World’s Best T-20 Players: टी-२० हा सध्याचा क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय फॉरमॅट आहे. आयपीएल सारख्दया जागतिक स्रपर्धांमुळे तर या फोर्मेटला आणखी मान मिळत जात आहे. सध्या जगभरात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी अंतरास्त्रीय स्तरावर टी-२० मालिका खेळवल्या जातात.
गेल्या काही वर्षांत, अनेक फलंदाज टी-२० मध्ये चमकले आहेत आणि त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता अंबाती रायुडूने सांगितले आहे की, त्याच्या मते टी-२० मधील सर्वोत्तम फलंदाज कोण आहेत. एका माध्यमात मुलाखत देतांना रायडून हे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे कोहलीचे चाहते नाराज झाले आहेत. नक्की काय म्हणाला रायडू पाहूया.
World’s Best T-20 Players: टी-२० इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज कोण आहे आहेत?
अंबाती रायुडूने टी-२० इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांबद्दल बोलतांना, अंबातीने अभिषेक शर्मा, एबी डिव्हिलियर्स आणि सूर्यकुमार यादव यांचे नाव घेतले. मोठी गोष्ट म्हणजे त्याने ख्रिस गेल, विराट कोहली, किरॉन पोलार्ड आणि डेव्हिड वॉर्नर सारख्या दिग्गजांना पूर्णपणे दुर्लक्ष केले. या सर्वांनी टी-२० मध्येही आपली छाप सोडली आहे परंतु अंबातीचे मत थोडे वेगळे आहे.
विराट कोहलीचे टी-२० आकडे आश्चर्यकारक , तरीही रायूडूने केले दुर्लक्ष..
विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि तो फक्त आता आयपीएल आणि एकदिवशीय सामने खेळताना दिसतो. कोहलीने दिल्ली, टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी टी-२० फॉरमॅट खेळला आहे आणि आतापर्यंत त्याने एकूण १३५४३ धावा केल्या आहेत.
त्याने ९ शतके आणि १०५ अर्धशतके केली आहेत. विराट आणखी काही वर्षे आयपीएल खेळेल. अशा परिस्थितीत, तो धावांच्या बाबतीत ख्रिस गेललाही मागे टाकू शकतो, ज्याने एकूण १४५६२ धावा केल्या आहेत. यावरून विराट टी-२० च्या महान खेळाडूंपैकी एक आहे हे सिद्ध होते.
हेही वाचा:
1 Comment
Pingback: Team india women Squad for World cup 2025: बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी महिला संघाची केली घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी..! - yuvakat