कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..
गेल्या 3/4 दिवसपासून महाराष्ट्रात जे काही सत्ता नाट्य सुरु आहे ते पाहून सामान्य नागरिक नक्कीच संभ्रमात पडलाय. अचानक पने एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी शिवसेनेविरुद्ध केलेलं बंड काही केल्या शमन्यास तयार नाहीये. एकीकडे एकनाथ शिंदे आता चक्क शिवसेना पक्षावरच आपला अधिकार दाखवत आहेत तर, दुसरीकडे मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र बंडखोर आमदारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असं ठणकावून सांगताहेत..
बर, हे सगळ सत्तानाट्य सुरु झालं आणि नेमेके आपले राज्यपाल कोश्यारीजी कोविड पोझीटिव्ह आढळले. 5 दिवसाच्या आयसोलेशन मधून राज्यपाल आज बाहेर आले आणि चालू असलेल्या घडामोडीत आणखी एक नवा बॉम्ब फोडला.
कोश्यारीजींनी चक्क एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटातील आमदारांना केंद्राने सुरक्षा प्रदान करावी, असं पत्रच केंद्राला लिहलंय. महत्वाचं म्हणजे सुरक्षेविषयी कोणतीही मागणी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यातील इतर नेत्यांनी केली नव्हती..
या आधीही केंद्र सरकारने आमदारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यास सुरक्षा देण्यास काहीच हरकत नाही , असं म्हटलं होत.
कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येताच राज्यपालांनी सर्वात आधी शिंदे गटांवर लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय. आधी केंद्राला आणि नंतर मुंबईचे डीजीपी यांच्याकडे राज्यपाल कोश्यारी जींनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
आपल्या पत्रात त्यांनी म्हटलंय की, घटनेचे एकंदरीत गांभीर्य लक्षात घेता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना आजच सुरक्षा प्रदान करण्यात यावी. केंद्राने याधीच आमदारांच्या घरातील मंडळींना सुरक्षा प्रदान केली आहे. त्यामुळे या सर्व बंडखोर आमदारांना देखील सुरक्षा आजच पुरवण्यात यावी, असं राज्यपालांनी म्हटलंय..
आमदारांच्या घरच्यांना सुरक्षा देण्यास राज्य सरकारने दिला होता नकार.
एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गुवाहाटी मध्ये असतांना इकडे त्यांच्या घरच्यांना सुरक्षा देण्यासाठी त्यांनी राज्यसरकारला विनंती केली होती. आमच्या घरच्यांची सुरक्षा ही राज्यसरकारची जबाबदारी आहे, असं या आमदारांनी म्हतल होत. राज्य सरकारने सुरक्षा नाकारताच केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आणि केंद्राने सुरक्षा प्रदानाही केली.
हेही वाचा:
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..