IPL 2026 Mumbai Indians Retention List: आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी, मुंबई इंडियन्सने त्यांची रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुंबई ने अनेक स्टार खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे, तर काहींना सोडण्यात आले आहे.
संघाने एकूण नऊ खेळाडूंना सोडले आहे. नक्की कोणते आहेत ते खेळाडू ? आणि कोणत्या खेळाडूंना संघाने कायम केले आहे. जाणून घेऊया या न्यूजमध्ये अगदी सविस्तर..
🚨 MUMBAI INDIANS WILL GO TO AUCTION WITH JUST 2.75 CRORE 🚨 pic.twitter.com/6ALidiWNuU
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
IPL 2026 Mumbai Indians Released player List: या 9 खेळाडूंना मुंबईने दाखवला घरचा रस्ता .!
संघाने बेवन जेकब्स, के. श्रीजीथ, अर्जुन तेंडुलकर, विघ्नेश पुथुर, कर्ण शर्मा, लिसा विल्यम्स, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान आणि रीस टोपली यांच्यासह नऊ खेळाडूंना सोडले आहे. तर अर्जुन तेंडुलकरची एलएसजीमध्ये विक्री करण्यात आली आहे. मुंबईशिवाय इतर संघाकडून खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल.
चेन्नई सुपर किंग्सची रिलीज लिस्ट समोर, सर्वाना आच्छर्यचकित करत या स्टार खेळाडूंनादेखील केले रिलीज.!
𝐑𝐄𝐓𝐀𝐈𝐍𝐄𝐃 & 𝐑𝐄𝐀𝐃𝐘 to #PlayLikeMumbai 💙✨ pic.twitter.com/j38cjHAhou
— Mumbai Indians (@mipaltan) November 15, 2025
IPL 2026 Mumbai Indians Retention List: मुंबईने या खेळाडूंना केले कायम..!
- सूर्यकुमार यादव
- रोहित शर्मा
- तिलक वर्मा
- शर्फाने रुदरफोर्ड
- रायन रिकल्टन
- रॉबिन मिंझ
- हार्दिक पंड्या
- नामंधीर
- विल जॅक्स
- मिशेल सँटनर
- कॉर्बिन बॉश
- राजा अंगद बावा
- दीपक चहर
- शार्दुल ठाकूर
- जसप्रीत बुमराह
- ट्रेंट बोल्ट
- अल्लाह गझनफ
- अश्वनी कुमार
- रघु शर्मा
- मयंक मार्कंडे.
मुंबईकडे अजूनही असे अनेक स्टार खेळाडू शिल्लक आहेत जे आगामी हंगामात चमकदार कामगिरी करू शकतात आणि संघाला त्यांचे सहावे विजेतेपद जिंकण्यास मदत करू शकतात. फलंदाजी विभागात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा आहेत, तर गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मिशेल सँटनर आणि दीपक चहर आहेत.

IPL 2026: हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात?
हार्दिक पंड्याला आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब होती. मात्र, मुंबईने आयपीएल २०२५ मध्ये त्यांनी चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता, परंतु दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला.
याआधी रोहित शर्माने हार्दिकच्या आधी मुंबईला पाच विजेतेपदे मिळवून दिली आहेत. हार्दिक आता मुंबईला त्यांचे सहावे विजेतेपद आणि स्वतः कर्णधार म्हणून पहिले विजेतेपद जिंकण्याचे ध्येय ठेवेल. , हार्दिकने आधीच आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले आहे तसाच काहीसा कारनामा आता या हंगामात देखील त्याला करायचा आहे..
हेही वाचा:
केकेआरने सर्वाना केले आच्छर्यचकित, तबल एवढ्या खेळाडूंना रिलीज करत मिळवले 60+ करोड रु!
आरसीबीने कायम केलेल्या खेळाडूंची यादी समोर, तब्बल 8 खेळाडूंना दाखवला घरचा रस्ता , पहा यादी..!

1 thought on “IPL 2026 Mumbai Indians Retention List: आली रे..! मुंबई इंडियन्सने कायम केलेल्या खेळाडूंची यादी समोर, लाडक्या अर्जुनला अखेर बाहेरचा रस्ता. पहा यादी..!”