Smriti Mandhana Odi Record: महिला एकदिवशीय विश्वचषकमध्ये भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) काल ( गुरुवारी) इतिहास रचला. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने मोडला.
विशाखापट्टणम येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयसीसी महिला विश्वचषक सामन्यादरम्यान तिने ही कामगिरी केली. मानधनाने आठव्या षटकात अयाबोंगा खाकाला षटकार मारून २८ वर्षे जुना विक्रम मोडला.

Smriti Mandhana Odi Record: मानधनाने बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडला!
मागील अनेक वर्षापासून हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता, तिने १९९७ मध्ये एका वर्षात ९७० धावा केल्या होत्या. मानधनाने २०२५ मध्ये तिच्या शानदार कामगिरीने हा विक्रम मोडला.
सामना सुरू होण्यापूर्वी ती ९५९ धावांवर होती आणि एका षटकारासह एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. स्मतीने आता १७ सामन्यांमध्ये एकूण ९८२ धावा केल्या आहेत. तिची सरासरी ५७.७६ आहे आणि तिचा स्ट्राइक रेट ११२.२२ आहे. या वर्षी तिने चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. तिचा सर्वोच्च धावसंख्या १३५ आहे. तिने १२२ चौकार आणि २४ षटकारही मारले आहेत.
स्मृती मानधना लवकरच एकदिवशीय क्रिकेटमध्ये पूर्ण करणार 5000 धावा.!
स्मृती मानधना लवकरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५,००० धावांचा टप्पा ओलांडू शकते. ती असे करणारी दुसरी भारतीय महिला आणि एकूण पाचवी महिला क्रिकेटपटू ठरेल.
एका वर्षात एकदिवशीय फोर्मेट मध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडू शकते स्मृती मानधना.!
जर स्मृतीने पुढील सामन्यात फक्त १८ धावा केल्या तर ती, या वर्षी १००० धावा पूर्ण करेल. जर असे झाले तर ,ती अशी कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनू शकते.

शिवाय, मानधना २०२५ मध्ये चार शतके झळकावली आहेत, जी एका वर्षात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक शतके आहेत. दक्षिण आफ्रिकेची तझमिन ब्रिट्झ या यादीत पहिली आहे, तिने या वर्षी पाच शतके झळकावली आहेत.
एका केलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारे महिला खेळाडू.!
-
स्मृती मानधना* भारत (९८२) २०२५
-
बेलिंडा क्लार्क ऑस्ट्रेलिया (९७०) १९९७
-
लॉरा वुलवार्ड दक्षिण आफ्रिका (८८२) २०२२
-
डेबी हॉकली न्यूझीलंड (८८०) १९९७
एमी सॅटर्थवेट न्यूझीलंड (८५३) २०१६
हेही वाचा:
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीमध्ये?,पोर्णग्राफीनंतर या प्रकरणात अडकला राज कुंद्रा..!
Kantara chapter 1 पाहून केएल राहुल भारावला, रिषभ शेट्टीसाठी केले खास वक्तव्य..!