लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली म्हणून चहा विकण्यास सुरुवात केली आणि आज महिन्याला 2 लाख रुपये कमावतोय हा महाराष्ट्रीयन युवक.!
मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे खूप जन म्हणतात परंतु त्यांपैकी कित्तेकाना याचा खरा अर्थ माहित नसतो, आज आपण अशाच एका महाराष्ट्रीयन युवकाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया ज्याने नोकरी गमावल्यानंतर हार न मानता चहा चा ठेला सुरु केला आणि आज आपल्या मेहनतीमुळे तो महिन्याकाठी २ लाख रुपये कमावत आहे.
ही कहाणी आहे महाराष्ट्रातील सोलापूर येथी रहिवाशी असलेल्या रेवण शिंदे या तरुणाची. रेवण एकेकाळी रेलवे विभागात टेम्पररी बेसिसवर सिक्युरिटी गार्ड म्हणून बारा हजार महिन्याप्रमाणे काम करत होता, नोकरी हातून जाताच रेवनच्या आयुष्यात अफरातफर झाली होती. काही दिवस तर त्याचे मन कोणत्याही कामात लागत नव्हते, शेवटी कंटाळून त्याने चहाचा ठेला सुरु केला.
आजच्या घडीला रेवण शिंदे आपल्या चहाच्या दुकानातून दरमहा २ लाख रुपये कमावत आहे.
हेही वाचा: देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
२८ वर्षीय रेवन चे वडील हे सुतार काम करत , घरातील परिस्थिती हलाक्याची असल्यामुळे त्याने १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करावी लागली. २०१९ मध्ये ही कंपनी बंद झाल्यामुळे रेवणची नोकरी गेली होती. काही दिवस नवीन नोकरी शोधली परंतु यावेळी त्याला चाट सेंटर वर काम मिळाले आणि याठिकाणी पैशेही कमी मिळत होते.
काही दिवस याठिकाणी काम केल्यांतर रेवण ने स्वतःच हा धंदा सरू करण्याचा निर्णय घेतला, त्याने पुण्यात २०२० मध्ये दुकान करने घेतली आणि चहा विकण्याचे सुरु केले. याच काळात सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आले होते आणि त्यांचा धंदा पूर्णतः तोट्यात आला. आपल्या जवळ असलेली तुटपुंजी सेविंग त्याने या दुकानात गुंतवली होती, त्यामुळे आता त्याच्याकडे खाण्यासाठी सुद्धा पैशे शिल्लक राहिले नव्हते.
काही दिवस बंद राहिल्यानंतर रेवनने जून महिन्यात परत एकदा आपले चहाचे दुकान सुरु केले, परंतु यावेळी त्याच्यासमोर एक नवीनच समस्या उभी होती, ती म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतरही लोकं आता बाहेर जाऊन खाण्या पिण्यासाठी किंचित विचार करत होते. आता रेवण शिंदे याने ए युक्ती लढवली आणि चहाची घरपोच सेवा होम डिलिवरी देण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला काही ऑफिसमध्ये जाऊन त्याने चहा देण्यास सुरुवात केली आणि एक महिनाभर तर त्याने सर्वांना चहा फ्री दिली होती. आता त्याचा स्वभाव आणि चहा लोकांना आवडू लागली होती. त्याच्याजवळ अदरक आणि इलायची या दोन फ्लेवरचा चहा मिळतो. याशिवाय रेवन गरम दुध सुद्धा घरपोच पोहचतो. यातून दररोज ७ ते ८ हजार रुपये कमाई होत आहे.
आपला व्यवसाय वाढत असल्याने रेवण ने आपल्यासोबत अन्य पाच मुलांना कामावर ठेवले आहे. रेवण आणि त्याची टीम सकाळी ९ ते १२ आणि ३ ते ७ या वेळात पिंपरी आणि आजूबाजूच्या परिसरात चहाची होम डीलेवरी करताना दिसते.
आज रेवणचा चहा हा मोठ मोठ्या कंपन्यात पोहचवला जात आहे, त्याने एक whatsapp ग्रुप बनवला आहे यावर त्याचे कस्टमर चहाची ऑर्डर देतात.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..