IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला ज्यात. टीम इंडियाने 7 गडी र राखून एकहाती विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. माजी भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा विक्रम मोडत आता अर्शदीप त्या यादीमध्ये सर्वांत वर पोहचला आहे. नक्की कोणता आहे हा विक्रम जाणून घेऊया सविस्तर.!

IND vs SA: अर्शदीप सिंहने रचला मोठा विक्रम, ठरला T-20 पॉवरप्ले ओव्हर्समध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणारा एकमेव भारतीय गोलंदाज!
अर्शदीपने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पॉवरप्ले ओव्हर्समध्ये सर्वाधिक विकेट्स (१-६) घेण्याचा नवा विक्रम रचला आहे. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने पहिल्याच षटकात रीझा हेंड्रिक्सला शून्यावर बाद करून संघाला चांगली सुरुवात दिली. त्याने दोन आउटस्विंगर्सनंतर इनस्विंगरने हेंड्रिक्सला एलबीडब्ल्यूचा पायचीत केले. यासह भारताने पॉवरप्लेमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले.
अर्शदीप आता ६८ पॉवरप्ले सामन्यांमध्ये ४८ विकेट्ससह या प्रदेशातील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. त्याची सरासरी २०.०८ आहे आणि या काळात त्याने ४१८ डॉट बॉल देखील टाकले आहेत. यापूर्वी, हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता, ज्याने ८३ पॉवरप्ले सामन्यांमध्ये ४७ विकेट्स घेतल्या होत्या.
Clinical 🤝 Effective
Arshdeep Singh is named the Player of the Match 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/AJZYgMAHc0#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/B4CsOrRssI
— BCCI (@BCCI) December 14, 2025
भारताकडून टी-२० मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (Most T-20 Wickets in powerplay)
- १. अर्शदीप सिंग ४८
- २. भुवनेश्वर कुमार ४७
- ३. जसप्रीत बुमराह ३३
- ४. अक्षर पटेल २१
- ५. वॉशिंग्टन सुंदर २१
- ६. आशिष नेहरा १९
हेही वाचा: