Asia Cup 2025 -IND vs PAK : आशिया कप 2025 ( Asia Cup 2025) 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, जिथे त्यांचा सामना यूएईशी होईल. यानंतर 14सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) चा महान सामना खेळला जाईल.
ज्याची दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.. या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी अनुभवी खेळाडू वसीम अक्रम (Wasim Akram) यांनी एक मोठे विधान केले आहे.
Asia Cup 2025 -IND vs PAK सामन्यापूर्वी वसीम अक्रम काय म्हणाले?
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रम यांनी दोन्ही देशांच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आह. टेलिकॉम एशियाशी बोलताना अक्रम म्हणाले की,
मला खात्री आहे की, हे सामने देखील भारत-पाकिस्तानच्या इतर सामन्यांसारखेच मनोरंजक असतील. परंतु मला आशा आहे की, खेळाडू आणि चाहते दोघेही शिस्तबद्ध राहतील आणि त्यांच्या मर्यादा ओलांडणार नाहीत. भारत आणि पाकिस्तानमधील सामने जगभरातील कोट्यवधी लोक पाहतात. जर भारतीय देशभक्त असतील आणि त्यांचा संघ जिंकावा असे वाटत असेल तर पाकिस्तानी चाहत्यांनाही तेच हवे आहे. भारत अलीकडेच चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि एक मजबूत दावेदार म्हणून सुरुवात करेल, परंतु त्या दिवशी जो संघ दबाव उत्तम प्रकारे हाताळतो तोच संघ जिंकेल. चाहत्यांमध्ये शिस्त पाहायला हवी..
भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती नंतर पहिल्यांदाच भिडणार दोन्ही संघ..
मागील काही महिन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमा भागात जोरदार कारवाई झाल्या होत्या ज्यामूळ दोन्ही देशात युद्धजण्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्हीही देशांनी एकमेकांवर ड्रोन हल्ले, हवाई हल्ले केले होते ज्यात अनेक जखमी व काही मृत देखील झाले होता.
त्यांनतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबले. त्यांनतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमने सामने येणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कुणीही एकमेकांच्या विरोधात भावना भडकतील असे वक्तव्य अथवा कृती करू नका, असे आव्हान आक्रमने केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला गेला होता. हा सामना भारतीय संघाने जिंकला होता. आशिया कप 2025 हा टी-२० स्वरूपात खेळला जाईल. हेड-टू-हेड सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 13 टी-२० सामने खेळले गेले आहेत. भारताने 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत.
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ (Team India Squad for Asia Cup 2025)
सूर्य कुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा, रिंकू सिंग.
आशिया कप 2025 साठी पाकिस्तान संघ (Pakistan Squad for Asia Cup 2025):
सलमान अली आगा (कर्णधार ), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (उपकर्णधार.), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफयान मोकीम.
हेही वाचा:
Asia Cup 2025 मधून बाबर- रिजवानला बाहेर का ठेवले? अखेर पीसीबी अध्यक्षांनी दिले उत्तर..!