अतिशय क्रूर असलेली ही महिला कधी डाकू बनून जिवंत लोकांचे डोळे काढून घ्यायची..!

By | June 28, 2022

अतिशय क्रूर असलेली ही महिला कधी डाकू बनून जिवंत लोकांचे डोळे काढून घ्यायची..!


 

आजपर्यंत अनेक क्रूर, हिंसक टाकूबद्दल आपण ऐकले असेल. तसेच काही गरिबीची मदत करणाऱ्या डाकूंच्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असतीलच.परंतु आज ज्या महिला डाकूबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तिची कथा आणि क्रूरता पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

ही महिला डाकू म्हणजे चंबलची क्रूर डाकू “कुसुमा नयन” होय. जिच्या भीतीने तब्बल 26 वर्ष चंबल परिसरातील लोक भीतिने जिवन जगत होते. डाका टाकत असताना गावातील मोठं मोठे पहेलवान लोक तिच्यासमोर यायला सुद्धा घाबरत असतं. तीला जर डाका टाकतेवेळीस  कोणी अडवले अथवा तिच्या कामात अडथळा निर्माण केला तर ती रागाने त्या माणसाचे डोळे काढून टाकत असे.

 डाकू

महत्वाची गोष्ट म्हणजे कुसुम लूट करत असताना स्वतःजवळ एकही शस्त्र,बंदूक सांभाळत नसे. जरी कुसुमा नयन ची चर्चा फार जास्त झाली नसली तरी सुद्धा क्रूरतेचा बाबतीत ती फुलनदेवीपेक्षा कमी जराही कमी नव्हती.

कोण होती कुसुमा नयन?

कुसुमा नयन ही लहानपणी खुप भोळी होती. ती तिसऱ्या वर्गात शिकत असताना एका व्यक्तीने तीचे अपहरण करून डाकूंच्या टोळीत विकले. कुसुमाणे तिचा डाकू बनण्याचा प्रवास याच डाकू विक्रम मल्ला याच्या टोळीतुन केला. याच टोळीत फुलंदेवी सुद्धा होती.

काही दिवसांनी फुलंदेवीसोबत तिचे पटत नसल्यामुळे ती नालाराम डाकूंसोबत काम करू लागली. नालाराम डाकुच्या टोळीत सहभागी होताच तिने तब्बल 14 मल्लांना गोळ्या घालून ठार केले. आणि तिची दहशत सगळीकडे पसरायला सुरवात झाली. आणि ती तेथील सर्वांत खतरनाक डाकू म्हणून प्रसिद्ध व्हायला लागली.

जेव्हा लालाराम डाकू कमजोर पडला तेव्हा कुसुमाने टोळी बदलून डाकूंचा गुरु समजल्या जाणारा क्रूर डाकू फक्कडबाबाच्या टोळीत सामील झाली.तेथे सुद्धा तिच्या क्रूरतेमुळे ती सर्वांच्या वर होती. फक्कडबाबाला भेटल्यानंतर तिचा रुबाब आनखीनच वाढला होता.

कुसुमाच्या देखरेखेखाली या टोळीने उत्तरप्रदेशमध्ये तब्बल 220 पेक्षाही गुन्हे केले. ज्यात तिने अनेक जणांचे अतिशय क्रूरतेने डोळे सुद्धा काढून टाकले. तिच्या वाढत्या क्रूरतेमुळे तीला पकडून देणाऱ्यास त्याकाळी दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आजच्या घडीला त्याची किंमत तब्ब्ल दहा लाख रुपये होते.

डाकू

फक्कडबाबा आणि कुसुमाच्या देखरेखेत वाढणाऱ्या ना टोळीतील डाकूंकडे अनेक विदेशी हत्यार सुद्धा उपलब्ध होते. परंतु फक्कडबाबाच्या एका चुकीमुळे त्याच्या संपूर्ण टोळीचा विनाश झाला होता.

फक्कडबाबाच्या टोळीतील डाकूंनी एका व्यक्तीचे अपहरण करून 50 लाख रुपयांची फिरोती मागितली होती. परंतु रक्कम न मिळाल्यामुळे त्याचा खून करण्यात आला. मेलेल्या व्यक्तीच्या घरच्यांनी फक्कडबाबा आणि कुसुमवर केस केली होती.

एका मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून कुसुमा आणि फक्कडबाबासह अन्य साथीदारांना अटक केली.
अनके वर्ष चाललेल्या या केसमध्ये शेवटी फक्कडबाबा आणि कुसुमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
आणि अशा पद्धतीने एका क्रूर महिला डाकुला पुढील संपूर्ण जिवन जेलमध्ये काढावे लागेल.


हेही वाचा:

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *