आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
शिवभक्तांची अपार श्रद्धा असलेलं हे महादेव मंदिर दररोज दिवसातून 2वेळा गायब होतंय..
भारतात अनेक मंदिर आहेत ज्यात भक्त आपल्या देवतांची भक्ती भावाने पूजा करतात. काही असेही मंदिर आहेत ज्यात काहीना काही चमत्कारिक घटना घडत असतात. इतिहासात अनेक ठिकाणी अश्या मंदिरांचा उल्लेख आहे.अश्या चमत्काराने ते मंदिर आहे तेथील देवता आजूबाजूच्या पंचक्रोशित प्रसिद्धीस येतात.
आज आम्ही अश्याच एका मंदीराच्या चमत्काराबद्दल सांगणार आहोत जे मंदिर दररोज लोकांच्या डोळ्यासमोर दिवसातून 2 वेळा अदृश्य होते. हो वाचून तुमचा विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे. याला दैविक चमत्कर म्हणायचं का आणखी काही हे तुम्हीच ठरवा..
चला मग जाणून घेऊया कोणते आहे ते मंदिर..
गुजरातच्या वडोदरा शहरापासून 75 किमी लांबीवर “स्तंभेश्वर महादेव मंदिर” आहे.
या मंदिराची खासियत ही आहे की या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन दिवसातून फक्त एक वेळेसच केले जाऊ शकते. हे मंदिर अरब सागरात कांबे तटावर स्थित आहे. समुद्राला भरती ओहटी येत असते. अश्या वेळी जेव्हा भरती येते तेव्हा समुद्राचे सर्व पाणी मंदिरात घुसल्या जाते.
भरतीच्या वेळी जेव्हा मंदिर संपूर्णपणे जलमय होते तेव्हा तेथे कोणालाही जाण्यास परवानगी नसते. जवळजवळ दिवसातून 2 वेळा हे मंदिर अश्या रीतीने पूर्णपणे पाण्याखाली जाते.
येथे येणाऱ्या सर्व भक्तांना एक चिट्टी दिली जाते ज्यावर समुद्राला येणाऱ्या भरतीचा वेळ लिहलेला असतो. भाविकांनी त्या वेळेच्या अगोदर अथवा त्यांनतरच मंदिर परिसरात जाण्याची परवानगी दिली जाते.
या मंदिराचा उल्लेख श्री महादेव पुराणात सुद्धा केलेला आहे. जे या मंदिराचे प्राचीन असल्याचे पुरावे आहेत. याशिवाय स्कंदपुराणात सुद्धा या मंदिराच्या निर्मितीचा उल्लेख केला गेला आहे.
पौराणिक कथानुसार ताडकासूर नावाच्या राक्षसाने अत्यंत कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले. आणि अमर होण्याचे वरदान मागितले होते. जेव्हा भगवान शंकरानी हे वरदान देण्यास नकार दिला तेव्हा ताडकासुरुने दुसरे वरदान मागितले की त्याला फक्त शिवपुत्रच मारू शकेल ज्याचे वय फक्त 6 दिवस पाहिजे बाकी कुणाच्याही हातून ताडकासुरला मरण येणार नाही. भगवान शंकरानी त्याला हे वरदान दिले.
वरदान मिळाल्यांनतर तारकासुरने तिन्ही लोकात हाहाकार माजवायला सुरवात केली. त्याने ऋषी मुनी, देवी देवतांना त्रास देण्यास सुरवात केली. शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून देवता आणि ऋषी मुनी भगवान महादेव यांच्याकडे गेले.
तेव्हा उपाय म्हणून कार्तिकेय चा जन्म झाला. कार्तिकेयचे 6 मस्तक आणि 12 हात होते. जन्माच्या सहाव्या दिवशीच कार्तिकेयने ताडकासूर चा वध केला.
जेव्हा कार्तिकेयला समजले की ताडकासुरु त्यांच्या वडिलांचा परमभक्त होता. त्याचा वध केल्यामुळे कार्तिकेय स्वतःला दोषी समजत होता. तेव्हा भगवान विष्णूने त्यावर उपाय सांगितला की त्याठिकाणी शिवलिंगाची स्थापना कर आणि महादेवांकडे क्षमा याचना करा.
कार्तिकेय ने स्थपित केलेले शिवलिंग याच मंदिरातील असून तेव्हापासून हे मंदिर स्तंभेश्वर तीर्थ नावाने प्रसिद्ध झाले.
या चमत्कारिक मंदिरात संपूर्ण दिवसभर भक्तांची मोठी गर्दी असते. आपल्या डोळ्यसमोर मंदिराला पाण्यात गायब होताना आणि पुन्हा वर येताना पाहण्यासाठी अनेक भक्तजन याठिकाणी नेहमी येत असतात.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते
व्हिडीओ प्लेलीस्ट:
https://youtu.be/kKA0H-GSmVM
https://youtu.be/t-_2g-45HV0