कपिल शर्मा ते रुपाली गांगुली.. एका एपिसोड साठी तब्बल एवढे पैसे घेतात हे टीव्ही सिरीयल कलाकार.
टीव्हीवर असे अनेक स्टार्स दिसतात जे केवळ त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जात नाहीत तर त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ फीमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. टीव्ही इंडस्ट्रीतील काही स्टार्स असे आहेत जे एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी एवढी मोठी फी घेतात की तुम्हालाही धक्का बसेल.
विशेष म्हणजे त्यांचे स्टारडम पाहून निर्मातेही त्यांना फी म्हणून मोठी रक्कम देण्यास तयार आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील काही स्टार्स तर दरवर्षी त्यांची फी वाढवतात. आज आमच्या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही टीव्ही स्टार्सची नावे सांगणार आहोत जे एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी लाखो रुपये घेतात, चला तर मग जाणून घेऊया.
कपिल शर्मा: आमच्या यादीत पहिले नाव आहे कॉमेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता कपिल शर्माचे. या अभिनेत्याने टीव्ही इंडस्ट्रीसोबतच हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली आहे.टीव्हीवरील एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी कपिल ५० लाख रुपये भरमसाठ फी घेतो. ही आजपर्यंत कोणत्याही कलाकाराने एका एपिसोडसाठी घेतलेली सर्वांत मोठी रक्कम ठरलीय.
सुनील ग्रोवर: सुनील ग्रोव्हरचे नाव देखील सर्वोत्कृष्ट कॉमेडीयन टीव्ही अभिनेत्यांपैकी एक आहे, त्याने आपल्या दमदार कॉमेडीच्या जोरावर आपली ओळख एका वेगळ्या पातळीवर नेली आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये डॉ गुलाटी आणि गुत्थीची भूमिका करणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 10 ते 12 लाख रुपये घेतो. कपिल शर्मासोबतच्या मतभेदामुळे मध्यंतरी हा अभिनेता कपिलच्या शोमधून बाहेर पडला होता परंतु नंतर पुन्हा त्याची मनधरणी करून शोमध्ये सामील करून घेतले गेले.
रुपाली गांगुली: टीव्ही सीरियल ‘अनुपमा’मध्ये अनुपमाची भूमिका साकारणारी दमदार अभिनेत्री रुपाली गांगुलीचीही फॅन फॉलोइंग लाखोंच्या घरात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही अभिनेत्री एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 1.5 लाख ते तीन लाख रुपये फी घेते. रुपालीने ‘अनुपमा’ टीव्ही मालिकेपूर्वी ‘सारा भाई Vs सारा भाई’ या मालिकेत तिचे अभिनय कौशल्य दाखवले आहे. प्रेक्षकांनाही ही मालिका खूप आवडली होती.
हिना खान: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सारख्या टीव्ही मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री हिना खानचे नाव आज टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाले आहे. ही अभिनेत्री एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 3 लाख रुपये फी घेते. टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय शो ‘कसोटी जिंदगी की 2’ आणि बिग बॉसमध्ये दिसणारी हिना खानचे लाखो फॅन फॉलोअर्स आहेत आणि प्रेक्षकांना तिचा अभिनय आवडतो.
रोनित रॉय: रोनित हा एक अभिनेता आहे ज्याने टीव्ही इंडस्ट्री तसेच हिंदी सिनेजगतात आणि OTT प्लॅटफॉर्मच्या वेब सिरीजमध्ये आपले जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी दीड लाख रुपये घेतो.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..