Yashavi jaiswal Records in Test: यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, थेट रोहितला मागे टाकत सचिनच्या क्लबमध्ये झाला सामील!

Yashavi jaiswal Records in Test: भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने गुवाहाटी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात एक मोठा टप्पा गाठला आहे. जयस्वालने गुवाहाटी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला. यासह त्याने रोहित शर्माचा विक्रमही मोडला. जाणून घेऊया कोणता आहे तो स्पेशल विक्रम.

Yashavi jaiswal Records in Test

Yashavi jaiswal Records in Test: यशस्वी जयस्वालने मोडला रोहित शर्माचा विक्रम..!

यशस्वी जयस्वालने गुवाहाटी येथे आपला २८ वा कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. तो ५८ धावांवर बाद झाला.

यशस्वी जयस्वाल जुलै २०२३ पासून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जो रूट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने ४६ डाव खेळले आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्ये १७ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

यशस्वी जयस्वालचे पदार्पणापासून सर्वाधिक कसोटी ५०+ धावा

  • २० – यशस्वी जयस्वाल (५२ डाव)
  • १७ – जो रूट (४६ डाव)
  • १५ – हॅरी ब्रूक (३५ डाव)
  • १३ – बेन डकेट (४७ डाव)

यशस्वी जयस्वाल २३ व्या वर्षी सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २३ व्या वर्षी सर्वाधिक कसोटी ५०+ धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे. सचिन तेंडुलकरने २३ व्या वर्षी २९ ५०+ धावा केल्या होत्या.

कसोटीत सर्वाधिक ५०+ धावा (२३ व्या वर्षी) (Most fifties in Test as Youngster)

  • २९ – सचिन तेंडुलकर
  • २५ – रामनरेश सरवान
  • २३ – अ‍ॅलिस्टर कुक
  • २२ – जावेद मियांदाद
  • २० – केन विल्यमसन
  • २० – यशस्वी जयस्वाल

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा पहिला भारतीय सलामीवीर!

 यशस्वी जयस्वाल आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा पहिला भारतीय सलामीवीर आहे. याबाबतीत त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले, ज्याच्याकडे सर्वाधिक १७ वेळा ५०+ धावा करण्याचा विक्रम होता.यस्वालने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २०+ वेळा अर्धशतक  केले आहे.

Yashavi jaiswal Records in Test: यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, थेट रोहितला मागे टाकत सचिनच्या क्लबमध्ये झाला सामील!

WTC मध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक अर्धशतके ठोकणारे फलंदाज !

  1. २१ – दिमुथ करुणारत्ने (६४ डाव)
  2. २०* – यशस्वी जयस्वाल (५२ डाव)
  3. १९ – झॅक क्रॉली (८९ डाव)
  4. १९ – उस्मान ख्वाजा (७३ डाव)
  5. १८ – टॉम लॅथम (७० डाव)
  6. १७ – क्रेग ब्रेथवेट (८२ डाव)
  7. १७ – बेन डकेट (५७ डाव)
  8. १७ – रोहित शर्मा (६६ डाव)

यशस्वी जयस्वालने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले. त्याने विंडसर पार्क येथे पदार्पण कसोटी खेळली. तेव्हापासून, त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. त्याने भारतातील जवळजवळ सर्व ठिकाणी कसोटी सामने खेळले आहेत.


हेही वाचा:

ENG vs AUS live: पहिल्याच दिवशी मिचेल स्टार्कने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..!

Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?

Leave a Comment

error: