धाकड ते सम्राट पृथ्वीराज… सिनेमागृहानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित झालेत हे 5 चित्रपट, याठिकाणी पाहू शकता अगदी मोफत..

By | July 8, 2022

सध्या अनेक चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळतात. थिएटरनंतर, हे चित्रपट OTT वर प्रदर्शित होतात. त्यामुळे प्रेक्षक घरात बसूनही हे चित्रपट पाहू शकतात. जुलै महिन्यात अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटांची नावे.यातील बरेच चित्रपट हे सिनेमाग्रहात खूप चालले आहेत. तेच आता तुम्हो घरबसल्या पाहू शकता..

धाकड : या चित्रपटात कंगना राणौत दिसणार आहे. हा चित्रपट 1 जुलै रोजी फक्त ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाला चित्रपटगृहात फारसे प्रेम मिळू शकले नाही.

सम्राट पृथ्वीराज: थिएटरमध्ये फ्लॉप झाल्यानंतर, हा चित्रपट 1 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपट

मूनफॉल: हा चित्रपट हॉलीवूडचा चित्रपट आहे जो आता चित्रपटगृहांनंतर लायन्सगेट प्लेवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एक रहस्यमय कथा दाखवण्यात आली आहे.

ऑपरेशन रोमियो: हा चित्रपटही सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट ३ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एप्रिलमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

मेजर: मेजर देखील नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. ३ जुलैपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झाला आहे. 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नकृष्णनयांची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे.

हे चित्रपट तुम्हाला नक्कीचं आवडतील..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *