सतीश कौशिक यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून झाला मोठा खुलासा, ‘या कारणामुळे झाला अभिनेत्याचा मृत्यू”.. धक्कादायक कारण समोर..

सतीश कौशिकचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. बॉलीवूड अभिनेता-दिग्दर्शकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत.

सूत्रांनी सांगितले की, “सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे. शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्याच्या शरीरात दारूचे प्रमाण आढळले नाही. रक्त आणि व्हिसेराचे नमुने जतन करून तपासणीसाठी पाठवले आहेत.”

Best online ernig app download

सतीश कौशिकचा मृत्यू गूढ परिस्थितीत झाला की अनैसर्गिक कारणांमुळे झाला हे शोधण्यासाठी दिल्ली पोलीसही नियमित तपासात गुंतले आहेत .  सतीश कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. पोलीस याप्रकरणी सीआरपीसी कलम १७४ अन्वये कारवाई करत आहेत.

मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सतीश कौशिक

दिल्लीतील दीनदयाल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमनंतर सतीश कौशिक यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दिवंगत अभिनेत्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सतीश कौशिक बुधवारी दिल्लीत एका मित्राच्या घरी होळी साजरी करण्यासाठी आले होते. काल रात्री उशिरा त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली. 13 एप्रिल 1956 रोजी महेंद्रगड, हरियाणात जन्मलेल्या सतीशला कलेची प्रचंड आवड होती. त्यांनी दिल्लीच्या किरोरी माल महाविद्यालयातून १९७२ मध्ये पदवी प्राप्त केली आणि भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थेसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.

सतीश कौशिक हे अष्टपैलू अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते. आपल्या दमदार अभिनय आणि कॉमिक सेन्सच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. 1980 आणि 1990 च्या दशकात ‘मिस्टर इंडिया’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘जुदाई’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधील कामामुळे त्यांना ओळख मिळाली.

रूप की रानी चोरों का राजा, हम आपके दिल में रहते हैं, तेरे नाम, तेरे संग यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ते लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही ओळखले जात होते.


 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top