घरातून पळून गेलेल्या प्रेमीयुगलांना हिमाचल प्रदेशमधील या महादेव मंदिरात आश्रय दिला जातो..

 

 

 

कॉलेज वयातच  प्रेमीयुगल पळून जाण्याचं प्रमाण जास्त आहे. शिवाय मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये पाहून आजकाल पळून जाणाऱ्या प्रेमीयुगलांना आपण आपलं प्रेम मिळवतोय यासाठी पळून जाणे काहीही गैर नाही, असाच समज झाला आहे.प्रेम करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, परंतु आई – वडिलांच्या विरोधाने अथवा दुसऱ्या कारणांमुळे पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय चुकीचा कि बरोबर हे ज्यांच्या त्यांच्या विचारानुसार आहे.

 

हिमाचल प्रदेश  नैसर्गिक हिल स्टेशनसाठीच फेमस नाहीये तर,येथील इनके प्राचीन मंदिरे सुद्धा प्रसिद्ध आहेत. या भागातील मंदिर हे भक्तांसाठी सदैव खुले असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या मंदिराबद्दल सांगणार आहोत, जेथे पळून गेलेल्या प्रेमीयुगलांना राहण्यासाठी सहारा दिला जातो.

ते मंदिर म्हणजे शंगचूल महादेव मंदिर.

महादेव

हिमाचल प्रदेश मधील शंगचूल महादेव मंदिर हे पळून गेलेल्या प्रेमीयुगलांना आश्रय देण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक प्रेमीयुगलांना आश्रय दिल्या जातो.शिमला, कुर्ला, मनाली सारख्या अनेक प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये शंगचूल महादेव मंदिर आहे, जेथे अनेक भागातून लोक येत असतात.

 

परंतु या मंदिराचे वैशिष्ट्य हे आहे कि, या मंदिरात पळून आलेल्या प्रेमीयुगलांना आश्रय दिला जातो. येथील पुजारी या प्रेमीयुगलांची सर्व सुविधा करतात.असं म्हटलं जात कि, एकदा पळून आलेले जोडपे या मंदिराच्या आवारात आले कि नंतर कोणीही त्यांचे काहीही करू शकत नाही.शंघचूल  महादेव मंदिर हिमाचल प्रदेशच्या  कुल्लू घाटीच्या शांघड गावात आहे. १०० गुंठ्यावरील या मंदिराच्या आवारात एकदा “प्रेमीयुगुल” आले कि मग त्यांना कोणी काहीही करू शकत नाही. मग ते पोलीसवाले असो अथवा स्वतः त्यांच्या घरचे नातेवाईक..

शंगचूल महादेवाच्या शरणात आल्यामुळे ते जोपर्यंत या मंदिराच्या हद्दीत आहेत, तोपर्यंत त्यांचे आई -वडील अथवा ईतर कोणीही त्याना काहीही करू शकत नाहीत. असं म्हटलं जात कि त्यांची सुरक्षा स्वतः शंगचूल महादेव करत असतात. तसेच त्यांना शंगचूल महादेव मंदिरात शरण आल्याचा मान मिळतो.

या मंदिराची ख्याती दूरदूर पसरलेली आहे. येथे पोहचल्यानंतर तुम्हाला येथे जास्तीत जास्त प्रेमी जोडपेच दिसतील. या गावात पोलिसांना बंदी घातलेली आहे. गावात कायदा व सुव्यवस्थेचा भार सर्व महादेवं यांच्यावर आहे. त्यांच्यावर असेलल्या श्रद्धेपोटी कोणीही  येथे मोठ्या आवाजात सुद्धा बोलत नाही. भांडण करणे तर लांबची गोष्ट आहे.

मंदिर

काही वर्षांपूर्वी या मंदिरात भीषण आग लागून,मोठे नुकसान झाले होते. ही आग एवढी भयानक होती कि मंदिरातील सर्व वस्तू जळूनखाक झाल्या. परंतु गाव वाल्यानी शंगचूल महादेवांचा रथ वाचवला होता. त्यामुळेच महादेव येथील गावकऱ्यांवर प्रसन्न झाले होते.

या मंदिराच्या आवारात कोणीही हत्यार घेऊन जाऊ शकत नाही. आणि गावात कोणत्याही प्रकारचे भांडणे होत नाहीत.येथे देवाची एवढी महिमा आहे की, कोणीही मंदिराच्या आवारात मोठ्या आवाजात सुद्धा बोलत नाही.

पळून आलेल्या जोडप्यांचे नातेवाईक जोपर्यंत त्यांचा स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत येथे त्यांना आश्रय दिल्या जातो. महादेवाच्या आवारात असे पर्यंत कोणीही या प्रेमीयुगलांचं काहीही वाईट करू शकत नाही असं म्हटल असते.

प्राचीन कथेनुसार असं म्हटलं जाते की या मंदिरात पांडवांनी आश्रय घेतला होता, त्यांचा पाठलाग करत कौरव तेथे आले होते, ज्यांना महादेवांनी अडवले होते. महादेवांच्या भीतीने कौरव पळून गेले होते.

तेव्हापासून सहाऱ्याची गरज असलेल्या व्यक्तींना या मंदिरात सहारा दिला जातो आणि स्वतः महादेव त्यांच रक्षण करतात.या कारणामुळे हिमाचल प्रदेश मधील हे मंदीर खूप प्रसिद्ध आहे. आणि येथे हजारो लोक दरवर्षी महादेवांच्या दर्शनासाठी येत असतात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top