बॉलीवूड मधील या महान कॉमेडी अभिनेत्याचे एकाएकी झाले निधन, समोर आले धक्कादायक कारण..
बॉलिवूड चित्रपट अभिनेते, निर्देशक, निर्माते, स्क्रिप्ट रायटर सतीश कौशिक यांचे ८ मार्च २०२३ रोजी दुःखद निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. सतीश कौशिक यांच्या जाण्याने अवघ्या सृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. आपल्या भारदस्त शरीरयष्टीमुळे आणि आवाजातील माधुर्यामुळे सतीश कौशिक यांना विनोदी भूमिका मिळत असत. मिस्टर इंडिया या चित्रपटात त्यांनी कॅलेंडर हे पात्र गाजवले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मिस्टर इंडियाचा कॅलेंडर आपल्यातून कायमचा निघून घेला अशी भावना अवघ्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट केली आहे. मला माहिती आहे, मृत्यू हेच जगाचे अंतिम सत्य आहे! पण हे गोष्ट आपला जिगरी दोस्त सतीश कौशक यांच्या निधनाबद्दल मी लिहिल याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता.
४५ वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम मिळाला!’ असं ट्विट करत अनुपम खेर यांनी सतीश कौशिकबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. अनुपम खेर यांच्या ट्विटवर अनेकांनी सतीश कैशिक यांच्यासीबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश कौशिक यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. रूप की राणी चोरों का राजा, कागज, तेरे नाम, मिस्टर इंडिया, छत्रीवाली, हमारा दिल आपके पास है, दिवाना मस्ताना अशा चित्रपटातून सतीश कौशिक यांनी विनोदी अभिनयाची छाप पाडली होती. त्यांनी साकारलेल्या कॅलेंडर आणि पप्पू पेजर या अनोख्या नावाच्या भूमिका विषेश लक्ष्यवेधी ठरल्या होत्या.
सतीश कौशिक यांनी दिल्ली येथील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचे धडे गिरवले होते. यातूनच त्यानी नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. छोट्या मोठ्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष्य वेधले होते. चित्रपटांमधून त्यानी डायलॉग रायटिंगचे कासम सुद्धा केले होते. १९८५ साली सतीश कौशिक यांचे लग्न शशी सोबत झाले होते. १९९६ साली त्यांचा मुलगा शानु याचे अवघ्या दोन वर्षांचा असताना निधन झाले होते. त्यानंतर सरोगसी द्वारे २०१२ साली त्यांची मुलगी वंशिकाचा जन्म झाला.
पार्श्वनाथ डेव्हलपर्स या रिअल इस्टेट कंपनीसोबत सतीश कौशिक यांनी चंदिगड फिल्म सिटी प्रकल्पात भागीदारी घेतली होती. त्यांनी सारंगपूर व्हिलेज, चंदीगड येथे ३० एकर म्हणजेच १२ हेक्टर जमीन अतिशय कमी किमतीत विकत घेतली होती. मीडियाने याबाबत त्यांचा खेळ उघड केल्यानंतर रिअल इस्टेट कंपनीला हा कोट्यवधींचा प्रकल्प सोडण्यास भाग पाडले होते त्यावेळी सतीश कौशिक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
पप्पू पेजर,मिस्टर इंडिया या विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. राम लखन आणि साजन चले ससुराल सारख्या इतर चित्रपटांमध्येही उत्कृष्ट अभिनय केला होता. जाने भी डॉ यारों याचे लेखन सतिश कौशिक यांनी केले होते. आज त्यांच्या निधनाची बातमी समजताच कंगना राणावत, अनुपम खेर यांनी भावुक होऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.