अनेक गोष्टी आपण सामान्यपणे घेत असतो म्हणजे अनेक वेळा आपण थोड्याच गोष्टींवरून निष्कर्ष काढायचा प्रयत्न करतो. या गोष्टी एवढ्या सामान्य असतात की आपण त्याच्याकडे सर्वसामान्यपणे दुर्लक्षच केलेलं आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर विचार करा ” Thums up ” या सुप्रसिद्ध कोल्ड्रिंग च्या स्पेलिंग मध्ये B का नाही. याचा या आधी तुम्ही कधी विचार केला आहे का? आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहोत….
सामान्यपणे इंटरनेट वरती या कोल्ड ड्रिंक कंपनीने त्यांच्या नावातून B का काढून टाकले याच्या अनेक सर्वमान्य थेरीज उपलब्ध आहेत, परंतु यातील काही गोष्टी ज्यामध्ये लॉजिक आहे त्या आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
खूप कमी लोकांना याबद्दल कल्पना आहे खरंतर हा एवढा सुप्रसिद्ध ब्रॅण्ड आहे की याचा विचार देखील कोणी करत नाही. बऱ्याच लोकांना ही एखादी चूक वाटत असेल किंवा कुठल्या प्रकारचा ट्रेडमार्क वाटत असेल, काही लोकांना तर हा आहे का अद्वितीय भारतीयपणा वाटतो!
पण असं नाहीये, काही लोकांच्या मते जेव्हा सुरुवातीला थमसप या कोल्ड्रिंक कंपनीचे सुरुवात झाली तेव्हा ती कंपनी 200 मिलिलिटर एवढ्या क्षमतेच्या काचेच्या बाटल्या तयार करत असत आणि यावरती एका नावाचं स्पेलींग ओळीत बसण्यासाठी कंपनीने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचं समोर येतं. या लॉजिक मध्ये देखील तथ्य आहे त्यामुळे अनेक लोकांना हे कारण खरं आहे असं वाटतं.
तर काही लोकांच्या मते कंपनीने आपला लोगो महाराष्ट्रातील, मनमाड या जिल्ह्यातील दिसणार्या एका डोंगरा सारखा तयार केलेला आहे असं जाणवत, त्यामुळे त्या डोंगराच्या नावावरूनच कंपनीने प्रॉडक्टचं नाव ठेवल्याचं देखील काहीजण सांगतात. खरंच हा डोंगर आणि थमसप चा लोगो सारखेच दिसतात बरं! या डोंगराला थम्सअप डोंगर असेदेखील म्हटले जाते.
परंतु कंपनीचे प्रवक्ता रमेश चव्हाण यांच्या मते स्पेलिंग मधून B काढण्याचं असं काही विशेष कारण नाही. हा एक सर्व मताने घेतलेला निर्णय आहे त्यामुळे त्यामागे विशिष्ट कारण नाही. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की,”आमच्या एड एजन्सीने हे नाव खूप चांगलं असल्याचं सुचवलं त्यामुळे फार विचार न करता आम्ही ते नाव प्रॉडक्ट ला दिला.”
एकंदरीत हे सगळ एक मार्केटींगचा भाग होता असाच गृहीत धरून चालावे लागेल.पण याचा फायदा नक्कीच कंपनीला झालाय हेही विसरता येणार नाही.
तर मित्रांनो लक्षात आलं का लक्षात की कंपनीने स्पेलिंग मधून B काढून टाकण्याचा असं कुठलंही रहस्यमयी कारण नाही. तो एक फक्त वेगळा निर्णय होता आणि हा निर्णय 2020 पर्यंत तरी योग्य प्रकारे चालला असेच म्हणावे लागेल.
हेही वाचा:
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..