किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
शिवसनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे त्यांच्या अतुल्य कारणामुळे आजही प्रत्येक ठाणेकरांच्या आणि महाराष्ट्राच्या मनात जिवंत आहेत. दिघेसाहेबांच्या प्रत्येक जयंतीनिमित्त सर्व जन साहेबांना अभिवादन करण्यासाठी जमतात. आनंद दिघे यांनी प्रत्येक मराठी माणसाला आपलसं करून घेतलं होत. सुरवातीपासूनच शिवसेना आणि हिंद्त्वाच्या वाटेवर चालत आलेल्या दिघेसाहेबांनी कधीही हिंदुत्वाची साथ सोडली नाही.
काही दिवसापूर्वीच दिघे साहेबांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट लोकांना आवडला सुद्धा. हाच चित्रपट पाहून आनंद दिघे साहेबांच्या गाडीचे ड्रायव्हर असलेले गिरीश शिलोत्री यांनी आपली प्रतीक्रिया दिली होती.बोलतांना त्यांनी दिघे साहेबांचा आणि त्यांच्या गाडीचा एक किस्सा सांगितला जो ते कधीही विसरू शकत नाहीत..
काय होता तो किस्सा?
शिलोत्री यांना हा किस्सा आठवला तो चित्रपटात दाखवलेल्या साहेबांच्या गाडीवरून..१९९८ साली सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही गाडी साहेबांनावर्गणी गोळा करून घेऊन दिली होती. आनंद दिघे शहरातील शिवसेनेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये फिरण्यासाठी हीच गाडी वापरत होते असं शिलोत्री म्हणाले. त्यावेळी ठाणे जिल्हा एकच होता. डहाणू लोकसभा मतदारसंघ अगदी इगतपुरीपर्यंत पसरला होता. आनंद दिघे याच गाडीमधून संपूर्ण जिल्हा त्यावेळी पिंजून काढायचे, असं शिलोत्री म्हणाले.
तसेच एकदा या गाडीमधून जात असताना मुंबई अंडरवर्ल्डमधील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या काही गुंडांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यामधून आनंद दिघे या गाडीच्या मदतीने कसे वाचले याचा किस्सा हा असा.
त्यादिवशी आम्ही मीरा रोडला एका पुजेसाठी जात होतो. आणि आमची वाट पाहत बसलेल्या दाऊद गँगच्या लोकांनी आमचा पाठलाग सुरु केला. शेवटी नाइलाजाने मला गाडी मीरा रोड पोलीस स्थानकामध्ये घुसवावी लागली. फिल्मी स्टाईलमध्ये बराच वेळ त्यांनी आमचा पाठलाग केला,पण मी गाडी थांबवली नाही. शेवटी मी गाडी मीरा रोड पोलीस स्थानकात घातली आणि अश्या रीतीने साहेब आणि आमचा त्या गाडीमुळे जीव वाचला..
हा किस्सा सांगताना स्वतः गिरीश भावूक झाले होते. यांसारखे साहेबांचे अनेक किस्से लोकांच्या आजही आठवणीत आहेत.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..