इजिप्तमधील सर्वांत सुंदर आणि आकर्षक असलेला हा महल तितकाच भीतीदायक सुद्धा आहे, कारण वाचून व्हाल हैराण..

इजिप्त नाव म्हणले कि आपल्यासमोर सर्वात पहिले काय येते ? गिझा पिरॅमिड्स आणि मम्मी हे चित्र सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. काही इतिहासकार बोलतात की, ते पिरॅमिड्स एलियन्स ने बनवलेले आहेत. तेथील देवी देवता यांचा देखील आपण वारंवार उच्चार ऐकला आहे. बऱ्याच इतिहासकारांचे असे म्हणणे आहे कि तेथील पुरातन संस्कृती काहीशी हिंदू परंपरेशी जोडलेली आहे. मात्र त्यावर अजूनही वाद कायम आहे. त्याबद्दल, कोणतेही ठळक पुरावा भेटेपर्यंत हा वाद असाच कायम राहील. मात्र, त्याव्यतिरिक्त देखील अशी एक जागा, वास्तू आहे ज्याबद्दल प्रत्येक भारतीयांना माहिती असणे आवश्यकच आहे. इजिप्त मध्ये एक महल आहे, जी अगदी आपल्या देशातील मंदिरांसारखाच दिसतो.

 

Le Palais Hindou
काही मोठ्या इतिहासकारांकडून कडून समोर आपल्या माहितीनुसार, कायरो येथील हेलियोपोलिस (Heliopolis) भागात हा महल आहे. ‘Le Palais Hindou’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महलाला ‘Qasr-i-Baron’ आणि ‘Baron’s Palace’ अशी अजून दोन नावं आहेत.

कोण होता या वास्तूचा मालक?
इतिहासरकारांच्या मते १९५० पासूनच हा महल (वास्तू ) अगदीच निर्जन अश्या अवस्थेत आहे. बेल्जीयन चे करोडपती बेरोन एडवर्ड एम्पीन (Baron Edouard Empain) यांच्या मालकीचा हा महल होता. बेरोन इजिप्तला आपला मोठा उद्योग उभारुन पैसे कमवण्यासाठी आले होते असे सांगण्यात येते.

 

महलाची वास्तू भारतीय वास्तुकलेसारखी का आहे ?
बेरोन भलेही इजिप्तला पैसे कमवण्याच्या आशेने आला असेल. मात्र भारतीय वास्तुकला आणि आर्किटेक्चर (Architecture) त्याला प्रचंड आवडली होती. त्याने काही वेळा भारताचे दौरे केले होते. तेव्हा त्याचा भारतीय वास्तू कलेसोबत संबध आला होता. त्याने १९०७ मध्ये, फ्रेंच आर्किटेक्ट अलेक्झांडर मार्सेल(Alexandre Marce) याला, भारतातील एखाद्या प्रसिद्ध मंदिराच्या वास्तुकलेसारखी वास्तू बनवण्यास सांगितली. अंगकोरवट मंदिर (Angkorwat) आणि ओडिसा च्या काही मंदिरांपासून प्रेरणा घेऊन मार्सेल याने या वास्तूची निर्मिती केली.

 

फिरणाऱ्या खोल्या होत्या खास आकर्षण
१९०७ -१९११ च्या दरम्यान मार्सेल ने हा महल बनवला होता. हा महल एक अद्भुत असा वास्तरशास्त्राचा प्रतीक समजला होतो. २ मजली या विशाल अश्या महलामध्ये पायऱ्या, ग्रंथालय, मोठाल्या खोल्या होत्या. त्याच्या बाहेर, हिंदू देवता मोठ्या आदराने प्रस्थापित करण्यात आले होते. या महल च्या भिंतीवर हिंदू धर्माच्या काही कथानक पेंटिंग च्या माध्यमातून रेखाटल्या गेल्या होत्या. त्याच्या दरवाजांना सोन्याच्या कड्या होत्या असे सांगितले जाते.

 

या महलाच्या प्रमुख टॉवर ला मंदिराच्या शिखराप्रमाणे बनवण्यात आले होते आणि त्यावर बेरोन ची भव्य खोली होती. मात्र हि खोली अश्या प्रकारे बनवण्यात आली होती कि ती, ३६० डिग्री फिरू शकत होती. या महल मध्ये केवळ एकच नाही तर अश्या अजून देखील काही खोल्या होत्या ज्या फिरू शकत होत्या. प्रत्येक खोलीमध्ये सूर्यप्रकाश पोहोचावा यासाठी असे करण्यात आले होते. त्याच्या बगीच्या मध्ये काम-सूत्राच्या मूर्ती आणि नागाच्या देखील काही मूर्ती ठेवलेल्या होत्या.

कायरो चे केंद्र बनला होता महल
बेरोन चा हा महल, कायरो चा खास केंद्र बनले होते. अनेक पार्टी, तिथे आयोजित केल्या जात असे. इजिप्तचा राजा आणि शाही कुटुंबाच्या लोकांना देखील या महलचा हेवा वाटत होता.

महल चा भयानक पैलू
असे सांगितले जाते कि हा महल जितका शानदार होता तेवढाच दुर्दैवी देखील ठरला होत, आणि हाच या महल चा भयंकर पैलू आहे. बेरोन ची बहीण हेलेनाचा बाल्कनीमधून पडून मृत्य झाला होता. मुलगी मिरिअम हि देखील मृत अस्वस्थेत आढळली होती. त्यानंतर अचानकच बेरोन यांचा देखील अकस्मात मृत्य झाला होता. त्यानंतर त्या पुढील कोणतीही पिढी या महल मध्ये राहिले नाही.

सौदीच्या श्रीमंत कुटुंबाने नंतर सांभाळली महलची धुरा
१९५२ मध्ये गामाल अब्देल नासेर च्या नेतृत्वाखाली इजिप्तच्या क्रांतिकारकांनी किंग फारूक ला सिंहासन सोडून पळून लावले होते. इजिप्तच्या राजाला, आणि त्याच्या कुटुंबियांना देश ससोडून जावे वागले होते. १९५७ मध्ये हा महल सौदी च्या एका मोठ्या श्रीमंत कुटुंबाने खरेदी केला मात्र ते देखील खूप काळ तिथे राहू शकले नाही.

महल ची दुर्गती आणि भूत असण्याची बातम्या
काळाबरोबर या महल मधल्या ऐतिहासिक मुर्त्या चोरांनी चोरल्या. सोबतच महल मढेभूत असण्याच्या बातमीने खूपच दुर्गती झाली होती. तेथील आरशांमधून रक्त येणे, किंवा आवाज येणे या सर्व बातम्या सगळीकडे पसरू लागल्या आणि म्हणून तिथे भूत असल्याच्या बातम्या सगळीकडे पसरू लागल्या

आता आहे सुंदर हॉटेल आणि कसीनो
महल मध्ये भूत असण्याच्या बातम्यांसोबत चा त्याला हॉटेल आणि कसीनो बदलण्याच्या बातम्या देखील वाढल्या. २०१७ मध्ये या महल चा संवर्धन Restoration करण्यात आले होते मात्र अजूनही ते निर्जन अवस्थेतच आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top