IPL 2026 Trade: आयपीएल 2026 साठी रिटेन्शनची घोषणा आज होणार आहे. याआधीही अनेक खेळाडूंची देवाणघेवाण झाली आहे. मात्र यावर्षी सर्वाधिक गाजलेला ट्रेड म्हणजे चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील जडेजा आणि संजूचा ट्रेड. ट्रेड वेळ सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत या ट्रेडची सर्वाधिक चर्चा रंगली होती.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अधिकृतपणे सीएसके सोडून राजस्थान रॉयल्समध्ये १४ कोटीमध्ये सामील झाला आहे. संजू सॅमसन देखील चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला आहे. या दोघांसह नितीश राणा आणि मोहम्मद शमीसह एकूण १० खेळाडूंनी संघ बदलले आहेत. आयपीएलने त्यांच्या अधिकृत खात्याद्वारे या सर्व व्यवहारांची घोषणा केली आहे.
Sanju Samson Officially Traded with Sir Ravindra Jadeja from RR to CSK ahead of IPL 2026… Now you will see Sanju in Yellow..🥶#IPL2026 #ipltrade pic.twitter.com/R4RPiSup6x
— Kishan (@Kisna_Kusale) November 15, 2025
IPL 2026 Trade: बीसीसीआयने १० खेळाडूंच्या व्यवहाराची केली घोषणा !
बीसीसीआयने आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटद्वारे रिटेन्शनच्या घोषणेपूर्वी अधिकृतपणे मोठ्या व्यवहारांची घोषणा केली आहे. रवींद्र जडेजा सीएसकेमधून आरआरमध्ये गेला आहे, जिथे त्याचा पगार ₹१८ कोटी (१८ कोटी रुपये) वरून ₹१४ कोटी (१४ कोटी रुपये) झाला आहे. संजू सॅमसन १८ कोटी (१८ कोटी रुपये) मध्ये आरआरमध्ये सामील झाला आहे.
नितीश राणा गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला होता आणि आता तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळेल. मोहम्मद शमीनेही संघ बदलले आहेत.
आयपीएल 2026 आधी ट्रेड झालेल्या खेळाडूंची यादी आणि त्यांच्या किंमती खालीलप्रमाणे ( IPL 2026 Trade Players and price)
-
संजू सॅमसन (सीएसकेला खरेदी) – १८ कोटी रुपये
-
रवींद्र जडेजा (आरआर खरेदी) – १४ कोटी रुपये
-
संजू सॅमसन (आरआर शिल्लक खरेदी) – २.४ कोटी रुपये
-
मोहम्मद शमी (एल अँड टीला खरेदी) – १० कोटी रुपये
-
मयंक मार्कंडे (एमआयला खरेदी) – ३० लाख रुपये
-
अर्जुन तेंडुलकर (LSG खरेदी) – ३० लाख रुपये

-
शरफान रुदरफोर्ड (एमआयला खरेदी) – २.६ कोटी रुपये
-
शार्दुल ठाकूर (एमआयला खरेदी) – २ कोटी रुपये
-
नितीश राणा (डीसीला खरेदी) – ४.२ कोटी रुपये
डोनोवन फरेरा (आरआरला खरेदी) – १ कोटी रुपये
हेही वाचा:
IND vs AUS 1st Test: पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी रचला इतिहास, जसप्रीत बूमराहने केला पंजा ओपन.!