लाल सिंग चड्डाचं नाय तर, आमीर खानच्या या 5 चित्रपटांनीही निर्मात्यांचा बाजार उठवला होता..

 

 

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हटले जाते. जो आता 57 वर्षांचा झाला आहे. सध्या आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आमिर खानचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. त्याचे चित्रपट अजुनही प्रदर्शित होताच सुपरहिट होतात.

आमिर खानच्या कित्येक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण करून सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. इतकचं नाही, तर आमिर खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची वर्षभर वाट पाहत असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का? आमिर खानने हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट केले आहेत. जे प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवू शकले नाहीत. तसेच ते चित्रपट करून आमिर खानलाही आनंद झाला नाही. चला तर मग आमिरच्या या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.

 

तुम मेरे हो : आमिरच्या या फ्लॉप चित्रपटांमध्ये ‘तुम मेरे हो’ हा चित्रपट अव्वल स्थानावर आहे. हा चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो इच्छाधारी नागाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याला बालपणात घडलेल्या काही घटनांमध्ये इच्छाधारी नागाची शक्ती मिळते. या चित्रपटात आमिर खानसोबत जुही चावला देखील होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपले स्थान निर्माण करू शकला नाही आणि चित्रपट अतिशय वाईट पद्धतीने फ्लॉप झाला.

 

जवानी जिंदाबाद : या यादीत दुसरा फ्लॉप चित्रपट ‘जवानी जिंदाबाद’ हा आहे. आमिर खानचा हा चित्रपट देखील 1990 मध्ये आला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही. हा चित्रपट कन्नड चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात फराह खान अमिक खानच्या विरूद्ध अभिनेत्रीच्या भूमिकेत होती.

आमीर

 

दीवाना मुझसा नहीं: आमिर खानच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीतील तिसरा चित्रपट म्हणजे 1990 चा ‘दीवाना मुझसा नही’. जेव्हा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला प्रेक्षकांना तो आवडला होता. मात्र हा चित्रपट तितकी कमाई करू शकला नाही. ज्यामुळे चित्रपट मोठ्या पडद्यावर फ्लॉप ठरला होता.

परंपरा :आमिरच्या या फ्लॉप चित्रपटांच्या यादी चौथा चित्रपट ‘परंपरा’ आहे. जो 1992 साली आला होता. या चित्रपटात कलाकारांची कमतरता नव्हती पण त्यामुळेही फारसा फरक पडला नाही. हा चित्रपट दिग्दर्शक यशराज यांचा त्यांच्या बॅनरखालील शेवटचा चित्रपट होता. ज्यामध्ये आमिरसोबत सैफ अली खान, विनोद खन्ना, सुनील दत्त, रबिना टंडन, अश्विनी भावे यांच्या भूमिका होत्या. पण तरीही हा चित्रपट फ्लॉप झाला.

जिंदगी : याचप्रमाणे आमिर खानचा जिंदगी हा चित्रपट 1992 साली आला होता. या चित्रपटात आमिर खानसोबत फराह खान, शक्ती कपूर, असरानी हे देखील दिसले होते. पण तरीही हा चित्रपट काही खास बॉक्स ऑफिसवर टिकू शकला नाही. बॉलिवूडच्या सुपरस्टारमध्ये गणना होणाऱ्या आमिर खानचे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top