हा सिरीयल किलर फक्त वयात आलेल्या मुलींनाच मारून त्यांच्या शरीराचे तुकडे करायचा..
लोकांच्या सूडाच्या भावनेमुळे किंवा मानसिक विकृतीमुळे बरेच लोक खुनी बनतात आणि अनेक वेळा खून केल्यानंतर ते सतत लोकांना मारायला लागतात, अशा लोकांना सिरीयल किलर असे नाव दिले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सीरियल किलरबद्दल सांगणार आहोत, जो फक्त तरुण मुलींची आणि नवविवाहित महिलांची हत्या करत असे.
सीरियल किलर जॅक द रिपरच नाव आजपर्यंत कदाचित तुम्ही ऐकलही असेल. या सीरियल किलरची खास गोष्ट म्हणजे तो फक्त मुलींनाच आपला शिकार बनवायचा. ही गोष्ट १८८८ सालची आहे. जेव्हा तो त्यांना मारून त्यांचे अवयव वेगळे करून फेकून द्यायचा.
1888 मध्ये लंडनमध्ये या सीरियल किलरची खूप भीती सुरू झाली होती. सप्टेंबर 1888 मध्ये लंडनच्या एका वृत्तपत्रात एक खळबळजनक पत्र प्रकाशित झाले जे एका धोकादायक किलरने लिहिले होते. त्याने आपल्या पहिल्या हत्येबद्दल भयानक पद्धतीने सांगितले होते.
तो म्हणाला की तो आणखी बऱ्याच महिलांना मारणार आहे. हे पत्र सीरियल किलरने लिहिले आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही पण या पत्रावरून मारेकऱ्याची ओळख पटली. त्यानंतर त्याला जॅक द रिपर असे नाव देण्यात आले. असे म्हटले जाते की या सीरियल किलर जॅक द रिपरने 5 वेळा मुलींची हत्या केली आणि सर्वांची एका खास पद्धतीने हत्या केली होती.
हेही वाचा: देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
त्याने धारदार शस्त्राने सर्वांची मान कापली आणि त्यांच्या मृतदेहावर क्रूर कृत्य केले.
सर्वप्रथम त्याने 31 ऑगस्ट 1888 रोजी पहिली हत्या केली. त्याने मेरी अॅन निकोल्स नावाच्या महिलेची निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर सीरियल किलरचे पत्र लंडनच्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. ज्यामध्ये त्याने या हत्येची माहिती दिली. यासोबतच आणखी अनेक मुलींना मारणार असल्याची चर्चा सुद्धा सुरु केली.
जॅक द रिपर बार मुलींना मारल्यानंतर शरीराचे अंतर्गत भाग कापायचा. त्याने मुलींचे प्रायव्हेट पार्ट अनेक वेळा चाकूने कापून वेगळे केले होते. हा सीरियल किलर त्याची हत्या केल्यानंतर गर्भाशय, किडनी आणि हृदय बाहेर काढायचा.
लंडनमधील व्हाईट चॅपल शहर बार गर्ल्सचा गड मानला जात होता. त्याची भीती या शहरात सर्वाधिक होती. महिला रात्री घराबाहेर पडायला सुद्धा घाबरत असत. सिरीयल किलर कुठून आला आणि तो कुठे बेपत्ता झाला हे आजतागायत कोणालाही कळू शकलेले नाही.
यानंतर पुन्हा एकदा बातमी प्रसिद्ध झाली की भयानक सीरियल किलर परत आला आहे. त्याने आणखी दोन जणांची निर्घृण हत्या केली. यानंतर लंडनच्या व्हाईट चॅपल शहरात देशभरातून हजारो लोक जमले आणि राणी व्हिक्टोरियाही तेथे पोहोचल्या. येथे पोलिसांची गस्त वाढवून हेर बसवण्यात आले. पण या सिरीयल किलरचे खरे नाव कधीच कळू शकले नाही.
अनेक प्रयत्न करून सुद्धा तो सिरीयल किलर सापडलाच नाही. परंतु काही वर्षांनी मात्र तो स्वतःच गायब झाला तो आजूनही कोणालाहि सापडला नाही..
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..