Asia Cup 2025: आशिया कप 2025 साठी पीसीबीने पाकिस्तान संघाची नुकतीच घोषणा केली. ज्यात स्टार दिग्गज खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संधी मिळाली नाही. त्यांनतर पीसीबीवर अनेक पाकिस्तानी दिग्गज खेळाडू व मिडिया प्रश्न विचारात होती.
Asia Cup 2025 साठी पाकिस्तान संघात जागा नाही मिळवू शकत बाबर आझम, मोहम्मद रिझवान.
अखेर संघातून बाबर आझम (Babar Aazam) आणि मोहम्मद रिझवान (Mohmmad Rizwan) यांना वगळण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी (mohsin naqvi) यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, संघ निवडीत त्यांची कोणतीही भूमिका नाही आणि हा निर्णय पूर्णपणे निवड समितीचा आहे.
तो निवड समिती निर्णय- मोहसीन नक्वी
अलीकडेच पाकिस्तानच्या १७ सदस्यीय संघाची आशिया कप 2025 साठी घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये बाबर आणि रिझवान यांना वगळण्यात आले. संघाची घोषणा करताना मुख्य प्रशिक्षक माइक हेसन आणि मुख्य निवडकर्ता आकिब जावेद म्हणाले की,
दोन्ही खेळाडूंना त्यांचा स्ट्राइक रेट सुधारण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी असेही सांगितले की, बाबर आणि रिझवान यांना काही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत जेणेकरून ते त्यांच्या फलंदाजीवर काम करू शकतील आणि भविष्यात संघात पुनरागमन करू शकतील.
पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी नक्की काय म्हणाले?
पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी म्हणाले,
“सर्वप्रथम, संघ निवडण्यात किंवा कोणत्याही खेळाडूला वगळण्यात माझी एक टक्काही भूमिका नाही. आमच्याकडे एक व्यावसायिक निवड समिती आहे, ज्यामध्ये एक सल्लागार गट देखील आहे. ते तासनतास एकत्र चर्चा करतात. मी फक्त एवढेच म्हणतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो गुणवत्तेवर असावा आणि मी त्या निर्णयाचे समर्थन करेन.”
हेही वाचा:
- Team India Sponsor Dream 11 break Contract with BCCI: Dream 11 ने तोडला 358 कोटींचा करार, आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नव्या स्पोन्सरचा लोगो..
- ODI World Cup 2027 चा प्लान तयार, या देशात या महिन्यात रंगणार थरार; खेळवले जाणार तब्बल एवढे सामने..!
1 Comment
Pingback: Asia Cup 2025 -IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी वसीम अक्रमचे मोठे वक्तव्य, दिला थेट इशाराच.. - yuvakatta.com