आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
बिस्कीट म्हटलं की आजही आपसूकच ‘पारले-जी’ हातात टेकवला जातो तो या माणसाच्या मेहनतीमुळे…
भारतामध्ये असा कोणताही एक व्यक्ती नसेल ज्याला पारले-जी बिस्कीट बद्दल माहीत नसेल. ते बिस्कीट आहे जे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून लोकांचा चहासोबत चा साथीदार आहे .लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी हे बिस्किट खास आहे. लोकांच्या खूप साऱ्या आठवणी बिस्कीट सोबत जोडून आहेत.
पारले-जी हे भारतातील पहिले बिस्किट होते जे भारतात बनले आणि सर्व साधारण भारतीयांसाठी बनले. चला तर मग जाणून घेऊया कसे बनले पारले-जी देशातील सर्वात लोकप्रिय बिस्कीट. पारले-जी हे नाव ऐकताच आपल्या डोक्यामध्ये बिस्किटाचे पिवळ्या रंगाचे पॅकिंग त्यावर असणार्या छोट्या मुलीचा फोटो आणि बिस्किटांची डिझाईन या सगळ्या गोष्टी येतात. पारले-जी हा फक्त आपल्याच जीवनाशी जोडला गेला नाही ,तर आपले वडील आपल्या आजोबा यांच्या जीवनात तो तसाच आहे.
आज-काल खरेदी करायला गेले तरी माणसे बिस्किटला पारले-जी म्हणून ओळखतात. आपण असे म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा, वस्तूचा एक विशिष्ट काळ असतो, एक जमाना असतो. आपण ऐकतो की त्यावेळी त्या गोष्टी खूप चालायच्या. त्या गोष्टींना त्यावेळी खूप मार्केट होते. त्यावेळी ती गाडी खूप चालायची .त्यावेळी ती कोल्ड्रिंग खुप चालायचे परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की परिवर्तन संस्कृतीचा एक नियम आहे .या जगाला इथल्या लोकांना रोज काहीतरी नवीन हवे असते लोकांना प्रत्येक गोष्ट आधुनिक सुधारावर आधारित हवी असते.
या जगामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये स्पर्धा लागलेल्या आहेत. जेव्हा एखादी वस्तू मार्केटमध्ये येते आणि लोकप्रिय होते, तेव्हा त्याच्यासारखी, त्याच्यापेक्षा भारी किंवा खराब वस्तू थोड्याच काळात मार्केटमध्ये येते. त्यामुळे प्रत्येक वस्तूला आपले गुणवत्ता टिकून ठेवणे खूप महत्वाचे असते.
लोकांजवळ योग्य वस्तू निवडण्यासाठी खूप सारे पर्याय असतात अशा काळात एखादी कंपनी एखाद्या वस्तूच्या बाबतीत एखादी चूक करते, तेव्हा त्या कंपनीला मोठी नुकसान भरपाई करावी लागते. पण पारले- जी बिस्कीट असा प्रॉडक्ट आहे ,जो वर्षानुवर्षे लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.
आपण बघू शकतो की त्याच्या क्वालिटी मध्ये पॅकिंग मध्ये किंवा त्याच्या किंमती मध्ये जास्त फरक पडलेला नाही आणि लोकांना सुद्धा असेच वाटते की याच्या मध्ये काही बदल होऊ नये या सर्व गोष्टींचा विचार केला तरी पारले-जी चे उत्पादन वाढतच चालले आहे. त्याची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे.
भारतावर राज्य करणारे इंग्रज लोक त्यांच्यासाठी चॉकलेट,बिस्कीट, पेस्ट्री इत्यादी वस्तू खात असत . परंतु भारतीय लोकांना या गोष्टी कधीच मिळत नसत. कारण या पदार्थांच्या किमती फक्त इंग्रजांना परवडत . तेव्हा एक भारतीय व्यक्ती ज्याचं नाव ‘मोहनलाल दयाल’ यांना ही गोष्ट जरासुद्धा आवडली नाही. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी विचार केला की आपले भारतीय लोक या गोष्टी का खाऊ शकत नाहीत आणि त्यांनी निर्धार केला की आपल्या देशात आपल्या लोकांसाठी या गोष्टी तयार करायच्या.
सन १९२९ मध्ये ‘मोहनलाल दयाल’ यांनी बारा कामगारांसोबत मुंबईतील विले पार्ले या भागामध्ये एक कंपनी सुरू केली आणि कंपनीच नाव ठेवलं “पारले”. कंपनीचे नाव हे कंपनी ज्या ठिकाणी सुरू करण्यात आली त्या ठिकाणाच्या नावावरून ठेवण्यात आले. कंपनीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो पदार्थ बनवला गेला त्याचं नाव होतो ‘ऑरेंज कॅन्डी’ या कॅंडीला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

कंपनी सुर केल्याच्या दहा वर्षांनी म्हणजेच १९३९ मध्ये त्यांनी बिस्किट बनवण्याचा निर्णय घेतला आणि “पारले ग्लुको ” या नावाने हे बिस्कीट सुरू करण्यात आले. गव्हापासून बनवलेल्या बिस्किटाचा दर इतका कमी होता की भारतातील प्रत्येक नागरिक हे बिस्किट खरेदी करू शकत होता.
बिस्किटाची फक्त किंमत कमी नव्हती तर त्याची गुणवत्ता, त्याचा स्वाद खूप मस्त होता. पाहता पाहता हे बिस्कीट सगळीकडे लोकप्रिय होऊ लागले.असे म्हटले जाते की काही ब्रिटिश लोकसुद्धा या बिस्किटाचा स्वाद घेत असत. पारले बिस्कीट च्या समोर मार्केटमध्ये ब्रिटिशांचे बिस्किट मागे पडू लागले.
१९८२ मध्ये ‘पारले ग्लुकोज’ हे नाव बदलून बिस्कीटाचे नाव “पारले-जी” असे ठेवण्यात आले.
२००३ मध्ये पारले जी हे जगातील सगळ्यात जास्त विक्री होणारे बिस्कीट असे जाहीर करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत “पारले जी”उत्पादनावर कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही.
आजही पारले बिस्कीट लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचे आहे.पारले जी कालही लोकप्रिय होते आणि आजही लोकप्रिय आहे..!
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..