IND vs SA: शुभमन गिल संघातून बाहेर झाल्यानंतर कोण असणार कर्णधार?, बीसीसीआयने पोस्ट करत केली नव्या कर्णधाराची घोषणा..!

IND vs SA:  शुभमन गिलला दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघातून बाहेर काढण्यात आले आहे. मानेच्या दुखापतीमुळे तो आधी पहिल्या आणि आता दुसऱ्या कसोटी सामन्यातून देखील बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना गिलच्या मानेला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

IND VS SA 2nd Test: भारतीय चाहत्यांसाठी नकोसी बातमी.., शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, थेट मुंबईच्या हॉस्पिटलला रवाना..!

एमआरआयनंतर गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आता तो दुसऱ्या कसोटीमधून सुद्धा बाहेर पडला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीमध्ये कोण भारतीय संघाची कमान सांभाळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना बीसीसीआयने एक पोस्ट करत नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.

IND vs SA:  दुसऱ्या कसोटीमध्ये कोण सांभाळणार टीम इंडियाचे कर्णधारपद?

शुभमन च्या दुखापतीचे पूर्ण प्रमाण अद्याप कळलेले नाही. शुभम न बाहेर पडल्यानंतर गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करेल. बीसीसीआय ने एक पोस्ट करत याबद्दल खुलासा केला आहे.  कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल पंतने बीसीसीआयचे आभार मानले आहेत. कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याची ऋषभची ही पहिलीच वेळ असेल.

IND vs SA:  मालिकेत टीम इंडिया ०-१ ने पिछाडीवर!

पहिल्या कसोटीत भारतीय संघाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. विशेषतः फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर हार मानली. १२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ केवळ ९३ धावांवर बाद झाला.

तीन फलंदाज आपले खाते उघडू शकले नाहीत, तर सहा जण दुहेरी आकडी गाठू शकले नाहीत. म्हणूनच संघ व्यवस्थापन दुसऱ्या कसोटीत त्यांच्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल!

IND vs SA: शुभमन गिल संघातून बाहेर झाल्यानंतर कोण असणार कर्णधार?, बीसीसीआयने पोस्ट करत केली नव्या कर्णधाराची घोषणा..!

. पहिल्या कसोटीत यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि पंत हे सर्वजण फॉर्ममध्ये नव्हते. आता दुसऱ्या कसोटीमध्ये रिषभ पंत च्या नेतृत्वात टीम इंडिया हा कसोटी सामना जिंकू शकतो का नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

ENG vs AUS live: पहिल्याच दिवशी मिचेल स्टार्कने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..!

Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?

Leave a Comment

error: