आकडा जरी कमी वाटत असला तरी भारता व्यतिरिक्त इतर देशांच्या तुलनेने ही संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे.
तसे पाहता या देशात हिंदूंची जवळपास चार हजाराहून अधिक देवस्थाने येथे आढळून येतात. एवढेच नाही तर भारतात सहाव्या शतकातील गणेशाची मूर्ती अस्तित्वात आढळली असली तरी इंडोनेशियामध्ये पहिल्या शतकापासून गणपतीचे अस्तित्व मानण्यात आले आहे.
इंडोनेशियामध्ये शिक्षण,कला आणि विज्ञानाची देवता म्हणून गणपतीला मानले जाते. 20,000 च्या नोटेवर पुढील बाजूला गणपती तर मागील बाजूला विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एकत्र फोटो आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षणमंत्री हजर देवांत्रा यांचा फोटो आहे.
त्यामुळेच या देशात फार पूर्वीपासूनच या देवतेला मान्यता देण्यात आली आहे.
गणपती ही बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते.
त्यामुळेच येथील चलनात असलेल्या २०,००० च्या नोटेवर गणेशाचा फोटो आढळतो. यासोबतच “की हजर देवन्तर” यांचा वाढदिवसही जागतिक शिक्षण दिनाच्याच दिवशी असल्याने त्यांचादेखील फोटो छापण्यात आला आहे. तर नोटेच्या मागील बाजूस विद्यार्थी शिकत असलेल्या वर्गाचा फोटो छापण्यात आला आहे.
या सर्वाचा ताळमेळ लक्षात घेता शिक्षणाचे महत्त्व या नोटेद्वारे पटवून देण्यात येत असल्याचे आढळते आणि त्यामुळे येथील नागरिकांनीही याला मान्यता दिली असल्याचे सांगितले आहे.एवढेच नाही तर या देशाची राजधानी असलेल्या जकार्ताच्या ठिकाणी “अर्जुन आणि कृष्ण” यांचे रथात असलेले पुतळेदेखील आढळून येतात.

फार प्राचीन काळापासून पूर्व आशिया आणि भारतीय उपखंडात गणपती पुजला जातो आहे.
प्राधान्याने हिंदू समाजाची ही देवता परदेशात त्याकाळात हिंदू राजानी केलेली राज्ये आणि भारतातून त्या देशात गेलेले व्यापारी यांच्यामुळे गेली आणि कांही काळानंतर तेथील समाजजीवनात मिसळून गेली. १० व्या शतकापूर्वीपासून दक्षिण पूर्व आशियात भारतातून अनेक व्यापारी गेले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर गणेशही नेला.
आजही इंडोनेशियाच्या जावा, बाली, बोर्नियो, बांडुंग, अशा असंख्य बेटांवर गणेश पुजला जातो इतकेच नव्हे तर मुस्लीम देश म्हणून ओळख असलेल्या या देशात गणेशाची प्रतिमा तेथील चलनी नोटेवरही पहायला मिळते.
तर येथील मिलीटरी एरियात देखील हनुमानाला स्थान दिले आहे. येथील एका शैक्षणीक संस्थेत देखील गणेशाचा फोटो एक सिम्बॉल म्हणून वापरण्यात आला आहे. “भागवत गीतेला ” हिंदू संस्कृतीत महत्वाचे स्थान दिले आहे, त्याचप्रमाणे येथील नागरिकांनाही भागवत गीतेचे मोफत ज्ञान देण्याचे कार्य केले जाते. येथील बऱ्याच ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणी संस्कृत भाषेचे अस्तित्व आढळून येते. तर रामायणातील “बाली” यांच्या नावाने एक बेटही प्रचलित आहे.
भगवान विष्णूचे वाहन असलेल्या “गरुड” नावाने एअरलाईन्सही अस्तित्वात आहे. श्री गणेशाच्या अस्तित्वासोबत रामायण, महाभारतातील खुणा येथे आढळून येतात त्यामुळे या मुस्लिम देशात हिंदू संस्कृतीचे पुरेपूर दर्शन झाल्याचे समाधानच वाटते.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.