अंबाती रायडू: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्याने चर्चेत आला आहे. तो इंडियन प्रीमियर लीग 2025 दरम्यान कमेंट्री पॅनलचा भाग होता.
तेव्हा समालोचन करतांना रायडूने अनेक वेळा आरसीबी बद्दल बोलून चाहत्याचा रोष ओढावून घेतला होता. एवढच नाही तर आरसीबीने ट्रॉफी जिंकल्यानंतर झालेल्या अपघातावर देखील रायडूने टिपणी केली होती..
अंबाती रायडू आणि आरसीबीमध्ये शाब्दिक चकमक..!
आता पुन्हा एकदा रायडूने आरसीबीबद्दल मिश्कील टिपण्णी करत त्यांची मजा घेतली आहे.लोकांना वाटते की रायुडू आणि आरसीबीमध्ये नेहमीच संघर्ष राहिला आहे. चाहत्यांचा असा विश्वास आहे की रायडूला आरसीबी आवडत नाही. आणि रायडूने यावरच बोलतांना पुन्हा एकदा आरसीबीची थट्टा उडवली आहे.
नक्की काय म्हणाला अंबाती रायडू?, ज्यामुळे चाहते भडकले?
अंबाती रायडूने काही वेळेपूर्वी युट्युबर शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरसीबीबद्दल मिश्कील वक्तव्य केले आहे.जेव्हा शुभंकर मिश्राने त्याला ‘आरसीबी चॅम्पियन झाल्यावर कसे वाटले?’ असे विचारले तेव्हा रायुडू म्हणाला, “मला खूप मजा आली.” मग त्याने विनोद केला की, आता आरसीबीला समजलेकी ५ वेळा ट्रॉफी जिंकणे किती कठीण आहे.
एवढ्यावरच रायडू न थांबता पुढे म्हणाला की,
एक ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांना 18 वर्ष लागली तर ,चेन्नई सारख्या 5 आयपीएल ट्रॉफी जिंकायला 90 वर्ष लागतील.
रायडूच्या या मिश्कील टिप्पणीमुळे आता पुन्हा एकदा तो आरसीबी चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे/ सध्या तो सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल होतोय.
हेही वाचा:
World’s Best T-20 Players: विराट- रोहित नाही तर ‘हे’ आहेत टी-20 मधील सर्वोत्तम खेळाडू..!
1 Comment
Pingback: चेतेश्वर पुजारा ने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा - yuvakatta.com