IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेने कोलकाता येथे पहिला कसोटी सामना जिंकला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिका जिंकण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेला गुवाहाटी कसोटी जिंकावी लागेल.

दक्षिण आफ्रिका एक सामना जिंकून आधीच मालिकेत एक पाउल पुढे आहे. यादरम्यान दुसऱ्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या तीन सामना जिंकणाऱ्या खेळाडूंना दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नक्की कोणते आहेत ते खेळाडू? आणि का त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले? जाणून घेऊया सविस्तर .!
IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू रुग्णालयात दाखल, नक्की काय प्रकरण?
एका प्रमुख अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडूंना कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये गेल्या सामन्याचे नायक मार्को जॅन्सन, सायमन हार्मर आणि केशव महाराज यांचा समावेश आहे.
हे तिघेही खेळाडू आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते.मात्र यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या तंदुरुस्तीबद्दल अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. कोलकाता कसोटीत या तिन्ही खेळाडूंनी टीम इंडियासाठी मोठ्या समस्या निर्माण केल्या.
मालिकेतील दुसऱ्या कसोटी मध्ये जर हे खेळाडू खेळले नाहीत तर, दक्षिण आफ्रिकेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतील. दुखापतीमुळे कागिसो रबाडा देखील कोलकाता कसोटीला मुकला होता. मत दुसऱ्या कसोटीमध्ये तो परतण्याचे संकेत कर्णधाराने दिले आहेत.

IND vs SA 2nd Test: जर हे तिन्ही खेळाडू दुसऱ्या कसोटीमधून बाहेर पडले तरया ३ खेळाडूंना संघात संधी मिळू शकते!
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा या बातमीने खूप तणावात असेल. बरा झालेला आणि आता तंदुरुस्त असलेला कागिसो रबाडा याला जानसेनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. सायमन हार्मरची जागा सेनुरन मुथुसामी घेऊ शकतो. तर केशव महाराजांची जागा कोण घेईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दक्षिण आफ्रिकेला गुवाहाटी कसोटीत तिन्ही खेळाडू खेळावेत असे वाटेल, ज्यामुळे टीम इंडियावर आणखी दबाव येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहटीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतरदोन्ही संघात एकदिवशीय आणि टी-२० मालिका देखील खेळवली जाणार आहे.
हेही वाचा:
IPL 2026 :संजू की ऋतुराज कोण असणार CSK चा कर्णधार? अखेर चेन्नईच्या मालकाने केली अधिकृत घोषणा..!