
स्वतःशी लग्न करणारी क्षमा बिंदू आठवतेय? घरमालकाने तिला घराबाहेर काढलंय…
गुजरातच्या क्षमा बिंदूने काही दिवसांपूर्वी स्वतःशीच लग्न केलं होत. तेव्हापासून ती संपूर्ण देशभरात चर्चचा विषय बनली होती.
क्षमा बिंदू ही 11 जूनला स्वतःशी लग्न करणार होती, पण नियोजित तारखेच्या 2 दिवस आधी 9 जूनला तीन आपलं लग्न उरकलं होत. आता तिच्याबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे. क्षमा बिंदू गुजरातमधील वडोदरा येथे ज्या भाड्याच्या घरात राहत होती, त्या घरमालकाने तिने घरातून बाहेर काढलंय. पण असं करण्याआधी त्यान त्यामागचं कारणही सांगलय. ते असं..
वडोदरा येथील सुभानपुरा भागात राहणारी क्षमा बिंदू भाड्याच्या घरात राहत होती. तिच्या घरमालकाने तिला घर घर सोडण्यास भाग पाडले आहे. क्षमाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, घरमालकाने सोसायटीच्या दबावाखाली येऊन घर रिकामे करण्यास सांगितल आणि नाईलाजाने मला ते कराव लागलं. सोसायटीमध्ये तिच्याबद्दल होत असलेल्या वेगवेगळ्या चर्चांमुळे घरमालकाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलय.
तिच्या बद्दल चर्चा ह्या आता अश्या रंगू लागल्यात की, या सर्वाना कंठाळून क्षमा बिंदूने वडोदरा शहर देखील सोडले. ती कुठे राहणार आहे याबद्दल कोणतीही माहिती तिने अद्याप दिली नाही. आपण दुसरं जॉब शोधत असल्याचंही तिने म्हटलंय.
याउलट तीच म्हणनं आहे की कितीही त्रास झाला तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि स्वतःशी लग्न करून खूप आनंदी आहे.
क्षमा बिंदू साठी स्वतःशी लग्न करणे सोपे नव्हते. या निर्णयानंतरचे आयुष्य सोपे जाणार नाही याचीहीतिला कल्पना होती आणि असे असतानाही तिने हा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी क्षमाला लग्न करायचे होते त्या ठिकाणीही तिच्या पदरी निराशाच पडली आणि तिचा कार्यक्रम रद्द झाला. पंडित यांनीही असा विवाह न करण्याचा निर्णय घेतला. नंतर क्षमाने आपल्या काही मित्रांसह स्वतःचं आपाल्याशी लग्न लावून घेतले होते.

क्षमा बिंदूने तिच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर वडोदराच्या माजी उपमहापौर सुनीता शुक्ला यांनी मंदिराच्या विश्वस्तांना लग्न थांबवण्यास सांगितले होते. यासोबतच शुक्ला यांनी क्षमा बिंदूला मानसिक विकृती असल्याचेही सांगितले. त्यांनी क्षमा बिंदूचा विवाह धर्मग्रंथांच्या विरोधात असल्याचे सांगून शहरातील कोणत्याही मंदिरात लग्न न केल्यास तीव्र आंदोलनास तयार राहण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे क्षमाला स्वतः राहत असलेल्या भाड्याच्या घरातच लग्न कराव लागलं होत.
एकंदरीत परस्थिती पाहता क्षमाच्या या निर्णयामुळे सध्यातरी तिला चांगलीच अडचण निर्माण झालीय. पण तरीही ती आपल्या निर्णयावर अजूनही ठाम आहे आणि लवकरच समाजातील लोक तीच हे वास्तव समजतील आणि तिचा स्वीकार करतील असा विश्वासही तिने बोलून दाखवलाय..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..