चेतेश्वर पुजारा: भारतीय संघाचा सुपरस्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने २४ ऑगस्ट २०२५ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती चा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. पुजारा बऱ्याच काळापासून भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला संघात पुनरागमन करण्यात अपयश आहे.
देशांतर्गत हंगाम सुरू होण्यापूर्वी पुजाराने अचानक निवृत्ती का जाहीर केली?, हा प्रश्न सध्या खूप मोठा बनला आहे. ज्याबद्दल आता स्वतः चेतेश्वर पुजाराने मोठा खुलासा केला आहे.
चेतेश्वर पुजाराने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा
सुपरस्टार कसोटी खेळाडू चेतेश्वर पुजाराने स्पष्ट केले आहे की, त्याने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला नाही. तो गेल्या काही दिवसांपासून याबद्दल विचार करत होता. संघाबाहेर राहिल्यानंतरही, पुनरागमनाच्या आशेने पुजाराने बराच काळ देशांतर्गत क्रिकेट खेळले, परंतु त्याचे पुनरागमन झाले नाही.
अशा परिस्थितीत, आता पुजाराचा असा विश्वास आहे की ,तरुण खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्येही संधी मिळायला हवी. हे लक्षात घेऊन, देशांतर्गत हंगाम सुरू होण्यापूर्वी पुजाराने हा निर्णय घेतला आहे.
चेतेश्वर पुजाराने भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना अनेक सामने जिंकून दिल. त्याच्या निवृत्तीच्या घोषणे नंतर भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकर, विराट कोहली, रवी अश्विन, जसप्रीत बूमराह यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा:
World’s Best T-20 Players: विराट- रोहित नाही तर ‘हे’ आहेत टी-20 मधील सर्वोत्तम खेळाडू..!