“ट्रॉफीला हात लावून बरे वाटले..”, सुर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीची उडवली खिल्ली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!

सुर्यकुमार यादव: आशिया कप ट्रॉफीचा वाद हा बराच चर्चेचा विषय राहिला आहे. आशिया कप जिंकूनही टीम इंडियाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. मात्र काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचे चेअरमन मोहसिन नक्वीवर टीका केली.

आशिया कप जिंकूनही टीम इंडियाला  ट्रॉफी मिळाली नाही!

Suryakumar Yadav Donate match fees to Indian Army  सुर्यकुमार यादव

पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी सोबत घेतली होती आणि टीम इंडियाला अद्याप ती परत मिळालेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर ‘अखेर ट्रॉफी ला स्पर्श करून कसे बरे वाटले’ याचा उल्लेख सूर्याने केला. यासोबतच आशिया कप ट्रॉफी नक्वीने  चोरून सोबत नेल्याबद्दल  त्याने एक हुशार विनोदही केला.

सुर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीची खिल्ली उडवली,नक्की काय म्हणाला सूर्या?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारली. पत्रकार परिषदेत सूर्याने याचा उल्लेख केला आणि नक्वीची खिल्ली उडवत म्हटले,

“शेवटी ट्रॉफीला स्पर्श करून बरे वाटले. मालिका जिंकल्यानंतर जेव्हा मला ट्रॉफी देण्यात आली तेव्हा खूप बरे वाटले.” काही दिवसांपूर्वी महिला संघाची वर्ल्ड कप ट्रॉफीही भारतात आली. या ट्रॉफीला स्पर्श करूनही बरे वाटते.

टीम इंडियाला आशिया कप ट्रॉफी कधी मिळणार?

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसीच्या बैठकीत मोहसिन नक्वी यांची भेट घेतली आणि दावा केला की, टीम इंडिया लवकरच आशिया कप ट्रॉफी स्वीकारेल. ते म्हणाले,

“मी आयसीसीच्या बैठकीचा भाग होतो आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी देखील उपस्थित होते. आयसीसीने माझ्या आणि पीसीबी प्रमुखांमध्ये एक वेगळी बैठक आयोजित केली होती, जिथे काही वरिष्ठ आयसीसी अधिकारी देखील उपस्थित होते.”

"ट्रॉफीला हात लावून बरे वाटले..", सुर्यकुमार यादवने मोहमद नक्वीची उडवली खिल्ली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!

सैकिया यांनी दावा केला की,  भारत लवकरच ट्रॉफी स्वीकारेल. मोहसिन नक्वी यांनी यापूर्वी सांगितले होते की ते ट्रॉफी सादर करण्यास तयार आहेत, परंतु त्यांना असा समारंभ हवा होता जिथे भारतीय संघाचा कर्णधार येऊन ती स्वीकारेल.

यावर बीसीसीआय ने आजूनही ट्रॉफी नक्वीच्या हातून घेण्यास मनाई केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त ACC चा कोणताही सदस्य ट्रॉफी देण्यास आला तर समारंभ आयोजित केला जाईल, असेही बीसीसीआयने म्हटले. आता  हा ट्रॉफी वाद कसा रंगेल हे पाहणे बाकी आहे.


हेही वाचा:

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीमध्ये?,पोर्णग्राफीनंतर या प्रकरणात अडकला राज कुंद्रा..!

Param Sundari Box office Collection: जान्हवी कपूरच्या परम सुंदरीने पहिल्याच दिवशी कमावले तब्बल एवढे कोटी रु..

Leave a Comment

error: