ENG vs SA: “हे अविश्वसनीय..” 300 धावा पार केल्यानंतर जॉस बटलरचे मोठे वक्तव्य.. भावूक होत म्हणाला..!

ENG vs SA: मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (SA vs ENG) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात, इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज फिल साल्टने अशी खेळी केली की ,त्याने इतिहासात आपले नाव कोरले. या सामन्यात इंग्लंडने केवळ मालिकेत पुनरागमन केले नाही तर अनेक मोठे विक्रमही मोडले.

ENG vs SA: इंग्लंडने मोडला टीम इंडियाचा विक्रम..!

बांगलादेशविरुद्ध भारताचा २९७ धावांचा स्कोअर हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्य संघाविरुद्धचा सर्वोच्च स्कोअर होता, परंतु इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३०४ धावा करून हा विक्रम मोडला.

मँचेस्टरमध्ये इंग्लंडच्या वादळी डावाची सुरुवात फिल साल्ट आणि कर्णधार जोस बटलर यांनी केली. साल्टने फक्त ६० चेंडूत नाबाद १४१ धावा केल्या, तर बटलरने फक्त ३० चेंडूत ८३ धावांची स्फोटक खेळी केली. आणि टी-२० च्या इतिहासातील सर्वांत मोठ्या

जेकब बेथेल आणि हॅरी ब्रूक यांनीही लहान पण महत्त्वाचे योगदान दिले, ज्यामुळे इंग्लंडने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. या खेळीनंतर  जॉस बटलर म्हणाला,

“३०० धावसंख्या? मी कधीच विचार केला नव्हता की, मी असे काहीतरी पाहेन, हे अविश्वसनीय आहे. आमच्या संघाच्या जिरेटोपात हा मनाचा तुरा ठरलेला आहे”

ENG vs SA: "हे अविश्वसनीय.." 300 धावा पार केल्यानंतर जॉस बटलरचे मोठे वक्तव्य.. भावूक होत म्हणाला..!

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ!

  • झिम्बाब्वे ३४४/४ १ गांबिया (नैरोबी)२३ ऑक्टोबर २०२४
  • नेपाळ ३१४/३ १ मंगोलिया (परमवीर) २७ सप्टेंबर २०२३
  • इंग्लंड ३०४/२ १ दक्षिण आफ्रिका (मँचेस्टर) १३ सप्टेंबर २०२५*

भारत २९७/६ १ बांगलादेश (हैदराबाद )१२ ऑक्टोबर २०२४


 

1 thought on “ENG vs SA: “हे अविश्वसनीय..” 300 धावा पार केल्यानंतर जॉस बटलरचे मोठे वक्तव्य.. भावूक होत म्हणाला..!”

Leave a Comment

error: