आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
मुघलांच्या नाकावर टिच्चून या अहम योध्याने तब्बल 17 वेळा मुघलांना धूळ चारली होती..
आपण सर्वांनीच मुघल आणि राजपूत यांच्या मध्ये झालेल्या युद्धांबद्दल ऐकलेच असेल. बाबर सोबत झालेल्या लढाईत शरीरावर शेकडो घाव झालेले असताना स्फूर्तीने लढणाऱ्या राणा सांगा यांची वीरता आणि गवताची भाकरी खावून अकबर सोबत युध्द करणाऱ्या महाराणा प्रताप यांचा पराक्रम सर्वांना माहित आहे. परंतु आज आपण जाणून घेणार आहोत इतिहासात जास्त महत्व न दिल्या गेलेल्या आणि मुघलांना अक्षरशः नाकेनऊ आणणाऱ्या आसामच्या अहोम योद्ध्यांबद्दल.
मुघल आणि अहोम यांची शत्रुता ५० वर्षापूर्वीपासून चालत आली होती. सर्वप्रथम १६१५ मध्ये मुघलांनी अबू बाकर याच्या नेतृत्वाखाली विशाल सेना अहोमांवर विजय मिळवण्यासाठी पाठवली होती परंतु त्यावेळेसही मुघालांनाच हार पत्करावी लागली होती.
मुघल-अहोम यांच्यामध्ये वाढलेल्या तणावाला एक कारण हे पण होते की, शहाजहान आजारी पडल्यावर त्याच्या मुलांमध्ये राजगादी साठी कट कारस्तान सुरु झाले होते. या गोष्टीचा फायदा घेत अहोम राजा जयध्वज सिंह यांनी मुघलांना आसाम मधून खदाडून लावले आणि गुवाहाटी पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.
परंतु खरी समस्या तेंव्हा उद्भवली जेंव्हा मुगल सम्राट औरंगजेबाने बंगालचा सुभेदार मीर जुमला याला त्या प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पाठवले. मीर जुमला याने आपल्या स्वारीमध्ये अहोम राज्यातील अनेक गावांवर कब्जा करत तेथील अमाप संपती लुटली होती.
आसामला पूर्वी कामरूप किंवा प्राग्यज्योतियशपुरा या नावाने ओळखल्या जायचे. या साम्राज्याची राजधानी आजचे गुवाहाटी हे शहर होते. या साम्राज्यात आसामची ब्रह्मपुत्र वैली, रंगपुर, बंगाल चे कूच-बिहार आणि भूटान हे प्रदेश सामील होते.
ज्याप्रकारे मुघलांना छत्रपती शिवरायांच्या मराठमोळ्या मावळ्यांनी प्रत्येकवेळी टक्कर देऊन हरवले त्याच प्रमाणे अहोमाच्या शूर वीर योद्ध्यांकडून सुद्धा मुघलांना सदैव पराभव स्वीकारावा लागला. अहोम आणि मुघालांमध्ये १८ वेळेस युध्द झाले परंतु प्रत्येक वेळी मुघलांना माघारी परतावे लागले होते.

आसाममध्ये आजही १७ व्या शतकातील अहोम योद्धा लाचित बरफूकन यांना खूप सन्मान दिला जातो. बरपुखान यांच्या नेतृत्वाखाली पूर्वेकडे मुघलांच्या विस्तारवादी अभियानाला कधीही पूर्ण होऊ दिले नाही. ऑगष्ट १६६७ मध्ये लाचित यांनी ब्रह्मपुत्र नदीच्या किनाऱ्यावरील मुघलांच्या छावणीवर जोरदार आक्रमण करून मुघल कमांडर सैय्यद फिरोज खान सोबत अन्य मुघल सैनिकांना कैद केले होते.
या घटनेनंतर मुघल दरबारामध्ये हाहाकार माजला होता. मुघलांचा एवढा मोठा अपमान त्यांना सहन झाला नाही त्यामुळेच मुघल बादशहा ने खूप मोठी फौज अहोम यांच्यासोबत युध्द करण्यासाठी पाठवली. एवढा मोठा फौजफाटा बघून अहोम शरण येतील असा सर्व मुघल सरदारांचा समज होता. परंतु वास्तवतः जे घडले ते आज इतिहास म्हणून शिकवले जाते.
जेंव्हा नेवल वॉर किंवा जलसंग्रामाची चर्चा होते तेंव्हा हे युध्द अवश्य आठवले जाते. मुघल सैनिक शेकडो नावांमध्ये आले होते तर याउलट लाचित यांच्या नेतृत्वाखाली अहोम सैनिक केवळ ७ नावांमध्ये बोटावर मोजण्या एवढे होते. परंतु या अहोम सैनिकांनी मुघल फौजेवर असा हल्ला चढवला कि मुघल सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले . या युद्धामध्ये लाचित बरफूकन यांना वीरगती प्राप्त झाली परंतु परत मुघलांनी कधीही पूर्वेकडे जाण्याची हिम्मत केली नाही. असा दरारा लाचित बरफूकन यांनी निर्माण केला होता.
५०००० पेक्षा जास्त संख्येने आलेल्या मुघल सैन्याचा पराभव करण्यासाठी लाचित यांनी जलयुद्धाचे धोरण स्वीकारले. ब्रह्मपुत्र नदी व आजूबाजूचा डोंगराळ भागाचा उपयोग करत त्यांनी मुघल सैनिकांना रडकुंडीस आणले होते. त्यांना माहित होते की मुघल सेना कितीही बलवान असली तरी त्यांचा पाण्यात पराभव होऊ शकतो. म्हणूनच लाचित यांनी नदीमध्ये मुघल सैनिकांच्या मागून आणि समोरून हल्ला केला यामुळे मुघल सेना हतबल झाली होती. त्याचबरोबर त्यांचा सेनापती मुन्नवर खान हादेखील मारल्या गेला होता.
आसाम सरकारने २००० पासून लचीत यांच्या स्मरणार्थ लाचित बरफूकन हा पुरस्कार सुरू केला आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी मधून उत्तीर्ण झालेल्या सर्वश्रेष्ठ उमेदवाराला हा मानाचा पुरस्कार दिल्या जातो.आजही आसाममध्ये अनेक ठिकाणी लाचित यांचे पुतळे उभारले आहेत.
मराठा आणि राजपूत यांच्या सारख्या अनेक साम्राज्यांप्रमाणे मुघालाशी लढणारे अहोम साम्राज्यातील योद्धे पण सन्मानाचे पात्र आहेत. आसाममध्ये आजही २४ नोव्हेंबर हा ‘लाचित दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..