Women World cup 2025 Final: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे (IND vs SA) महिला संघ जेतेपदाच्या लढाईत आमनेसामने येतील. दोन्ही संघ त्यांचे पहिले विश्वविजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असतील.
याआधी आज सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असून आयएमडीबीच्या अंदाजानुसार मुंबईत तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाउस पडण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर, या अंतिम सामन्याचा निकाल कसा लागला जाईल, एक नजर टाकूया..!

मुंबईतील विश्वचषकाचा बहुप्रतिक्षित अंतिम सामना पावसाच्या धोक्यात आहे. हवामान खात्याने रविवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. आयसीसीच्या नियमांनुसार, जर बाद फेरीच्या सामन्यात पावसामुळे खेळ थांबवला गेला तर, सामना राखीव दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा सुरू होईल.
जर आजच्या दिवसभरात सामना पुन्हा सुरू झाला नाही, तर राखीव दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी पहिल्या चेंडूपासून सामना खेळवला जाईल. राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तर मात्र टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो.
Babar Aazam Breaks Virat Kohli’s Record: बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम..!
भारतीय संघाने साखळी फेरीत तीन सामने जिंकले, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या सातपैकी पाच सामने जिंकले आणि दोन गमावले. भारताने दुसऱ्या उपांत्य फेरीत सात वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या उपांत्य फेरीत जेतेपदाच्या दावेदार इंग्लंडला हरवले.
The hype is REAL 😎🔥
Watch the #CWC25 Final LIVE, broadcast details here 👉 https://t.co/7wsR28PFHI pic.twitter.com/cqEYV8Xjfi
— ICC (@ICC) November 2, 2025
भारताला पावसाचा मोठा धोका.!
साखळी फेरीतील दोन पराभवांमुळे भारताला गुणतालिकेत मोठे नुकसान!
आयसीसीच्या नियमांनुसार, राखीव दिवसानंतरही अंतिम सामना खेळवता आला नाही, तर साखळी फेरीत वरच्या स्थानावर राहिलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. भारत साखळी फेरीत चौथ्या स्थानावर राहिला, तर दक्षिण आफ्रिकेने चांगली कामगिरी केली. या नियमानुसार भारतीय संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागेल तर दक्षिण आफ्रिका ट्रॉफी घेऊन जाईल.

भारतीय संघाने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे त्यांचे साखळी सामने शेवटच्या षटकांमध्ये गमावले. या दोन्ही पराभवांमुळे आता अंतिम फेरीत भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो. जर पावसाने खेळ खराब केला, तर दक्षिण आफ्रिकेला गुणतालिकेत त्यांच्या उच्च रँकिंगमुळे विजेता घोषित केले जाईल.
Women World cup 2025 Final: मुंबईमध्ये आज रोमांचक सामना होणार!
दोन्ही संघांच्या कामगिरी पाहता, अंतिम सामना खूप रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. भारताला ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याचा आत्मविश्वास आहे, तर दक्षिण आफ्रिका उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
हेही वाचा: