Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Yuvakatta
Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!
Team India Next ODI Captain: टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. रोहितने कसोटीमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) भारतीय कसोटी संघाची सूत्रे हाती घेतली आहेत. ज्यामुळे रोहितनंतर अनेक लोक शुभमनलाच एकदिवसीय कर्णधार म्हणूनही पाहत आहेत. मात्र माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांना शुभमन नाही तर दुसरा खेळाडू रोहित नंतर भारतीय संघाचा कर्णधार व्हावे, असे वाटते. रोहितनंतर श्रेयस अय्यर पुढचा एकदिवशीय कर्णधार व्हावा – मनोज तिवारी ( Team India Next ODI Captain:) मनोज तिवारी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, श्रेयस अय्यर पुढचा कर्णधार व्हावा मात्र त्याच्यासाठी गोष्टी…
Sarfraz khan Century: सरफराज खानने ठोकले पुन्हा शतक, टीम इंडियाच्या निवड समितीला चोख उत्तर…!
Sarfraz khan Century: बुची बाबू स्पर्धेत युवा खेळाडू सरफराज खानने पुन्हा एक हटके शतक ठोकून आपली ताकत दाखवून दिली आहे. जेव्हा त्याच्या वजनाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते तेव्हा, त्याने त्याच्या फिटनेस वर काम केले. त्याच्या फॉर्मवरून टीकाकारांनी त्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु आता सरफराज खान त्याच्या बॅटने सर्वांना चोख उत्तर देत आहे. बुची बाबू स्पर्धेत सलग दोन सामन्यात दोन शतक ठोकले आहेत.. त्याच्या या खेळीने त्याने टीम इंडिया च्या निवड कर्त्यांचे लक्ष पुन्हा एकदा त्याच्याकडे वेधले आहे. Sarfraz khan Century: बुची बाबू मध्ये सरफराजने ठोकले दुसरे शतक. सरफराजने पुन्हा एकदा ८ दिवसांत दुसरे शतक झळकावून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून…
Rohit sharma About Retirement: T-20 आणि कसोटीमधून निवृत्ती बद्दल बोलतांना रोहित शर्मा भावूक, ‘नक्की का घेतला निर्णय?’
Rohit sharma About Retirement: भारतीय संघाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit sharma ) ने या वर्षी मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यापूर्वी रोहितने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर टी-२० मधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता रोहित शर्मा भारताकडून फक्त एकदिवसीय सामन्यात खेळेल. तो शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाकडून खेळला होता. दरम्यान, रोहितने आता त्याच्या कसोटी आणि टी-२० निवृत्तीबद्दलचे मौन तोडले आहे. आणि याबद्दल बोलतांना रोहित खूपच इमोशन दिसला… Rohit sharma About Retirement: रोहितने सोडले मौन, ‘नक्की का घेतला निवृत्तीचा निर्णय?’ मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला की, यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल, कारण खेळासाठी दीर्घकालीन…
चेतेश्वर पुजारा ने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा
चेतेश्वर पुजारा: भारतीय संघाचा सुपरस्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने २४ ऑगस्ट २०२५ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती चा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. पुजारा बऱ्याच काळापासून भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला संघात पुनरागमन करण्यात अपयश आहे. देशांतर्गत हंगाम सुरू होण्यापूर्वी पुजाराने अचानक निवृत्ती का जाहीर केली?, हा प्रश्न सध्या खूप मोठा बनला आहे. ज्याबद्दल आता स्वतः चेतेश्वर पुजाराने मोठा खुलासा केला आहे. चेतेश्वर पुजाराने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा सुपरस्टार कसोटी खेळाडू चेतेश्वर पुजाराने स्पष्ट केले आहे की, त्याने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला नाही. तो गेल्या काही दिवसांपासून याबद्दल विचार करत होता. संघाबाहेर राहिल्यानंतरही,…
Asia Cup 2025 -IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी वसीम अक्रमचे मोठे वक्तव्य, दिला थेट इशाराच..
Asia Cup 2025 -IND vs PAK : आशिया कप 2025 ( Asia Cup 2025) 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, जिथे त्यांचा सामना यूएईशी होईल. यानंतर 14सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) चा महान सामना खेळला जाईल. ज्याची दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.. या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी अनुभवी खेळाडू वसीम अक्रम (Wasim Akram) यांनी एक मोठे विधान केले आहे. Asia Cup 2025 -IND vs PAK सामन्यापूर्वी वसीम अक्रम काय म्हणाले? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रम यांनी दोन्ही देशांच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आह. टेलिकॉम एशियाशी…
Asia Cup 2025 मधून बाबर- रिजवानला बाहेर का ठेवले? अखेर पीसीबी अध्यक्षांनी दिले उत्तर..!
Asia Cup 2025: आशिया कप 2025 साठी पीसीबीने पाकिस्तान संघाची नुकतीच घोषणा केली. ज्यात स्टार दिग्गज खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संधी मिळाली नाही. त्यांनतर पीसीबीवर अनेक पाकिस्तानी दिग्गज खेळाडू व मिडिया प्रश्न विचारात होती. Asia Cup 2025 साठी पाकिस्तान संघात जागा नाही मिळवू शकत बाबर आझम, मोहम्मद रिझवान. अखेर संघातून बाबर आझम (Babar Aazam) आणि मोहम्मद रिझवान (Mohmmad Rizwan) यांना वगळण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी (mohsin naqvi) यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, संघ निवडीत त्यांची कोणतीही भूमिका नाही आणि हा निर्णय पूर्णपणे निवड समितीचा आहे. तो निवड समिती निर्णय-…
Team India Sponsor Dream 11 break Contract with BCCI: Dream 11 ने तोडला 358 कोटींचा करार, आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नव्या स्पोन्सरचा लोगो..
Team India Sponsor Dream 11 break Contract with BCCI: ऑनलाइन गेमिंग उद्योगाला अलीकडेच मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या ड्रीम-११ ने आशिया कप २०२५ च्या आधी महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रीम 11 ने मोडला बीसीसीआय सोबतचा करार (Team India Sponsor Dream 11 break Contract with BCCI) वृत्तानुसार, ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये टीम इंडिया च्या जर्सीवर ड्रीम-११ चा लोगो दिसणार नाही. कंपनीने बीसीसीआयसोबतचा करार रद्द केला आहे. ज्या करारानुसार ड्रीम ११ 2026 पर्यंत भारतीय संघाचा प्रायोजक होता ज्यातून बीसीसीआयला वार्षिक 358 कोटी रु मिळणार होते. ते आता रद्द झाले आहेत. ऑनलाइन गेमिंग बिल…
Cheteshwar Pujara Announced Retirement: भावनिक पोस्ट लिहित चेतेश्वर पुजाराचा क्रिकेटला ‘रामराम’, अंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फोर्मेटमधून घेतली निवृत्ती..!
Cheteshwar Pujara Announced Retirement: टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujar ) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुजारा बराच काळ टेस्ट टीम इंडियाच्या बाहेर होता. त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आणि क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे. Cheteshwar Pujara Announced Retirement: सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट. चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारतीय जर्सी घालणे, राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी तुमचे सर्वोत्तम देणे – याचा खरा अर्थ शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. पण जसे ते म्हणतात, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट झाला पाहिजे आणि अपार कृतज्ञतेने मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती…
ODI World Cup 2027 चा प्लान तयार, या देशात या महिन्यात रंगणार थरार; खेळवले जाणार तब्बल एवढे सामने..!
ODI World Cup 2027 Venue: २०२७ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup 2027 ) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आधीच तयारी सुरू केली आहे. एकदिवसीय विश्वचषकाचा पुढील हंगाम २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाईल. या मेगा इव्हेंटची तयारी लक्षात घेऊन, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या देशात सामने खेळवण्यासाठी स्टेडियमची निवड केली आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम सामन्यासह एकूण ५४ सामने खेळवले जातील. ODI World Cup 2027 Venue: या ठिकाणी खेळवले जाणार सामने . क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या माहितीनुसार, ते एकूण ४४ सामने आयोजित करेल, याशिवाय उर्वरित १० सामने झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवले जातील. दक्षिण आफ्रिकेने ४४…
ट्रोलिंग आणि पर्सनल आयुष्याबद्दल अभिनेत्री समांथा रूथ प्रभूचे मोठे वक्तव्य, म्हणाली, ‘ हे सगळे म्हणजे..’
चित्रपट इंडस्ट्री मधील आघाडीची अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ने अलीकडेच तिचा जीवन आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित झाला आहे याबद्दल एका पोडकास्ट मध्ये खुलासा केला. तिने यात केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. ट्रोलिंग आणि पर्सनल आयुष्याबद्दल नक्की काय म्हणाली समांथा रूथ प्रभू? समंथा म्हणाली की, ती नेहमीच इतरांशी चांगली वागली असली तरी, स्वतःशी पुरेशी दयाळूपणे वागत नाही याबद्दल तिला वाईट वाटते. सोशल मीडियाच्या जगात प्रशंसा आणि ट्रोलिंग हे दोन्ही कसे अविभाज्य आहेत याबद्दलही तिने भाष्य केले. तिने ग्राझियाला तिच्या व्यक्तिरेखेतील ऑनलाइन आणि ऑफलाइन फरकाबद्दल सांगितले. यात बोलतांना ती म्हणाली की, “मी माझ आयुष्य शक्य तितके…