Asia Cup 2025: आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. बीसीसीआय ने भारतीय संघाची पूर्ण तयारी केली असून आज सायंकाळी आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे.
आशिया चषक 2025 T-20 फॉर्मेटमध्ये आयोजित केला जात आहे. यावेळी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ हे संघ विजेतेपदासाठी झुंजतील.
आशियाई संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत यापूर्वी अनेक मोठे विक्रम झाले आणि मोडले गेले. आज या खास लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या रेकॉर्डबद्दल सांगणार आहोत. होय, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ,आशिया कपच्या एका हंगामात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट ( Most Wickets in 1 Asia Cup Season) घेतल्या आहेत, चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू?
.आशिया कप स्पर्धेच्या एका हंगामात या 5गोलंदाजांनी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
अजंथा मेंडिस (ajantha mendis) 17 विकेट्स (2008)
श्रीलंकेचा माजी वेगवान वेगवान गोलंदाज अजंथा मेंडिस(ajantha mendis) हा आशिया कपच्या एकाच मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 2008 मध्ये पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. मेंडिसने या स्पर्धेत 6 सामन्यात 42 षटके टाकली आणि एकूण 17 बळी घेतले होते. आशिया कपच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे..
इरफान पठाण (Irfan Pathan) 14 विकेट्स (2004)
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या नावावर एकाच आशिया चषकाच्या मोसमात दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. 2004 मध्ये श्रीलंकेत झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही तो 6 सामने खेळला होता. यादरम्यान इरफानने 52.1 षटके टाकली आणि एकूण 14 बळी घेतले. इरफान पठाण हा भारतीय संघासाठी नेहमीच एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जात असे.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 12 विकेट (2004):
क्रिकेटचा देव अर्थात महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या बॅटने अनेक अतूट विक्रम प्रस्थापित केले आहेत, परंतु 19 वर्षांपूर्वी त्याने आशिया चषक (ASIA CUP )स्पर्धेत गोलंदाजी करताना एक विक्रम केला होता, जो आजपर्यंत केवळ दोन खेळाडूंनी त्याची बरोबरी केली आहे. 2004 मध्ये श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या आशिया चषक स्पर्धेत सचिनने 6 सामन्यात 32 षटके टाकत एकूण 12 बळी घेतले होते. आशिया चषकाच्या इतिहासात एकाच मोसमात घेतलेल्या विकेट्सचा हा तिसरा क्रमांक आहे.
मुथय्या मुरलीधरन (muttiah muralitharan) -11 विकेट्स (2008)
आशिया कपच्या एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन ((muttiah muralitharan)चौथ्या स्थानावर आहे. 2008 मध्ये पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत (ASIA CUP 2008) त्याने 5 सामन्यात 48 षटके टाकली आणि एकूण 11 बळी घेतले. आशिया चषक 2008 मध्ये श्रीलंका व्यतिरिक्त बांगलादेश, हाँगकाँग, भारत, पाकिस्तान आणि यूएई सहभागी झाले होते.
लसिथ मलिंगा (lasith malinga) : ११ विकेट्स (२०१३-१४)
क्रिकेटच्या इतिहासातील महान गोलंदाजांपैकी एक मानला जाणारा, श्रीलंकेचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (lasith malinga) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीदेखील तो क्रिकेटच्या मैदानात अनेक वेळा दिसतो. स्वतः खेळतांना मलिंगाने मैदानावर केलेले कारनामे इतिहासाच्या पानात अजरामर झाले आहेत.
बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप २०१३-१४ मध्ये मलिंगाने असाच एक मोठा पराक्रम करून दाखवला होता. त्या मोसमात त्याने 4 सामन्यात 34.5 षटके टाकली आणि एकूण 11 विकेट घेतल्या. आशिया कपच्या इतिहासात एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मलिंगा पाचव्या स्थानावर आहे.
2 Comments
Pingback: Team india women Squad for World cup 2025: बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी महिला संघाची केली घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी..! - yuvakat
Pingback: धनश्री वर्मानंतर तिच्या मैत्रिणीचा घटस्फोटासाठी अर्ज , नवऱ्यावर केले गंभीर आरोप..! - yuvakatta.com