WTC 2025-2027 Point Table: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. शुभमन गिल आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाचा ७ विकेट्सने पराभव केला.
यापूर्वी अहमदाबादमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४० धावांनी पराभव केला. २०२५-२०२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा हा पहिला विजय आहे. आता गुणतालिकेत कसे दिसते ते जाणून घ्या. कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे.

WTC 2025-2027 Point Table: वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकाविजयानंतर टीम इंडियाला मोठा फायदा.!
ऑस्ट्रेलियाने २०२५-२०२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकल्या आहेत. ३६ गुण आणि १०० टक्के विजय टक्केवारीसह, ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत आघाडीवर आहे. श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी दोन कसोटी सामने खेळले आहेत, एक जिंकला आहे आणि एक अनिर्णित राखला आहे.
श्रीलंकेचे १६ गुण आहेत परंतु विजयाची टक्केवारी ६६.६७ आहे. विजयाच्या टक्केवारीत श्रीलंका भारतापेक्षा पुढे आहे कारण त्याच्या विजयाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

WTC 2025-2027 Point Table: टीम इंडिया पोहचली तिसऱ्या स्थानावर..!
भारत जागतिक कसोटी (World Test Championship 2025-27) अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या चक्रात भारताने ७ सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ जिंकले आहेत आणि २ हरले आहेत. एक सामना (इंग्लंडविरुद्ध) अनिर्णित राहिला. ५२ गुण आणि ६१.९० च्या विजयाच्या टक्केवारीसह, भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा: