या 5 गोलंदाजांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत, लिस्टमध्ये आहे एक प्रसिद्ध भारतीय गोलंदाज..
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची सुरुवात 2008 साली झाली. आणि त्यांतर आयपील जगभरात सर्वांत मोठी क्रिकेट लीग म्हणून प्रसिद्ध झाली. आयपीएल अनेक युवा खेळाडूंना आपलं नाव करण्याची संधी देत आलंय. त्याचा फायदाही बऱ्याच युवा खेळाडूंना झाला आहे. आज IPL ची गणना जगातील सर्वोत्तम T20 लीगमध्ये केली जाते त्यामागचं कारणही हेच आहे.
आयपीएलमध्ये आजप[आजपर्यत सर्वाधिक धावा करण्यापासून ते सर्वाधिक विकेट घेण्यापर्यंत अनेक विक्रम केले आणि मोडले गेले आहेत. परंतु याच आयपीएल मध्ये काही असेही विक्रम आहेत, जे खेळाडूंच्या उणीवा अधोरीखीत करत. असाच एक विक्रम आहे तो म्हणजे सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकणे.
आज आम्ही अशाच 5 खेळाडूंबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकले आहेत.
हेही वाचा: देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
अमित मिश्रा: दिल्ली कॅपिटल्सचा महान फिरकी गोलंदाज अमित मिश्रा या यादीत पहिल्या स्थानावर आहे. अमित मिश्राने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 154 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 23.9 च्या सरासरीने 166 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 21 नो बॉल टाकले आहेत.
इशांत शर्मा: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. इशांत सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो.
इशांत शर्मा आयपीएलमध्ये आतापर्यंत 93 सामन्यांमध्ये खेळला आहे.यादरम्यान त्याने 37.5 च्या सरासरीने 72 विकेट्स घेतल्या आहेत. इशांत शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत २१ नो बॉल टाकले आहेत.
एस. श्रीशांत: स्पॉटफिक्सिंग प्रकरणी आयपीएलमधुन काही वर्षासाठी बाद झालेला श्रीशांत सुद्धा या यादीत आहे.
केरळचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने आपल्या आयपीएल कारकिर्दीत, ने पंजाब किंग्ज, कोची टस्कर्स केरळ आणि एकेकाळचे विजेते राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले होते.
2013 च्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात नाव आल्याने या अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाजाची क्रिकेट कारकीर्द अल्पकाळात संपली .
हेही वाचा: ना रोहित ना सचिन… या भारतीय खेळाडूने एकदिवशीय सामन्यातील पहिला षटकार ठोकला होता..
श्रीशांतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 44 सामने खेळले ज्यात त्याने 29.85 च्या सरासरीने 40 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने 23 नो बॉल टाकले.
उमेश यादव: आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याच्या बाबतीत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचाही समावेश आहे. उमेश यादवने आयपीएलमध्ये आतापर्यंत 19 नो बॉल टाकले आहेत.
उमेश यादवच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने देशातील या प्रतिष्ठित स्पर्धेत 132 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 131 डावांमध्ये 28.77 च्या सरासरीने 135 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे २३ धावांत ४ बळी.
जसप्रीत बुमराह: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉलचा विक्रम आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या बुमराहने आतापर्यंत या स्पर्धेत २८ नो बॉल टाकले आहेत.
त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 118 सामने खेळले आहेत आणि 118 डावात गोलंदाजी करताना त्याने 23.56 च्या सरासरीने 141 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी 14 धावांत 4 बाद अशी आहे.
मात्र सर्वांत जास्त नो बॉल टाकले असले तरीही ‘जसप्रीत’ आयपीएल मधील सर्वांत यशस्वी गोलंदाज म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. स्पेशली डेथ ओव्हरमध्ये तो अतिशय किफायती गोलंदाजी करतो, हे आपण पाहिलच आहे.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..