IPL 2026 Mini-Auction Venue: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) साठी मिनी-लिलाव कदाचित भारतातील शहरात होणार नाही, तर दुसऱ्या देशात होणार आहे.
अहवालानुसार, मागील मेगा-लिलावाप्रमाणे, यावेळीही मिनी-लिलाव आखाती प्रदेशात होण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी, ओमान आणि कतारसह, संभाव्य ठिकाणे आहेत. अद्याप बीसीसीआयने कोणत्याही शहराच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाहीये.
IPL 2026 Mini-Auction Venue:14 डिसेंबर ला होणार आयपीएल 2026 साठी मिनी लिलाव!
https://t20sports.in/category/ipl-2026/इंडियन प्रीमियर लीग २०२६ साठी मिनी-लिलाव १४ डिसेंबर रोजी होणार आहे. दोन दिवसांच्या कार्यक्रमाच्या बाबतीत, १३ डिसेंबर रोजी एक विंडो देखील उघडली जाईल. खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरला आपल्याला सर्वच संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी मिळेल.
आणि उर्वरित खेळाडूंसाठी आयपीएल 2026 चा मिनी लिलाव दुबई किंवा अबू धाबी या दोन ठिकाणी आयोजित केला जातो. हा दोन दिवसाचा लिलाव होणार असून यात 70/80 खेळाडूंवर बोली लावली जाऊ शकते!
पुढील आठवड्यात लिलावाच्या अधिकृत तारीख आणि वेळ होणार जाहीर?
बीसीसीआय १५ नोव्हेंबरपूर्वी अधिकृतपणे तारीख आणि ठिकाण जाहीर करण्याची शक्यता आहे, ही आयपीएल २०२६ साठी फ्रँचायझींना त्यांच्या राखलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम तारीख असेल!

आयपीएलचा १८ वा हंगाम अत्यंत रोमांचक होता. मेगा लिलावानंतर सर्व संघांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले. आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव करून आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकले. हे आरसीबीचे पहिले आयपीएल विजेतेपद होते.
गेल्या हंगामाच्या मेगा लिलावानंतर, पुढील हंगामासाठीचा मिनी लिलाव अत्यंत रोमांचक होणार आहे. अनेक प्रमुख खेळाडू त्यांचे संघ सोडत असल्याच्या बातम्या आहेत. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) हे त्यापैकी सर्वात मोठे नाव आहे. आरआर संजू सॅमसनला कायम ठेवतात की, त्याला हंगामापूर्वी रिलीज केले जाते. याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष असणार आहे.
IPL 2026 आधी राजस्थान रॉयल्स संजूला दाखवणार बाहेरचा रस्ता?
खरं तर, आयपीएल २०२६ च्या आधी, आरआरने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह त्यांचे कोचिंग स्टाफ बदलले आहेत. आयपीएल २०२५ मध्ये, राहुल द्रविड, संजू सॅमसन आणि आरआर संघ व्यवस्थापन यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
रियान परागची कर्णधारपदी नियुक्ती झाल्यामुळे संघातील खेळाडूंमध्ये असंतोष असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यामुळे, रिटेन्शन लिस्ट जाहीर होईपर्यंत संजू सॅमसन नक्कीच चर्चेत असेल. आता राजस्थान खरच त्याला संघातून बाहेर करते की रियान परागच्या नेतृत्वात खेळण्यास संजू तयार होतो. याकडे सर्वांचे लक्ष असेल.
जर राजस्थान रॉयल्सने संजूला रिलीज केले आणि तो मिनी लिलावात पोहचला तर ,तो या लिलावातील सर्वांत महागडा खेळाडू ठरू शकतो. दिल्ली केपीटल किंवा केकेआर त्याला संघात घेऊन कर्णधार बनवण्यास उत्सुक आहेत.
हेही वाचा:
- Women’s World cup 2025 Winner Prizemoney: 52 वर्षानंतर विश्वचषक जिंकल्यावर टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव,आयसीसीकडून मिळाले तब्बल इतके कोटी तर बीसीसीआयदेखील मेहरबान !
- INDIA tour of Australia: ऑस्ट्रोलीयाविरुद्धच्या मालिकेत स्थान न मिळाल्याने अजिंक्य राहणे नाराज? केला मोठा खुलासा..!
- IND W vs PAK W: भारतीय महिला संघाचा पाकिस्तान महिला संघावर दणदणीत विजय, तब्बल 88 धावांनी हरवत रचला इतिहास..!

