IND vs SA ODI Series: भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला (Shubhman Gill) मानेला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या तंदुरुस्तीबाबतही काळजी घेत असून गिल काही दिवस मैदानापासून लांब राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..

IND vs SA ODI Series: एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिलच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह !
३० तारखेपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी गिलची उपलब्धता अनिश्चित आहे. तर उपकर्णधार श्रेयस अय्यरला बरगडीच्या दुखापतीमुळे आधीच मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे, ज्यामुळे संघ निवड आणखी आव्हानात्मक बनली आहे.
IND vs SA ODI Series: कर्णधार उपकर्णधारच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा पुन्हा जबाबदारी स्वीकारेल का?
सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की ,भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. बोर्डाने रोहितशी या विषयावर चर्चा केल्याचे वृत्त आहे. रोहित पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्यास तयार आहे का हे पाहणे मनोरंजक ठरेल.
One last time, signing off from Sydney 👊 pic.twitter.com/Tp4ILDfqJm
— Rohit Sharma (@ImRo45) October 26, 2025
दरम्यान, माजी भारतीय फलंदाज मोहम्मद कैफचा असा विश्वास आहे की, रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपद स्वीकारणार नाही. जर गिल उपलब्ध नसेल तर केएल राहुलकडे संघाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबर पासून खेळवला जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघात एकदिवशीय क्रिकेट मालिका खेळवली जाणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे वेळापत्रक (India vs South Africa ODI Schedule)
- 30 नोव्हेंबर: पहिला एकदिवसीय: JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची.
- ३ डिसेंबर: दुसरी वनडे: शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर.
- 6 डिसेंबर: तिसरा एकदिवसीय: ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम.
हेही वाचा:
IPL 2026 :संजू की ऋतुराज कोण असणार CSK चा कर्णधार? अखेर चेन्नईच्या मालकाने केली अधिकृत घोषणा..!