टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanshree Varma) यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र, धनश्रीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्रीने लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर चहलवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तेव्हापासून, सर्वजण या आरोपावर चहलच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते.
अखेर, चहलने त्याच्यावरील आरोपांवर प्रथमच आपले मौन सोडले आहे. या आरोपांवर चहल नक्की काय म्हणाला जाणून घेऊया सविस्तर..!
धनश्रीच्या आरोपांवर पहिल्यांदाच सोडले युजवेंद्र चहलने मौन.!
टी-20 स्पोर्ट्सशी बोलतांना युजवेंद्र चहल म्हणाला की,,
“आमच्या लग्नाला साडेचार वर्षे झाली होती. जर दोन महिन्यांत आमची फसवणूक झाली असती तर हे नाते कोण टिकवू शकले असते? मी आधीही म्हटले आहे की मी भूतकाळापासून पुढे गेलो आहे. तथापि, बरेच लोक अजूनही त्यावर चिकटून आहेत. त्यांचे घर अजूनही माझ्या नावावर चालत आहे. ते असेच करत राहतील. मला अजिबात काळजी नाही आणि त्याचा माझ्यावरही परिणाम होत नाही.”
तो पुढे म्हणाला,
“मी हा अध्याय विसरलो आहे. कोणीही काहीही बोलू शकते आणि ते सोशल मीडियावर पसरते. शेकडो कथा फिरतात, पण सत्य एकच आहे. माझ्यासाठी महत्त्वाचे असलेले सर्व काही जाणतात. हा अध्याय माझ्यासाठी बंद आहे. मला त्याबद्दल पुन्हा बोलायचे नाही. मला माझ्या आयुष्यावर आणि खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.”

युजवेंद्र चहल बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. चहलने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाच्या जर्सीमध्ये शेवटचा सामना खेळला होता. या सामन्यानंतर, चहल भारतासाठी एकदिवसीय किंवा टी२० संघात परतू शकला नाही. चहलने भारतासाठी एकूण ७२ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि १२१ विकेट घेतल्या आहेत.
या काळात, त्याने दोनदा एका डावात ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, चहलने ८० सामन्यांमध्ये खेळले आहे आणि ९६ विकेट घेतल्या आहेत. आयपीएल २०२५ मध्ये, चहलने पंजाब किंग्जकडून खेळताना १४ सामन्यांमध्ये एकूण १६ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा:
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीमध्ये?,पोर्णग्राफीनंतर या प्रकरणात अडकला राज कुंद्रा..!
Kantara chapter 1 पाहून केएल राहुल भारावला, रिषभ शेट्टीसाठी केले खास वक्तव्य..!

1 Comment
Pingback: Smriti Mandhana Odi Record: स्मृती मानधनाने रचला इतिहास, एकदिवशीय विश्वचषकात अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिल