केएल राहुल कडे कर्णधारपद तर दिग्गज खेळाडूंची संघात इंट्री, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवशीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा..!

Team India Squad vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा( BCCI Announced squad for ODI series against South Africa) करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत, केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. अनेक स्टार खेळाडू संघात परतले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी निवडलेल्या एकदिवसीय संघातील सार्वक खेळाडूंवर एक नजर टाकूया.!

BCCI Warning to Virat- Rohit: विराट-रोहितच्या अडचणीमध्ये वाढ, टीम इंडियात टिकून राहण्यासाठी आता हे काम करावेच लागणार!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवशीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ ( Team India Squad for ODI series against South Africa)

भारतीय एकदिवशीय संघाचा नियमित कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेचा भाग असणार नाही. गिलच्या अनुपस्थितीत, केएल राहुल संघाला विजयाकडे नेण्याची जबाबदारी असेल. राहुलने यापूर्वी १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी नऊ सामने जिंकले आहेत.

गिल, हार्दिक आणि अय्यर संघातून बाहेर!

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या एकदिवसीय मालिकेसाठी संघाचा भाग असणार नाहीत. गिल आणि अय्यर दुखापतग्रस्त आहेत, तर हार्दिक पंड्या अद्याप दुखापतीतून बरा झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुभमनला मानेचा ताण आला, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान अय्यरला दुखापत झाली होती.

यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा हे दीर्घकाळानंतर एकदिवसीय संघात परतले आहेत. शुभमन गिलच्या जागी यशस्वीचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर श्रेयस अय्यरच्या जागी पंतचा समावेश करण्यात आला आहे.

केएल राहुल कडे कर्णधारपद तर दिग्गज खेळाडूंची संघात इंट्री, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवशीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा..!

निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत फलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या ऋतुराज गायकवाडवरही विश्वास दाखवला आहे. तिलक वर्मा यांचाही १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. नितीश कुमार रेड्डी यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. पण ऋतुराज सलामीवीर फलंदाज असून त्याला यशस्वी जैस्वाल जखमी झाला तरच प्लेईंग 11 मध्ये जागा मिळू शकते.!

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा त्याला साथ देतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवशीय मालिका  30 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. मालिकेचे वेलापातार्क खालीलप्रमाणे !

भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (IND vs SA ODI schedule)

  • पहिला एकदिवसीय सामना – ३० नोव्हेंबर – रांची
  • दुसरा एकदिवसीय सामना – ३ डिसेंबर – रायपूर
  • तिसरा एकदिवसीय सामना – ६ डिसेंबर – विशाखापट्टणम

हेही वाचा:

ENG vs AUS live: पहिल्याच दिवशी मिचेल स्टार्कने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..!

Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?

 


Leave a Comment

error: