Home Blog

निवृत्ती घेईपर्यंतही इंग्लंडचा ‘स्टुअर्ट’ एक नाव कधीच विसरणार नाय…ते म्हणजे ‘जसप्रीत बूमराह’..

0
जसप्रीत बूमरह

निवृत्ती घेईपर्यंतही इंग्लंडचा ‘स्टुअर्ट’ एक नाव कधीच विसरणार नाय…ते म्हणजे ‘जसप्रीत बूमराह’..


इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला अनेक आश्चर्यकारक दृश्ये पाहायला मिळाली. रवींद्र जडेजाच्या शतकाचे कौतुक संपत नाही तोच सर्व प्रेक्षक  जसप्रीत बुमराहच्या नावाचा जप करायला लागले.

होय, बूमराहनं कामच तर तसं केलं आहे.

भारताच्या डावाच्या अखेरीस या सामन्यात टीम इंडियाचे कर्णधार असलेल्या बुमराहने गोलंदाजीपूर्वी फलंदाजी करताना दाखवलेला पराक्रम क्वचितच कोणी विसरू शकतील. त्याने इंग्लंडचा घातक वेगवान गोलंदाज स्टुअर्ट बोर्डाविरुद्ध एका षटकात 35 धावा ठोकत इतिहाच रचलाय.

जसप्रीत बूमरह

जडेजाच्या शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाने इंग्लंडने 16 धावांत 1 गडी गमावला. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपूर्णपणे भारताच्या नावावर आहे, रवींद्र जडेजाने या सत्रात आपले शतक पूर्ण केले, भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात ३३८/७ धावांवर केली.

या सामन्यातीलआतापर्यंतचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह. ज्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले. बुमराहने अवघ्या 16 चेंडूत 31 धावा केल्या, त्यापैकी स्टुअर्ट बोर्डाच्या षटकात त्याने 23 धावा जोडल्या. पण या षटकात एकूण 35 धावा झाल्या आहेत ज्यात एक्स्ट्रा मिळून कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एका षटकातील सर्वाधिक धावा आहेत. बुमराहच्या या कामगिरीनेसध्या तो पहिल्याच सामन्यात हिरो बनलाय..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

‘रिअ‍ॅलिटी शो’चं मार्केट वाढलंय त्याच श्रेय अभिनेत्री मलायका अरोराला जातंय..

0
मलायका अरोरा

 

२०१७ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गावाकडं जिओचं सिम मार्केर्टमध्ये आल्याची खबर पोरांना मिळू लागली होती. त्यासाठी 4G मोबाईलची गरज असल्याचा साक्षात्कार देखील त्याच काळात आम्हा गावाकडंच्या लोकांना झाला होता.

गावातल्या मोजक्या पोरांनी 4G अँड्रॉइड मोबाईल घेतल्यानंतर गावात रेंज येत नाही, म्हणून ते गावाबाहेरच्या शाळेवर येऊन बसायचे. पुढे जसं जसं जिओचं सिम घेणाऱ्यांची संख्या वाढली तशी पारावर न बसता वस्तीजवळल्या टेकडीवर जाऊन बसणाऱ्या पोरांची संख्या वाढत गेली.

त्यावेळी पोरं 2G स्पीडनं 1GB नेट 28 दिवस वापरायचे. पण जिओ आल्यानं पोरांना दिवसाला दीड जीबी नेट मिळायला लागल्यानं ते बघावं तेव्हा मोबाईल मध्ये डोकं घालून बसायचे.

पहिले फेसबुकवर चॅटिंग करण्यात नि व्हाट्सएपवर कॉमेडी व्हिडीओ फॉरवर्ड करण्यातच दीड जीबीचा खात्मा व्हायचा. त्यानंतर आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी चढाओढीवर पोस्टी करायच्या, कमेंटमध्ये भांडत बसायचं हा प्रकार सुरू झाला.

पण आता राजकीय विषयावरून फेसबुक, व्हाट्सएपवर वाद घालणारा बराच क्राउड इन्स्टाग्रामवर, फेसबुकवर रील बघण्यात गुंगलाय. टिकटॉक वर बंदी आल्यापासून इन्स्टा आणि फेसबुकवर रील्सचं इतकं प्रमाण वाढलंय की त्याला प्रति टिकटॉकचं रुप आलंय

इन्स्टाग्रामवर, फेसबुकवर असलेल्या रिल्स खूप लक्ष वेधून घेतात. त्यामुळे निवडणूक आल्यावर फेसबुकवर गूळ पाडणे, व्हाट्सएप ग्रुपवर भांडण करणे मिम्स, कॉमेडी व्हिडीओ फॉरवर्ड करणे हे सगळं कमी झालंय.

इन्स्टग्रामवर किती रिल्सचा पेव असतो. हे मी सांगायची गरज नाहीये. पण प्रामुख्यानं जिच्या रिल्स बघण्याची बिमारी पोरांना जडली ती म्हणजे, मलायका अरोरा.Actress Malaika Arora melt our heart with this photos-మలైకా అరోరా అందమైన  ఫోటోలు

मालायकाच्या रिल्स बघण्यात पोरं दिवस-रात्र घालवतात. ती जिममध्ये व्यायाम करताना. जिम मधून जाता-येताना. तिच्या कुत्र्याला फिरवताना. पार्टीला गेलेली असताना नेहमी तिच्या समोर कॅमेरे असतात. तिची हरेक ऍक्टिव्हिटी तिच्या फॅन्सना कळत असते.

ज्यांना कधीही जिमला जायचं माहिती नसतं. अशी पोरंही मलायकाचे जिम मधले रिल्स बघत असतात. पोरांचा मलायकाच्या रील बघण्यात दोन जीबी डाटा संपतो, यावरून कळेल की, मलायकाच्या रिल्स पोरं किती खुळ्यागत बघतात.

मालायका आज 48 व्या वर्षात पदार्पण करतेय. वयाची 47 वर्षे ओलांडली तरी वयात आलेल्या पोरांपासून ते पन्नाशी ओलांडलेल्या पुरुषांपर्यंत हर तरफ मालायकाचे दिवाने दिसतील.

मालायकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊ, कोण आहे मालाईका आणि अशी काय जादू आहे मलायकामध्ये ज्यामुळे पोरं रियालिटी शो फक्त मलायकासाठी बघतात.

मलायकाचा जन्म मुंबईच्या चेंबूरमध्ये झाला. तिचं शालेय शिक्षण चेंबूरच्या स्वामी विवेकानंद शाळेतून झालेलं आहे. तिनं बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अरबाज खानशी लग्न केलं होतं. ते दोघे एका कॉफी जाहिरात शूट दरम्यान भेटले होते. मलायका तेंव्हा मॉडेलिंग करत होती.

मॉडेलिंग मध्ये यशस्वी झाल्यानंतर 1999 मध्ये आलेल्या ‘दिल से’ या चित्रपटात झळकली. मलायका या चित्रपटात पाहिल्यांदाच आयटम साँग करताना दिसली होती. या चित्रपटातील ‘चल छैया छैया’ या गाण्यात मलायका आणि शाहरुखची केमिस्ट्रीनं मलायकला हिट बनवलं.

1999

चल ‘छैय्या छैय्या’च्या प्रचंड यशानंतर 1999 मध्ये मलायकाचे आणखी एक आयटम साँग पडद्यावर आलं. ‘रंगीला मारो ढोलना’ या गाण्यात मलायका आणि अरबाज खान एकत्र होते.

2002

2002 मलायकाचं ‘माही वे’ हे आयटम सॉंग आलं. ते तुफान हिट ठरलं.

2005

2005 मध्ये ‘काल धमाल मे’ या आयटम साँगमध्ये मलायका दिसली. हे गाणं देखील सुपरहिट ठरलं.

2010

2010 मध्ये सलमान खानचा सुपरहिट ठरलेल्या दबंग चित्रपटात ‘मुन्नी बदनाम हुई’ या आयटम सॉंगमध्ये मलायका दिसली. त्यातही मलायकाची अदा कायम असल्याचं दिसून आलं.

2015

2015 मध्ये आलेल्या डॉली की डोली चित्रपटातील ‘फॅशन खतम मुझ पे मै भी या गाण्यात मलायका दिसली. त्यानंतर हाऊसफुल 2 या चित्रपटात मधील ‘अनारकली डिस्को चली’ या गाण्यातून तिनं आपली जादू पुन्हा एकदा दाखवून दिली. आजपर्यंत सगळ्यात सुपर गाण्यांपैकी हे गाण मानलं जातं.

मलायका अरोरा

याव्यतिरिक्त ये प्यार है नशा जिंदगी का, चोरी चोरी देखे मुझ को, होठ रसीले’ फैशन खत्म मुझ पे, यासारखे हिट आयटम सॉंग मलायकानं दिले आहेत.

मलायका टेलिव्हिजन शो ‘नच बलिये’ मध्ये तीन जज पैकी एक म्हणून दिसली होती. 2005 ला हा शो ‘स्टार वन’ वर दिसायचा. त्यांनंतर 2010 च्या ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये ती जज म्हणूनही दिसली होती. सध्या ती ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या जजिंग पॅनलमध्येही महत्त्वाची भूमिका पार पाडतेय.

जवळपास 22 वर्षे झाली मलायका आयटम सॉंग आणि रियालिटी शोज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. तिच्या अदा पाहता तिला पाहणाऱ्या पिढ्यांचं वय वाढलं पण तिचं वय वाढलं नसल्याचं बोललं जातं.

इन्स्टग्राम, रिल्स आणि मलायका हे नातं लैच घट्ट व्हायला लागलंय. मलायकाच्या रिल्स बघणाऱ्या पोरांचं म्हणणंय तिच्यामुळे आम्ही रिल्स बघायला शिकलो. सध्या मलायकाची गाणी भेटीला आलेली नाहीत. पण रियालिटी शोमध्ये तिचा डान्स नेहमीच पाहायला मिळतो. त्याच्याही रिल्स खतरनाक असतात…


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

महिला पत्रकाराने वाजपेयींना ‘लग्न का करत नाहीत? असा प्रश्न विचारला, आणि त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळेच हैराण झाले..

0
वाजपेयी

महिला पत्रकाराने वाजपेयींना ‘लग्न का करत नाहीत? असा प्रश्न विचारला, आणि त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळेच हैराण झाले..


भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आता आपल्यात नाहीत परंतू त्यांच्या बऱ्याच आठवणी मात्र आहेत. कुशाग्र राजकीय बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणा यासाठी अटलजींची ख्याती संपूर्ण देशभरात आहे. वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु १९५१ मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि पत्रकारिता सोडली. राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त वाजपेयी हे एक ख्यातनाम कवी देखील होते. हार नही मानेंगे, कौरव कोण, कोण पांडव, पंद्रह अगस्त कि पुकार, कदम मिलाकर चालना होगा हे त्यांचे कविता संग्रह आजही लोक आवडीने वाचतात. अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले अटलजी त्यांच्या व्यस्त कामातून ते संगीत आणि पाक कलेला देखील वेळ काढायचे.

त्यांच्या आयुष्यावरील असे अनेक किस्से आहेत त्यामुळे ते आजही आपल्या आठवणीत राहतात. त्यांचा असाच एक रंजक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांचे एक वैशिष्ट्य असेही आहे की ते आयुष्यभर अविवाहित राहिले. या बाबतीत त्यांना बऱ्याचदा प्रश्नांना सामोरे जावे लागायचे पण त्यांची उत्तरे देखील ते इतकेच गमतीने द्यायचे. एकदा एका महिला पत्रकाराने त्यांना एका मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला,”तुम्ही लग्न का केले नाही?” त्यावर अटलजींनी तात्काळ उत्तर दिले, “आदर्श पत्नी च्या शोधात आहे” मग यावर महिला पत्रकाराने पुन्हा विचारलं की, “मग मिळाली की नाही?” त्यावर अटलजी उत्तरले, “मिळाली होती पण तिलाही आदर्श पतीचा शोध होता” हे उत्तर ऐकून आजूबाजूला एकच हशा उडाला.

वाजपेयी

राजकीय इतिहासात एक असाही काळ होउन गेला ज्यावेळी वाजपेयी बोलत असायचे आणि त्यांचे विरोधक ऐकत बसायचे. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारताचे विदेश मंत्री बनले, भाजपाचे संसदेतील अस्तित्व जवळ-जवळ नामशेष होत आले होते तेव्हां बाजपेयींच्या नेर्तृत्वामुळेच भाजपचे संघटन दिवसेंदिवस वाढत गेले.

असे हसत खेळत वावरणारे अटलजी यांनी पन्नासवर्षा हून अधिक काळ राजकीय कारकीर्द गाजवली. १९९४ मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देखील मिळाला होता. कवि, साहित्यिक, निष्णात राजकारणी, बलवान व्यक्ते, पत्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

3 कारणे ज्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट नाय तर, बुमराह भारतीय संघाचा कर्णधार बनलाय…

0
बुमराह

3 कारणे ज्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट नाय तर, बुमराह भारतीय संघाचा कर्णधार बनलाय…


आजपासून इंग्लंड मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानचा चोथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे साहजिक भारतीय संघाच नेतुत्व पुन्हा विराट करतांना दिसेल असचं वाटत होत. पण  झालं उलटेच.

बीसीसीआयने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची संघाच्या कर्णधार पदी नियुक्ती करत सर्वांना चकित केले. जसप्रीत बुमराहला टीम इंडियाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. बीसीसीआयने गुरुवारी ही घोषणा केली. नियमित कर्णधार रोहित शर्मा कोरोनामुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे.

कपिल देव यांच्यानंतर भारताचा कर्णधार झालेला बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी उद्यापासून एजबॅस्टन येथे सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. अशा परिस्थितीत बुमराहला कर्णधार म्हणून मालिकेत संघाला विजयापर्यंत नेणे आवडेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

बीसीसीआयकडून सांगण्यात आले की रोहित शर्माची गुरुवारी सकाळी चाचणी करण्यात आली आणि तो पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. अशा स्थितीत तो या सामन्यातून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत निवड समितीने बुमराहला कर्णधार तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवले आहे. पंतने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अलीकडेच त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संघाची कमान मिळाली होती.

बुमराह

जसप्रीत बूमराहला कर्णधार बनवण्यामागची ही 3 महत्वाची कारणे.

१) वेगवान गोलंदाज म्हणून सर्वांत कुशल गोलंदाज.

भारतीय संघामध्ये कर्णधार व्हावं असा कोणता गोलंदाज असेल तर सध्या फक्त जसप्रीतचं नाव समोर येईल. त्यामुळेच त्याला या गोष्टीचा फायदा झाला. शिवाय आकडे पाहता तो एक उत्कृष्ट गोलंदाज तर आहेच परंतु तो  गोलंदाजीची कमान सुद्धा सांभाळू शकतो हे सिद्ध होतंय.

२) विराट कोहली पुन्हा कर्णधार होण्यास तयार नाही.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने सर्वच फोर्मेटमध्ये कर्णधार पद सोडून दिलंय. त्यामुळे तो पुढे कधीही संघाची कमान सांभाळणार नाही हे त्याने याआधीच स्पष्ट केलं आहे. म्हणूनच बिसिसीआयने  रोहित नसल्यामुळे विराटकडे कर्णधारपद न देता बूमराहला कर्णधार बनवलंय.

३) कर्णधार म्हणून रिषभ पंतची कमजोरी..

बूमराहच्या अगोदर कर्णधार पदाचा पर्याय म्हणून रिषभ पंतकडे पहिले जात होते. परंतु मागच्या काही सामन्यात रिषभ पंतची कामगिरी पाहता तो कर्णधार म्हणून संघामध्ये समतोल राखण्यात आणी आपली कामगिरी सुधारण्यात दोन्हीतही अपयशी ठरलाय. म्हणूनच संघाने बूमराहच्या रूपाने आणखी एक पर्याय शोधून त्याची चाचणी सुरु केली आहे. येणाऱ्या काळात जर बुम राहने आपली कामगिरी सांभाळत कर्णधारपद योग्यरीत्या हाताळलं तर, रिषभ पंतचं कर्णधारपद नक्कीच  धोक्यात येईल.

आता जसप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष लागलं आहे. हा कसोटी सामना आजपासून खेळला जाणार आहे..

असा असेल कसोटी संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश कृष्ण यादव, प्रशांत यादव. आणि मयंक अग्रवाल.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

 

 

 

भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचं काम ‘वसंतराव नाईक’ यांनी केलंय…

0
वसंतराव नाईक

भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचं काम वसंतराव नाईक यांनी केलंय…


वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.  महाराष्ट्र घडवण्यात नाईकांचा सिहांचा वाट राहिला आहे. त्यांचे असे मत होते की, ‘शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे.’ त्यांनी शेतीला उद्योगधंद्याची जोड दिली. शेती फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतीसाठी अनेक योजना आखल्या आणि कार्यान्वीत केल्या. शेती आणि शेतकरी हा त्यांचा अत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय होता. वसंतराव नाईक यांचा राजकीय प्रवास हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपरिषद अध्यक्षपदापासून सुरू होतो, मंत्री, खासदार, आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा मानही त्यांनीच मिळवला आहे.

शेती आणि शेतीविषयक सर्व बाबी लक्षात घेवून महाराष्ट्राची घडी बसवली. १९७२ चा दुष्काळ, कोयना भुकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत विचलीत न होता. धैर्याने निर्णय घेऊन महाराष्ट्राचा गाडा सुरळीत केला. महाराष्ट्राचे सीमा प्रश्न, कृष्णा-गोदावरी पाणी वाटवापर केंद्राला योग्य ती जाणीव करून दिली. कापूस खरेदी मधील एकाधिकार, ज्वारी-तांदूळ खरेदी, रोजगार हमी योजना, इ. अनेक उपक्रम आणि अनेक शेती संदर्भातील योजना राबवून शेतीचे आधुनिकीकरण त्यांनी आपल्या कार्यकाळ केले. म्हणून त्यांना कृषिक्रांतीचे प्रणेते असे संबोधले जाते आणि १ जुलै त्यांचा जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जात असतो.

वसंतराव नाईक यांनी कृषि विषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे करून वेगवेगळ्या शेतीपिकांच्या संकरीत वाणांचा स्वतः आधी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी तेथील शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पिक शेतकऱ्यांच्या हाती आले. त्यामुळे पुढे प्रत्येक जिल्ह्यात कापूस जिनिंग, सुतगिरणी, प्रेसिंग, तेलघाणी आदी सहकारी उद्योगांचे जाळे महाराष्ट्रात उभे राहिले.

त्यामुळे शेतकऱ्यांकडे त्यांच्या कष्टाचा  पैसा येऊ लागला. शेतकरी अर्थसक्षम झाला. संकरीत वाणाच्या गाई, म्हशींची पैदास करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविली. आणि तसेच दूध डेअरींच्या मार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय त्यांनी उभारून दिला. शेतकऱ्यांच्या हातात अधिकाधिक पैसा कसा जाईल यासाठी प्रयत्न केले. चिकू, द्राक्षे, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी आदी फळपिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना फळपिकांकडे आकर्षित केले. त्यांनी आपल्या १९५२ ते १९७९ या सत्ताविस वर्षाच्या कार्यकाळात शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या.

आचार्य विनोबांच्या भुदान चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवून यवतमाळ जिल्ह्यातून त्यांनी १ लाख ३७ एकर शेती दान स्वरूपात मिळवून भुमिहिनांना दिली. राजकीय क्षेत्रात असतांना त्यांनी राज्यात पंचायतराज कायद्याची मुहूर्तमेढ रोवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहचविली. महाराष्ट्र विकासाचे भगीरथ ठरले.

१९७२ सालच्या दुष्काळात नागरिकांच्या आणि जनावरांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आशा काळात त्यांनी देशात पहिल्यांदाच रोजगार हमी योजना महाराष्ट्रात राबविण्याचे धाडस केले. सुमारे सात हजारावर विहीरी खोदल्या, मध्यम धरणे, छोटे कालवे खोदली. त्यामुळे त्याकाळी ५० लाखावर ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाला होता.

वसंतराव नाईक

शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. समाज आणि सामाजिक परिवर्तनाची आधारशिला शिक्षण आहे. म. फुले म्हणतात, सगळ्या अनर्थाचे मूळ हे अविद्देत आहे. हे ओळखून शिक्षणाच्या प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये खाजगी शिक्षण संस्थेची उभारणी केली. नाईक यांनी आपल्याला हवे तसे सामाजिक बदल करून आणावयाचे असतील तर आपला समाज शिकला पाहिजे. याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. राष्ट्राच्या विकासासाठी आपला समाजाला शेतीकडे लक्ष देण्यास सांगितले, आणि याचं माध्यमातून समाजाला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणले. स्वतः शेतात राबून ते शेती करीत असल्याने त्यांची शेती फायदेशीर आणि प्रगत ठरली आहे. शेती व्यवसायामुळे त्यांना आपल्या भटकंतीला आता विराम लाभला, एक स्थिरपद जीवन प्राप्त झाले होते.

बंजारा स्त्रियांच्या पारंपरिक पध्दतीच्या वेशभूषेमुळे नी केशभूषेमुळे स्त्रियांमध्ये अनेक त्वचा रोगाचा उद्भव होत असे. नाईक यांनी या त्वचा रोगाच्या निर्मुलनासाठी एक कला पथक तयार केले होते. या पथकाच्या माध्यमातून पोषाख परिवर्तन चळवळ राबवली होती. या प्रसंगावर प्रा. संजय चव्हाण यांनी ‘द्रष्टे समाज सुधारक’ या लेखात म्हणतात की, “बंजारा समाजातील पोषाख पद्धतीत बदल करावा म्हणून नाईक यांनी गहुली-फुलउमली या गावापासून सुरुवात केली. पोषक बदलावा यामागील त्यांचा हेतू बंजारा संस्कृती, चालीरिती सोडणे असा नव्हता, तर समाजात अमुलाग्र बदल व्हावा हा उद्देश होता.” आणि आशा अनेक समाजसुधारणेचे कार्य वसंतराव नाईक यांनी केलेली आपण पाहू शकतो.

वसंतराव नाईक यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. त्याचबरोबर त्यांनी याची प्रेरणा घेत रोजगार हमी योजना देशभरात राबविली. शेतकऱ्यांसाठी अविरत झटणाऱ्या या क्रांतदर्शी समाजसुधारक, कृषिक्रांतीचे प्रणेते आणि समाज प्रबोधनकार यांचे १९७९ साली वयाच्या ६६ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. तद्पश्चात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी भटक्या, विमुक्तांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्यांना समाजभुषण पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या कृषी विषयक कार्याची दखल घेऊन दरवर्षी १ जुलै या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्यात कृषिदिन म्हणून साजरा केला जातो.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

शिंदेना मुख्यमंत्री बनवून देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात दोन नाय तर चार पक्षी मारलेत…

0
मुख्यमंत्री

शिंदेना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांनी एका दगडात दोन नाय तर चार पक्षी मारलेत…


राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, हे जवळपास निश्चित मानलं जाऊ लागलं. मात्र अखेरच्या क्षणी स्वत: फडणवीस यांनी पुढे येत आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन देत असल्याची घोषणा करत अवघ्या राज्याला आश्चर्याचा धक्का दिला. जे देवेंद्र फडणवीस वारंवार राज्य सरकारवर टीकेचे प्रहार करत सरकारला हादरा देण्यासाठी प्रयत्न करत होते, त्या फडणवीसांनी नेतृत्व करण्याची संधी आल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या  हाती सत्तेची सूत्रं कशी सोपवली, याचीच चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

आयुष्याची अनेक दशके ज्या व्यक्तीने शिवसेना उभी करण्यात घालवली, त्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचं अस्त्र उपसून आपलं राजकीय जीवन का पणाला लावलं, या प्रश्नाचं नेमकं उत्तर ना शिवसैनिकांना मिळत होतं, ना राजकीय जाणकारांना. मात्र शिंदे आणि भाजप यांचं सर्वकाही आधीच ठरलं होतं. आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या भेटीला जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी फडणवीस यांनी आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी भाजप पाठिंबा देणार असल्याची जाहीर केलं.

Devendra Fadnavis faces downsizing as his rivals get a leg-up in  Maharashtra BJP unit | Cities News,The Indian Express

भाजपने का केला धक्कातंत्राचा वापर? एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्यामागील चार कारणे…

१. उद्धव ठाकरे यांना शह, २०१९ चा हिशोब चुकता केला

खरं तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. मात्र शिवसेनेनं वेगळा मार्ग निवडला. शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडीची स्थापना करत उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला असतानाच २० जून ते ३० जून या अवघ्या १० दिवसांमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी राज्याचं राजकारण बदलून टाकलं. शिवसेनेचे ५५ पैकी तब्बल ३९ आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झाले. यातून उद्धव ठाकरे यांची पक्षसंघटनेवर पकड नसल्याचं चित्र समोर आलं. मुंबई, ठाण्यासह राज्यातील ग्रामीण भागातील अनेक आमदारांनी बंडखोर गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव यांच्या शिवसेनेचं संघटनही खिळखिळं होण्याची शक्यता निर्माण झाली. ज्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना २०१९ ला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं होतं त्याच उद्धव यांना स्वत:चाच पक्ष विरोधात उभा करून मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्याची किमया भाजपने करून दाखवली आहे.

2. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्तेचा ऑक्सिजन काढून घेतला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्थापनेपासून अनेक वर्ष सत्तेत राहिलेले पक्ष आहेत. २०१४ ला राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या दोन्ही पक्षांना विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाणं अवघड गेलं होतं. त्यातच २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक येईपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सत्तेत येणं शक्य होणार नसल्याचं २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालातून स्पष्ट झालं होतं. मात्र निकालानंतर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्याची ऐतिहासिक घटना घडली. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना पुन्हा सत्तेचा ऑक्सिजन मिळाला आणि कार्यकर्त्यांना पुन्हा बळ मिळालं. आता सरकार कोसळल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागणार आहे.

मुख्यमंत्री

३. मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज

शिवसेनेतीलच आमदारांनी बंडखोरी केल्याने मुख्यमंत्रिपद गमवावं लागलेल्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी राज्यात सहानुभूती निर्माण होत होती. तर दुसरीकडे, भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी ही खेळी खेळल्याचा आरोप करत शिवसेना कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत आम्हाला मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.

४. मुख्यमंत्रिपद नसलं तरी सत्तेची ताकद मिळणारच!

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असले तरी विधानसभेत १०६ जागा असणाऱ्या भाजपला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळणार, हे स्पष्टच आहे. अर्थमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची खाती भाजप आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपदाचा मोह टाळला असला तरी इतर महत्त्वाची खाती असल्याने राज्याच्या सत्तेची चांगलीच ताकद भाजपला मिळणार आहे. एकीकडे केंद्राची पूर्ण बहुमताची सत्ता पक्षाकडे असताना त्याला आता राज्यातील सत्तेचीही जोड मिळणार आहे. त्यामुळे पक्षसंघटन आणखी बळकट करण्यास आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यास भाजपला आणखीनच सोपं होणार आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या या 5 महिला खेळाडू मैदान गाजवतायेत..

0
महिला खेळाडू

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या या 5 महिला खेळाडू मैदान गाजवतायेत..


अलीकडच्या काळात महिला क्रिकेटने जागतिक स्तरावर मोठी प्रगती केली आहे. अशा अनेक महिला क्रिकेटपटू आहेत ज्यांनी अलीकडेच मैदानावर आपल्या प्रभावी कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, महिलांनी खेळाच्या तिन्ही पैलूंमध्ये चमकदार कामगिरी करून क्रिकेट चाहत्यांना दूरचित्रवाणीच्या पडद्यावर यशस्वीपणे खिळवून ठेवले आहे.

थापि, अशा काही महिला क्रिकेटपटू आहेत ज्या त्यांच्या चमकदार खेळाशिवाय त्यांच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या लेखात आपण जगातील पाच सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट महिला खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.

 एलिस पेरी: ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. क्रिकेट खेळणाऱ्या महान महिला क्रिकेटपटूंपैकी ती एक आहे. एलिस पेरी ही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. पेरीने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी पदार्पण केले.महिला खेळाडू

एलिस पेरी ही पहिली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू आहे जिने 126 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय तिने आतापर्यंत १२३ वनडे आणि १० कसोटी सामने खेळले आहेत.

कैनात इम्तियाज: पाकिस्तानची कैनत इम्तियाज देखील सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. ती पाकिस्तानी संघाची महत्वाची गोलंदाज आहे. सौंदर्याच्या बाबतीतही कैनात  इम्तियाजची स्पर्ध अभिनेत्रीशी आहे. कैनातने 2010 मध्ये पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. क्रिकेटशिवाय कैनात इम्तियाजने इतर अनेक खेळांमध्येही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

इम्तियाज सैफ सागा स्पोर्ट्स क्लबचा उपकर्णधार म्हणूनही काम करत आहे. 29 वर्षीय भारताच्या झुलन गोस्वामीकडून खूप प्रेरित आहे आणि खालच्या-मध्यम क्रमवारीतही ती बॅटने योगदान देऊ शकते. कैनातची पाकिस्तान आणि जगातील इतर देशांमध्ये चांगली फॅन फॉलोइंग आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

स्मृती मानधना: ही यादी भारताच्या स्मृती मानधनाशिवाय अपूर्ण आहे. क्वचितच असा कोणी क्रिकेट चाहता असेल ज्याला मंधानाबद्दल माहिती नसेल. ही फलंदाज सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट भारतीय महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि तिने आपल्या शानदार खेळाने संपूर्ण क्रिकेट विश्वात स्वतःचे नाव कमावले आहे. स्मृती यांचे जगभरात प्रचंड चाहते आहेत आणि त्यांना भारताचा राष्ट्रीय क्रश म्हणूनही ओळखले जाते.

स्मृती मानधना खेळासोबतच तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. स्मृती मानधना हिची क्रेझ भारतातील तरुणांमध्ये कोणत्याही अभिनेत्रीइतकीच आहे. ती तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्याने शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

महिला खेळाडू

सारा टेलर: इंग्लंडची विकेटकीपर-फलंदाज सारा टेलरला त्या काळातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक म्हणणे चुकीचे ठरणार नाही. टेलरने आपल्या देशासाठी 126 एकदिवसीय सामने खेळले आहेत तसेच 90 टी-20 सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. सर्वोत्कृष्ट महिला यष्टीरक्षकांपैकी एक असण्याबरोबरच, 32 वर्षीय ती तिच्या सौंदर्य आणि स्मार्ट व्यक्तिमत्त्वासाठी देखील प्रसिद्ध आहे. खेळाव्यतिरिक्त ती तिच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये त्याने 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला होता.

हरलीन देओल : 23 वर्षीय क्रिकेटर हरलीन देओल सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींशी स्पर्धा करते. सर्वात देखण्या खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. तिचे लाखो तरुण चाहते आहेत आणि ती इंस्टाग्रामवर देखील खूप सक्रिय आहे. त्याचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

हरलीनच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने आतापर्यंत 13 टी-20 आणि एक वनडे सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. हरलीन खेळासोबतच अभ्यासातही टॉपर आहे. 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत त्याने 80 टक्के गुण मिळवले होते. याशिवाय भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणारी ती चंदीगडची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

मुख्यमंत्रीपदी जरी ‘शिंदे’ बसले तरी, सत्तेचा रिमोट मात्र फडणविसांच्याच खिश्यात असणारे….

0
शिंदे

मुख्यमंत्रीपदी जरी शिंदे बसले तरी सत्तेचा रिमोट मात्र फडणवीसच्याच खिश्यात असणारे….


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस नसणार मात्र, राज्यातील या नव्या सरकारचा रिमोट त्यांच्या हातात असणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदारांसह सहकारी घटक पक्ष आणि  भाजप यांच्या युतीचे सरकार आता राज्याचा कारभार हाकणार आहेत. भाजप आणि सहकारी अपक्ष, घटक पक्षांचे 120 आमदारांचे बळ शिवसेनेच्या बंडखोरांना मिळाले आहे. त्यामुळे आता राज्यात नव्या सरकारकडे जवळपास 170 आमदारांचे पाठबळ असणारे सरकार स्थापन होणार आहे. राजभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, भाजप सत्तेच्या मागे धावणारी नाही. ही लढाई हिंदुत्वाची आहे, तत्वांची आहे, विचारांची आहे. या नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहे. पुन्हा एकदा हिंदुत्वाचे सरकार स्थापन होत असल्याचे त्यांनी म्हटले.

शिंदे

देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भाजप आणि अपक्षांचा समावेश असणार आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे या मंत्रिमंडळात सहभागी असणार नाहीत. त्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहेत.

 सत्तावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झाले नाही. एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी  इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या सरकारमध्ये सर्वाधिक आमदार भाजप आणि मित्र पक्षाचे आहेत. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांची संख्या अधिक असणार आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्तेचा रिमोट असणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे मंत्रिमंडळावर असलेले वर्चस्व आणि देवेंद्र यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव याआधारे राज्य सरकारचा रिमोट त्यांच्या हाती असणार आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर, मुद्यांवर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

या महिला गोलंदाजाने केलेला ‘विक्रम’ आजपर्यंत एकही पुरुष खेळाडू सुद्धा मोडू शकला नाहीये..

0
गोलंदाज

या महिला गोलंदाजाने केलेला ‘विक्रम’ आजपर्यंत एकही पुरुष खेळाडू सुद्धा मोडू शकला नाहीये..


क्रिकेटच्या मैदानावर कधी कधी असे विक्रम बनतात, जे मोडणे खरच इतर खेळाडूंसाठी अवघड होऊन बसत. अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक पुरुष खेळाडू आहेत ,ज्यांचे विक्रम आजपर्यंत कोणालाही सहसा मोडता आलेले नाहीयेत. परंतु आज आपण एखाद्या पुरुष खेळाडूच्या विक्रमाची चर्चा करणार नाहीयेत तर आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे महिला खेळाडू ‘डेन व्हॅन निकेर्कची.

आता तुम्हाला वाटत असलं ही महिला नक्की कोण? तर सांगतो ही खेळाडू महिला दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तिने नक्की काय विक्रम केला आणि कसा,हे  जाणून घ्यायचं म्हटल तर आपल्याला 2071 सालच्या महिला विश्वचषकात जावं लागलं. त्याचाच हा किस्सा..

आंतरराष्ट्रीय महिला विश्वकप सुरु होता. या स्पर्धेत भारतीय संघासोबतच इतरही अनेक संघ चांगली कामगिरी करत होते. यावेळी महिला विश्वचषकात अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असून अनेक विक्रमही केले होते या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आजवरचा जगातील सर्वांत मोठा विक्रम झाला. हा विक्रम पुरुष गटात कोणत्याही खेळाडूने केला नाही तर आफ्रिकन संघाची कर्णधार डेन व्हॅन निकेर्कने केला होता. हा विक्रम म्हणजे  एकही ‘धाव न देता 4 बळी घेणे’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा विक्रम दुसर कोणीही करू शकलं नाहीये. मग तो पुरुष संघात असो अथवा महिला संघात.

 महिला विश्वचषकाचा 12वा सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला. हा सामना खूपच रोचक होता. या सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 48 धावांत आटोपला. महत्त्वाची बाब म्हणजे दक्षिण आफ्रिची कर्णधार डेन व्हॅन निकेर्कने शानदार गोलंदाजी करताना विश्वविक्रम केला. ३.२  षटके टाकून तिने एकही धाव न देता  ४ गडी बाद केले होते..

गोलंदाज

महिला क्रिकेटमध्ये अनेक अद्भुत विक्रम आहेत. यामध्ये जर आपण कमीत कमी धावा देऊन जास्त विकेट्स मिळवण्याबद्दल बोललो तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार निकेर्क पहिल्या क्रमांकावर आहे, कारणतिने  ने एकही धाव न देता चार विकेट घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ वेस्ट इंडिजचा गोलंदाज कोर्टनी वॉल्शचा क्रमांक लागतो, ज्याने 1 धावात 5 बळी घेतले. त्याचबरोबर भारतीय संघाची खेळाडू दीपा मराठेही त्यांच्या पाठोपाठ आहे. दीपाने 1 धावात 4 विकेट घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात खेळला गेलेला सामना आफ्रिकन संघाने 10 गडी राखून जिंकला होता पण हा सामना ओळखल्या जाऊ लागला तो कर्णधाराच्या या अनोख्या कामगिरीसाठी. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद होईपर्यंत केवळ 48 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने ४.२ षटकांत सामना जिंकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांनी संघाला विजय मिळवून दिला. संघाचा अनुभवी गोलंदाज मारिजनेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. तिने  महत्त्वाचे 4 बळी घेतलेले.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनद जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

0
सनद जयसूर्या

श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज सनथ जयसूर्या.पण एक काळ असा होता की सनथ जयसूर्या संघात गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. एक फिरकी गोलंदाज जो मैदानात त्याच्या चेंडूने मोठ्या फलंदाजांना त्रास देऊ शकतो. सनथ जयसूर्या जयसूर्याने कसोटी क्रिकेटमध्ये 110 सामन्यांमध्ये 6973 धावा केल्या आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 445 सामन्यांमध्ये 13430 धावा केल्या आहेत, सनथ जयसूर्याचा स्ट्राइक रेट एकदिवसीय क्रिकेटमध्ये 91 च्या वर आहे. पण विचित्र गोष्ट म्हणजे सनथ जयसूर्या इतकी अप्रतिम फलंदाजी करू शकतो हे एकेकाळी श्रीलंकेच्या संघातील कोणालाही माहीत नव्हते. सनथ जयसूर्याला सलामीला फलंदाजी करायला लावले नाही, पण खालच्या क्रमाने गोलंदाजीसाठी तो अधिक ओळखला जात होता.

 

त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला, सुमारे 5-6 वर्षे सनथ जयसूर्याला फिरकीपटू मानले जात होते, परंतु अचानक रणतुंगाच्या नेतृत्वाखाली त्याला सलामी फलंदाज म्हणून भरपूर संधी देण्यात आल्या आणि त्याने या संधींचा फायदाही घेतला. १९९६ चा विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघात सनथ जयसूर्याचा मोठा हात होता. त्या विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्याबद्दल जयसूर्याला मालिकावीराचा किताब देण्यात आला.

1996 ची गोष्ट आहे की जयसूर्याने 17 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. हा सामना पाकिस्तान विरुद्ध झाला. अर्थात, पाकिस्तानी क्रिकेट संघाने सामना जिंकला होता, पण जयसूर्याने 17व्या चेंडूवर षटकार मारून 50 धावा पूर्ण करताच, 17 चेंडूत 50 धावा करण्याचा विश्वविक्रम आहे.

सनद जयसूर्याच्या कारकिर्दीतल हे महत्वाचे किस्से..

# 1996 च्या विश्वचषकानंतर, ज्या स्पर्धेत त्याने सर्वात वेगवान 50 धावा केल्या त्याच स्पर्धेत त्याने 48 चेंडूत शतकही झळकावले होते. त्या काळात एखाद्या फलंदाजाने ५० पेक्षा कमी चेंडूत धावा केल्याचं हे पहिलंच शतक होतं. हा विक्रम यापूर्वी कोणीही केला नव्हता. नंतर शाहिद आफ्रिदी, कोरी अँडरसन आणि डिव्हिलियर्स हा विक्रम मोडताना दिसले. जयसूर्याने 48 चेंडूत शतक झळकावले.

# 2006 श्रीलंका इंग्लंड विरुद्ध सामना खेळत होता. या सामन्यात जयसूर्याने 95 चेंडूत 150 धावा केल्या. 2011 मध्ये हा विक्रम शेन वॉटसनने मोडला होता, जो अलीकडे एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. जयसूर्याने ते सर्व रेकॉर्ड केले जे नंतर इतर खेळाडूंना तोडावे लागले.

सनथ जयसूर्याच्या कारकिर्दीत अनेक शानदार खेळी झाल्या आहेत, पण त्याच्या कारकिर्दीतील तीन डाव आहेत ज्या तो स्वत: कायमस्वरूपी पाहण्यास आवडेल.

#1996 चा विश्वचषक चालू होता. हा उपांत्यपूर्व सामना होता. श्रीलंका इंग्लंडसोबत खेळत होता. जयसूर्याने ठरवले होते की आपण इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार मारा करायचा. इंग्लंडला सावरण्याची संधी मिळाली नाही आणि जयसूर्याने 44 चेंडूत 82 धावा केल्या. इंग्लंडने श्रीलंकेला 236 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र 44 चेंडूत 82 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने सामना सहज जिंकला. यानंतर श्रीलंकेने भारताविरुद्ध सेमीफायनल जिंकली आणि फायनल ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि 1996 च्या वर्ल्ड कपवर श्रीलंकेने कब्जा केला.

सनद जयसूर्या

#शारजाच्या आत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होता. या सामन्यात जयसूर्याने कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या केली.सनथ जयसूर्याने 189 धावा केल्या. या सामन्यात श्रीलंकेने 299 धावा केल्या, ज्यात जयसूर्याने अर्ध्याहून अधिक धावा केल्या. जयसूर्याने या सामन्यात 21 चौकार आणि 6 षटकार मारले. टीम इंडिया अवघ्या 54 धावांवर बाद झाली. एकट्या जयसूर्याने जितक्या धावा केल्या तितक्या धावा टीम इंडियाला करता आल्या नाहीत.

#1996 च्या विश्वचषकानंतर श्रीलंका सिंगर कप खेळण्यासाठी गेला होता, ज्यामध्ये जयसूर्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रथमच 50 चेंडूंमध्ये शतक झळकावताना दिसला होता. त्याने 65 चेंडूत 134 धावा केल्या. ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात स्फोटक खेळीही म्हणता येईल.

सनथ जयसूर्या हा क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 पेक्षा जास्त आणि 300 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर ३२३ विकेट्स असून त्याने वनडे क्रिकेटमध्ये १३४३० धावा केल्या आहेत.

सनथ जयसूर्याबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते की तो स्टँडिंग शॉट्स शूट करण्यात माहीर होता. जगात फार कमी फलंदाज अशी कामगिरी करू शकतात जेव्हा ते पावले वापरत नाहीत आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे जातो. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागही अशीच फलंदाजी करायचा, पण जयसूर्यासारखा झंझावाती फलंदाज आजवर जगात नाही. तो ज्या स्टाईलने फलंदाजी करत असे त्यामुळे गोलंदाज तसेच विरोधी संघातील एकूण 11 खेळाडू, जे मैदानावर असायचे, त्यांचे केस उभे करायचे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

जसप्रीत बूमरह

निवृत्ती घेईपर्यंतही इंग्लंडचा ‘स्टुअर्ट’ एक नाव कधीच विसरणार नाय…ते म्हणजे ‘जसप्रीत...

0
निवृत्ती घेईपर्यंतही इंग्लंडचा 'स्टुअर्ट' एक नाव कधीच विसरणार नाय...ते म्हणजे 'जसप्रीत बूमराह'.. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला अनेक...
मलायका अरोरा

‘रिअ‍ॅलिटी शो’चं मार्केट वाढलंय त्याच श्रेय अभिनेत्री मलायका अरोराला जातंय..

0
  २०१७ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गावाकडं जिओचं सिम मार्केर्टमध्ये आल्याची खबर पोरांना मिळू लागली होती. त्यासाठी 4G मोबाईलची गरज असल्याचा साक्षात्कार देखील त्याच काळात आम्हा...
वाजपेयी

महिला पत्रकाराने वाजपेयींना ‘लग्न का करत नाहीत? असा प्रश्न विचारला, आणि...

0
महिला पत्रकाराने वाजपेयींना 'लग्न का करत नाहीत? असा प्रश्न विचारला, आणि त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळेच हैराण झाले.. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आता आपल्यात नाहीत परंतू त्यांच्या...
बुमराह

3 कारणे ज्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट नाय तर, बुमराह भारतीय...

0
3 कारणे ज्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट नाय तर, बुमराह भारतीय संघाचा कर्णधार बनलाय... आजपासून इंग्लंड मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानचा चोथा कसोटी सामना...
वसंतराव नाईक

भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचं काम ‘वसंतराव नाईक’ यांनी केलंय…

0
भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचं काम वसंतराव नाईक यांनी केलंय... वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.  महाराष्ट्र घडवण्यात नाईकांचा सिहांचा वाट...