IPL 2026 सुरु होण्याआधी ऋतुराज गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये, काढतोय खोऱ्याने धावा..!

 ऋतुराज गायकवाड: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारताच्या ज्युनियर संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. भारत अ संघाने ही मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या प्रभावी धावसंख्येने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गायकवाड टीम इंडियामध्ये पुनरागमनासाठी आपला दावा मजबूत करत आहे.  

 IPL 2026 आधी ऋतुराज गायकवाड काढतोय जबरदस्त धावा ..!

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऋतुराज गायकवाडने नाबाद शतक झळकावले, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर गायकवाडने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

 IPL 2026 सुरु होण्याआधी ऋतुराज गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये, काढतोय खोऱ्याने धावा..!

तिसऱ्या सामन्यात गायकवाडने फक्त २५ धावा केल्या, या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. त्याने या मालिकेत फक्त तीन सामने खेळले आणि २१० धावा केल्या. या कामगिरीमुळे, गायकवाडला लवकरच संघात परतण्याची संधी मिळू शकते.

आयपीएल 2026 आधी ऋतुराजच्या या जबरदस्त फॉर्ममुळे, चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक पोजीटीव्ह बातमी मिळाली आहे. ऋतू हा फोर्म आयपीएल मधेही कायम करेल, अशीच आशा चेन्नईच्या चाहत्यांना असेल.


हेही वाचा:

IPL 2026 :संजू की ऋतुराज कोण असणार CSK चा कर्णधार? अखेर चेन्नईच्या मालकाने केली अधिकृत घोषणा..!

WTC CYCLE: अखेर आयसीसीने घेतला मोठा निर्णय, WTC मध्ये आता 9 नाही तर सगळेच संघ उतरणार, दुहेरी डिव्हीजन रद्द..!

Leave a Comment

error: