KGF चाप्टर 2 मध्ये धुरळा उडवल्यानंतर आता रॉकी भाईचा हा चित्रपट येतोय..
K.G.F चाप्टर 1 2018 मध्ये दर्शकांच्या भेटीला आणि संपूर्ण बॉक्स ऑफिसवर एकच धुकाकुळ उडाला. रॉकीम्हणजेच कन्नड स्टार “यश” देश्भरासह विदेशातही गाजला. त्यांतर चाप्टर 2 ने अख्या जगाच्या बॉक्स ऑफिस
वर धुमाकूळ घातला. चाप्टर २ ने अनके विक्रम मोडल्यानंतर आता यश अन्ना आपल्या नवीन प्रोजेक्टच्या शुटींगमध्ये व्यस्त झालेत.
KGF नंतर सध्या यशची हवा एवढी वाढलीय की प्रत्येक दिग्दर्शक यशला सोबत घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार करतोय. यशचे चाहते सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याच चाहत्यांसाठी यशने आता एक मोठ सरप्राईज दिलंय.

ज्याप्रमाणे बाहुबली नंतर प्रभासचे नशीब चमकले, तसेच KGF 2 नंतर यशचेही झाले. यशची प्रचंडक्रेज सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, इथे लोकांना लवकरात लवकर रॉकी भाईला दुसऱ्या चित्रपटात बघायचे आहे. यशबद्दल अनेक अफवा देखील पसरल्या आहेत जसे की यश त्याच्या पुढच्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असल्याची अफवा देखील आहे.
, पणऑफिशीयल रित्या यशचा पुढचा चित्रपटाची घोषणा आता झालीय. यश लवकरच YASH 19 या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव यश 19 यामुळे ठेवण्यात आलंय कारण हा यशचा 19वा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 2024मध्ये पाहायला मिळेल ,असा अंदाज वर्तवला जातोय.

KGF CHAPTER ३ची पण आहे प्रचंड क्रेझ.
यश 19 च्या नंतर यशचा पुढचा प्रोजेक्ट हा KGF CHAPTER ३ असणार आहे. जगावर राज्य करण्याचं रॉकी भाईचं स्वप्न या भागात सत्य होताना आपल्याला दिसणार आहे. यशच्या चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची सर्वांत जास्त प्रतीक्षा आहे. यशच्या आजवरच्या चित्रपटांपैकी KGF सिरीज ही सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. kgf अगोदर यशने बऱ्याच चित्रपटात काम केलं परंतु यशला स्टारडम मिळवून दिल ते KGFनेचं.
त्यामुळ आता पुन्हा एकदा यश अन्ना यश 19 च्या रूपाने बॉक्स ऑफिस गाजवायला येणार आहेत, पण अर्थातच त्यासाठी थोडीसी प्रतीक्षा करावी लागणार..
हेही वाचा:
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..