हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

By | June 25, 2022

 

डाकू म्हटलं की कुणालाही क्रूर आणि भयंकर माणूस दिसतो.काही डाकू हे श्रीमंतांना लुटून त्यांची संपत्ती गोर-गरीबांमध्ये दान करत असतं. भारतात असे अनेक डाकू, अपराधी झाले जे असे करून लोकांचे समर्थन मिळवत असतं.

अश्याच एका डाकूने इंग्रजांच्याअधिकाऱ्यांना नाकीनऊ आणले होते. त्याला पकडण्यासाठी शेवटी इंग्रजांना विदेशातुन एक विशिष्ट अधिकारी बोलवावा लागला होता. तो डाकू म्हणजे “डाकू सुल्ताना” सुल्ताना इंग्रजांचे पैसे लुटून टे गोर गरिबांना वाटत असे.

अस म्हटल जात कि, सुल्ताना डाकू सुरवातीला छोट्या मोठ्या चोऱ्या करत असे. एक वेळ जेव्हा पोलिसांनी त्याला चोरी करतेवेळेस अटक केली तेव्हा त्याला ४ वर्षाची शिक्षा झाली होती.

जेलमधून सुटल्यानंतर सुल्ताना डाकू ने नाजीबाबाद आणि साहिनपूर मध्ये राहत असलेल्या लोकांना जमा केले आणि आपली टोळी पुन्हा सक्रीय केली. त्याच्या टोळीत त्यावेळी जवळजवळ १०० डाकू होते. या सर्वांच्या निशाण्यावर जास्त करून इंग्रज अधिकारी आणि ते श्रीमंत लोक असायचे जे गोर-गरिबांवर अत्याचार करत असतं.

सुल्ताना डाकू हा मोठ्या शिफारसीने गुन्हा करत असे. आणि मिळालेली रक्कमजवळच्या गावातील गोर-गरिबांना वाटत असे.

सुल्ताना डाकू बद्दल असेही म्हटले जाते कि, तो कुणालाही तोपर्यंत मारत नसे जोपर्यत कोणी त्याच्यावर अथवा त्याच्या साथीदारावर हल्ला करत नाही. घर लुटून झाल्यानंतर तो कुणालाही न मारता तिथून निघून जात असे.

डाकू

सुल्ताना ची उल्लेखनीय गोष्ट असी आहे कि, तो ज्यांना मारत असे त्यांच्या हाताची तीन बोटे कापून आपल्या सोबत नेत असे.याच कारणामुळे सुल्ताना डाकू हा गोरगरीब जनतेसाठी मोठा सहारा बनला होता. परंतु त्याच्यामुळे इंग्रज अधिकारी आणि सावकार मात्र परेशान झाले होते.

इंग्रजांनी सुल्ताना डाकूला पकडण्यासाठी ३०० सैनिकांची एक तुकडी सुद्धा बनवली होती ज्यात ५० घोडस्वार होते. अनेक दिवस पाठलाग करून सुद्धा ही तुकडी सुल्ताना डाकूला पकडण्यास यशस्वी झाली नाही . शेवटी इंग्रज अधिकाऱ्याने “फ्रैडी यंग” नावाचा एक अधिकारी ब्रिटन वरून खास सुल्तानाला जिवंत किंवा मृत पकडण्यास बोलवला होता.

फ्रैडी यंग ने भारतात आल्यानंतर सर्वप्रथम सुल्ताना डाकूने केलेल्या सर्व गुन्ह्यांचा अभ्यास केला.आणि तो या निष्कर्षावर पोहचला कि सुल्ताना न पकडल्या जाण्याच मुख्य कारण होत ते म्हणजे सुल्ताना डाकूचे पोलिसांत असलेले खबरी. त्यामुळेच तो अनेक वेळा पोलिसांच्या हाती लागता- लागता वाचला होता. त्याच्यावर कुठलीही कारवाही करण्यागोदर त्याची सूचना सुल्तानाला या खबऱ्यामार्फत मिळत असे आणि सुल्ताना सावध होत असे.

यानंतर फ्रैडी यंगने मनोहर लाल नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याला तेथून लांब ठिकाणी बदली करून पाठवले होते. फ्रैडी यंगला शंका होती कि मनोहर हाच सुल्तानाचा खबरी होता जो पोलिसांची सर्व माहिती सुल्तानाला देत असे. फ्रैडी यंगने त्यानंतर सुल्ताना डाकूच्या अनेक साथीदारांना पकडून आपल्या बाजूने घेतले होते.

सुल्तानाच्या एका साथीदाराने सुल्ताना असलेल्या ठिकाणाची माहिती फ्रैडी यंगला दिली आणि मोठ्या प्रयत्नानंतर सुल्ताना फ्रैडी यंगच्या हाती सापडला. फ्रैडी यंगला सुल्तानाला पकडल्यामुळे भोपाळचा आयजी बनवले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *