IND vs SA: गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून झालेला पराभव पचवणे सोपे जाणार नाही. मालिका बरोबरीत आणण्याचे स्वप्न भंगले आणि टीम इंडियावर एक लाजिरवाणा डाग पडला जो कदाचित कधीही पुसला जाणार नाही.
फलंदाजांनी त्यांना लाजिरवाणे करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, प्रथम ईडन गार्डन्सवर आणि नंतर गुवाहाटीत दोन्हीही सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला चारी मुंड्या चीत केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात भारतीय फलंदाज कोसळले. फलंदाजीचा क्रम पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखा कोसळला आणि ५४० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना संपूर्ण संघ १४० धावांवरच बाद झाला. दुसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली.
First South African captain to win an ICC title in 27 years!
and then literally bend on the knee, Indian Test Cricket Team!SALUTE #TEMBABAVUMA.🫡🫡 pic.twitter.com/MVAsTFZDuj
— Kishan (@Kisna_Kusale) November 26, 2025
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेकडून मालिका गमावताच टीम इंडियाच्या प्रतिष्ठेवर डाग!
खरं तर, भारतीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाने ३५० पेक्षा जास्त धावांनी कसोटी सामना गमावला आहे. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला ४०८ धावांनी पराभूत केले. हा पराभव येणाऱ्या काळात खूप काळ टिकेल. धावांच्या बाबतीतही हा भारतीय संघाचा सर्वात मोठा पराभव होता. यापूर्वी २००४ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३४२ धावांनी पराभूत झाला होता. २००६ मध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा ३४१ धावांनी पराभव केला होता.

IND vs SA: भारताने 20 वर्षांत पहिल्यांदाच नाववार केला नकोसा विक्रम.!
२० वर्षांमध्ये पहिल्यांदाच टीम इंडियाचा एकही फलंदाज संपूर्ण कसोटी मालिकेत शतक झळकावू शकला नाही. यापूर्वी अशी घटना १९९५ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत घडली होती. भारतीय फलंदाज मालिकेत वाईट कामगिरी करत होते आणि त्याचे परिणाम टीम इंडियाला भोगावे लागले. सलग दोन कसोटी पराभवांमुळे, भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला आहे. आता, टीम इंडियाला उर्वरित नऊ सामन्यांपैकी किमान सात सामन्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.
हेही वाचा:
Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?